आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: सण साध्या, सोप्या पद्धतीने, माणुसकीने साजरे व्हावेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टोरी 1 : अंजली पालचे वय आता ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. आरजी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलने दिलेला तीन बाय सहाचा एक पलंग आणि त्या पलंगाखाली काही छोट्या-मोठ्या वस्तू एवढेच काय ते तिचे सामान आहे. त्या हॉस्पिटलमध्ये त्याच पलंगावर झोपून त्या छताला लटकलेल्या पंख्याकडे पाहत दिवस ढकलत असतात. त्याच हॉस्पिटलमध्ये गोपाल पात्रा हे ५५ वर्षीय गृहस्थही आहेत. २० ऑक्टोबर २०१४ ला त्यांना अपघात झाल्याने या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले गेले होते. अपघातात त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली काढण्यात आले होते. 
 
सणासुदीच्या दिवसांत या प्रत्येकाला हॉस्पिटलमधून घरी जाण्याची इच्छा असते मात्र या दोघांनाही न्यायला आतापर्यंत कुणीच आले नाही. गोपाल यांना दोन मुले आहेत मात्र अपघातानंतर ते साधे दवाखान्यातही आले नाहीत. २१ सप्टेंबरला दुर्गापूजेच्या मुहूर्तावर या सर्व रुग्णांना नवीन कपडे देण्यात आले. या दोघांनीही हे नवीन कपडे पाहिले तेव्हा ते हरखून गेले. ‘हे आमच्यासाठी?’ हा सारखाच प्रश्न दोघांनीही विचारला. या दोघांनाही हॉस्पिटल प्रशासनाला धन्यवाद दिले. ‘बंसद्रोणी हृदी’ या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेने या हॉस्पिटलमधील अंजली आणि गोपाल यांच्यासह इतर १६ रुग्णंना नवीन कपडे दिले होते. कोलकात्याच्या इतर दोन हॉस्पिटलमध्येही त्यांनी हा उपक्रम राबवला. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी उचललेले हे पाहून त्या रुग्णांच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य पेरून गेले. 
 
स्टोरी 2 : धनबाद येथील बंगाली वेल्फेअर सोसायटीने सणासुदीच्या या दिवसांत एक उपक्रम राबवला. हिरापूरस्थित त्यांच्या चिल्ड्रन पार्कमधील पांडालला त्यांनी ‘जुन्या दिवसांची आठवण’ म्हणून नवीन रूप दिले. त्या ५५ बाय ४५ फुटांच्या पेंडॉलमध्ये चायनीज चेकर्स, विटीदांडू, कबड्डी, पुडो, सापशिडीसारखे खेळ तयार करण्यात आले. या पार्कमध्ये मुलांबरोबर येणाऱ्या पालकांच्या जुन्या आठवणी ताज्या होऊन ते त्यांच्या लहानपणी खेळत असलेले खेळ खेलण्यासाठी आपल्या मुलांनाही प्रोत्साहित करतील हा या सोसायटीचा उद्देश होता. झालेही तसेच. जेव्हा मुलांना घेऊन पालक आले तेव्हा ग्राउंडवरील हा बदल पाहून ते सगळेच हरखून गेले. त्यातील अनेक मुलांनी कबड्डीच्या ग्राउंडवर आपले कसब दाखवले. अनेकांनी कपडे खराब केले मात्र पालकांना त्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक यामधून मुले काही काळ बाहेर आली आणि नव्याने आनंद मिळवू लागली. जुन्या काळातील ‘साधीसुधी, मौजमस्ती’ जिवंत राहावी आणि बालपणाचा खरा आनंद मिळावा हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. तो सार्थकही झाला. सण साजरे करताना आपण जेवढी मानवता आणि साधेपणा जपू तेवढे जीवन आनंदी होते. 
 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...