आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: आपल्या गरजा भागवा आणि त्यातून नव्या इच्छाही पूर्ण करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आध्यात्मिकता हा आपल्या कर्तव्यापासून वाचण्याचा पर्याय नाही. तो जीवनातील आवश्यकता आणि संतुष्टी यामध्ये संतुलन ठेवण्याचा मार्ग आहे. गावात किंवा शहरात राहणारी नवी पिढी आपल्या आर्थिक निर्णयामध्ये हे संतुलन ठेऊ लागली आहे. 
 
खेडेगावातली कहाणी : लाल रंगाचे मोठे ट्रॅक्टर जेव्हा गावातील धुळीच्या रस्त्यावरून निघते तेव्हा ट्रॅक्टर आणि त्यावर बसलेल्या माणसाला पाहायला सगळे गाव जमा व्हायचे. परिस्थिती अशी असायची की थेट अजय देवगणच्या एका ट्रॅक्टरच्या जाहिरातीची आठवण यावी. ट्रॅक्टर हा शेतीची गरज बनला आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या शेतकऱ्यांना तर ट्रॅक्टर अत्यावश्यक आहे. हेच हेरून तामिळनाडूच्या कोइम्बतूर स्थित गोल्ड फार्म कंपनीची स्थापना झाली. शेतीच्या गरजा आेळखून ही कंपनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि अन्य शेतीचे साहित्य पुरवते. ही कंपनी कर्नाटकच्या कोलार चिकबल्लापूर आणि आंध्र प्रदेशातील चित्तुर येथे सेवा पुरवते. गोल्ड फार्मकडे सुमारे ८० ट्रॅक्टर्स आहेत. त्यांच्या मुख्य गुंतवणूकदारांमध्ये महिंद्रा अँण्ड महिंद्रासारख्या कंपन्याही आहेत. कामाची बुकिंग फार्म अॅडवायझर करतात. हे अॅडवायझर कंपनीचे कलेक्शन एजंट म्हणून काम करतात. 

शेतकरी कामाचे पैसे शक्यतो रोखच देतो. २०१२ मध्ये अभिलाष त्रिपाठी याने आपला वर्गमित्र कार्तिक रविंद्रनाथ याला सोबत घेत गोल्ड फार्म ही कंपनी सुरू केली. कंपनीने नियुक्त केलेले फार्म अॅडवायझर हे स्थानिक मिल्क को-ऑपरेटिव्ह किंवा पंचायतीत सक्रिय असणारे लोक आहेत. ते शेतकऱ्यांसाठी अॅपच्या माध्यमातून बुकिंग करतात. सगळ्या बुकिंगचे पैसे अगोदर भरले जातात. कंपनीच्या यशस्वितेचे कारण कमी खर्च नाही तर वेळेवर ट्रॅक्टरची उपलब्धता हेच आहे. गोल्ड फार्मने आपल्या अॅडवायझर असलेल्यांना स्वाइप मशीन दिले आहे. बुकिंगसाठी त्यांना पाच हजारांची लिमिटही दिली आहे. कंपनीच्या संस्थापकांचे म्हणणे आहे की, टॅक्सी सेवेसारखी ही सेवाही संघटित झाली पाहिजे. शेतकऱ्यांना जे हवे ते वेळेवर आणि रास्त भावात मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकापेक्षा जास्त वेळा या कंपनीची सेवा घेतलेले ग्राहक जास्त आहेत आणि हीच त्यांच्या यशाची पावती आहे. 
 
शहराची कहाणी : दिल्लीत राहणाऱ्या आकाश सिंगला कार पार्किंगची समस्या कायम भेडसावत होती. जेव्हा त्याची मुंबईला बदली झाली तेव्हा त्याने या समस्येवर अगोदर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. कारचा मालक होण्याची त्याची इच्छा तोपर्यंत संपली नव्हती, मात्र त्याच्याकडे ड्राइव्हजीकडून कार भाड्यावर घेण्याचा विकल्प होता. ड्राइव्हजी ही अशी कंपनी आहे जी कारच्या मालकांकडून कार भाड्याने घेते. ज्या लोकांना आपल्या कारची रोज आवश्यकता नसते त्या कारच्या मालकांची लिस्ट या कंपनीकडे आहे. त्या मालकांकडून ते कार घेतात आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांना ती देतात. कंपनीकडे मुंबई, पुणे, बंगळुरू आणि म्हैसूर येथील शेकडो कार मालकांची लिस्ट आहे. मायक्रो लिज मॉडेलच्या आधारे त्यांनी आता दुचाकी गाड्यांकडेही लक्ष केंद्रित केले आहे. कार मालक आमच्या आधारे महिन्याला ३० हजार रुपयेही कमवू शकतात, असा कंपनीचा दावा आहे. यामुळे मालकांना त्यांच्या कारची इएमआय भरण्यास मदत होते. महत्त्वाची गोष्ट ही आहे की या कंपनीत मागच्या महिन्यात दीड कोटीची गुंतवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये महिंद्रा फायनान्ससारख्या मोठ्या कंपन्याही सहभागी आहेत. 
 
फंडा असा आहे की... 
नवी पिढी आपल्या गरजा कमी करत नाही. उलट दिवसेंदिवस त्या वाढत आहेत. याच गरजा आेळखून भविष्यात रिटेल बाजार विस्तारणार आहे. त्याला वेग प्राप्त होणार आहे. 
 
raghu@dbcorp.in
 
मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर 
बातम्या आणखी आहेत...