आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: हृदयीचा दिवा पेटवून दिवाळी साजरी करावी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किस्सा 1 : प्रत्येक दिवाळीला मी इतरांपेक्षा जास्त लवकर उठतो आणि माझ्या कुत्र्याच्या पिलाला घेऊन बाहेर फिरायला जातो. बाहेर बागेत मला अन्य प्राणिमित्र भेटतात, जे आपापल्या कुत्र्यांना घेऊन आलेले असतात. लोकांनी फटाके फोडण्यास सुरुवात करण्याअगोदर हे प्राणिमित्र आपापल्या कुत्र्यांना खाऊ घालतात. त्यांना फिरवून आणतात. कारण जेव्हा लोक बाहेर फटाके फोडत असतात तेव्हा कुत्रे कुठे तरी अडोशाला लपून बसतात. ते घाबरलेले असल्याने त्यांच्या खाण्यापिण्याची या वेळी सोय नसते. माझ्या मुलीने आयुष्यात कधीच फटाका फोडला नाही. कारण ती लहान होती तेव्हापासून आमच्या घरात कुत्रा आहे. त्याच्यासाठी तिने कधीच फटाके घेण्याचा आग्रह केला नाही. बुधवारी तामिळ दिवाळीचा सण साजरा झाला. त्या दिवशी मी पहाटे पाच वाजता उठलो आणि फिरायला गेलो. मुंबई जागी झाली होती आणि सगळीकडे दिवेही लागलेले हाेते. मी जागा झालो तेव्हापर्यंत एकही फटाका फोडला गेला नव्हता. 
 
किस्सा 2 : ‘१२टीके’नावाचे गाव आहे हे तुम्हाला कदाचित माहितीही नसेल. राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यात भारत- पाक सीमेपासून २० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावात जास्तीत जास्त १०० घरे आणि ६५० च्या आसपास लोकसंख्या असेल. प्रदूषण हा शब्दही येथील गावकऱ्यांनी ऐकलेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे आपल्या गावात पक्षी आणि छोट्या प्राण्यांची संख्या कमी झाल्याचे येथील गावकऱ्यांना जाणवले. पक्षी आणि प्राण्यांवरच या गावाचे अर्थचक्र अवलंबून असल्याने गावकऱ्यांनी या दिवाळीला वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. गावाने एकत्र येत नुकतीच जांभळाच्या १०० झाडे लावली. एवढेच नव्हे, तर ‘खेजरी’ नावाची १०० झाडेही लावली. या खेजरीपासून ‘सांगरीची भाजी’ही केली जाते. 
 
किस्सा 3 : पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, ही दाेन्ही राज्ये आणि चंदिगडमध्ये सायंकाळी ६.३० ते ९.३० या दरम्यानच फटाके फोडले जातील. दुसरीकडे शेजारील दिल्ली सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवरच बंदी घातली. चंदिगड सेक्टर ४५च्या सेंट स्टीफन स्कूलच्या सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी ‘ग्रीन दिवाली’ साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. विषारी धूर आणि प्रदूषण होणारे फटाके ही मुले फोडणार नाहीत. 
 
किस्सा 4 : गुजरात मधील गोटा येथे राहणाऱ्या ११ वर्षीय वैशालीने यंदाच्या दिवाळीत एकही फटाका फोडण्याचा निर्णय घेतला. फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होतेच, मात्र आवाजाने अनेकांना त्रास होतो हे तिच्या शिक्षकांनी सांगितल्यानंतर तिच्या मनावर त्याचा प्रभाव पडला आणि तिने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला. तिच्या या निर्णयाने तिच्या शाळेसह अन्य शाळांनीही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी अनेक शाळांनी निबंध स्पर्धाही आयोजित केली. ‘प्रदूषण करता सणांचा आनंद कसा घेता येईल’ ‘ध्वनी प्रदूषणाशिवाय दिवाळी’ असे विषय निबंधासाठी देत विद्यार्थ्यांकडून नवे पर्याय शोधण्याचे काम केले. 
 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...