आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: बदलाची सुरुवात स्वत:पासून करा; भविष्य उज्ज्वल असेल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टोरी 1 : त्यांच्या कवितेचा अंश काहीसा असा आहे- ‘नन्हे दिलों ने सांस लेना बंद कर दिया, वे कहते हैं ऑक्सीजन की कमी, लेकिन मैं कहती हूं देखरेख की कमी, प्यार की कमी, जिम्मेदारी की कमी, कमी संवेदनशीलता की...’ या वर्षी १२ ऑगस्टला गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमधील एन्सेफेलायटिसने पीडित अनेक मुलांचा ऑक्सिजनचा सप्लाय बंद झाल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे १५ वर्षांच्या खुशी अमरीश चंद्रा हिला चांगलाच धक्का बसला. तिच्या संवेदनशील मनातून ही कविता अवतरली. या कवितेत त्या पालकांचे दु:ख तिने मांडले ज्या पालकांनी मुलांना गमावले. 
 
ऑक्सिजनचा सप्लाय हा तर प्रत्येक जिवासाठी अत्यावश्यक आहे, हा अनुभव तिने घेतला. फक्त कविता लिहून ती थांबली नाही तर तिने शांतपणे एका सामाजिक संस्थेचा पाया रचला. तिने या संस्थेला नाव दिले ऑक्सिजन गोरखपूर. ऑक्सिजनचा सप्लाय करण्यासाठी फंड उभा करण्याचा प्रयत्न तिची ही संस्था करणार आहे. या फंडाचा उपयोग फक्त बीआरडी मेडिकल कॉलेजलाच होणार नाही, तर अनेक हॉस्पिटललाही त्यातून मदत होणार आहे. आपल्या संस्थेचा उद्देश लोकांपर्यंत जावा यासाठी तिने www.oxygkp.com ही आपल्या संस्थेची वेबसाइट सुरू केली आहे. 
 
ऑक्सिजन बँक सुरू करण्याचा खुशीचा प्रयत्न आहे. सरकारी यंत्रणेला मदत करण्याची तिची इच्छा आहे. क्राउड फंडिंग, ऑनलाइन डोनेशन आणि ऑक्सिजनचे सिलिंडर स्पॉन्सर करून गरज असणाऱ्या हॉस्पिटलला त्याचा सप्लाय करणे या तीन क्षेत्रांत तिची ही संस्था काम करणार आहे. हे सगळे करण्यासाठी ती सोशल मीडियाचाही उपयोग करणार आहे. 
 
स्टोरी 2 : दक्षिण भारतातील एका मिशनरीत काम करत असलेल्या दांपत्याच्या पॉलीन जाफरी या मुलीने १९१७ मध्ये मास्टर्स डिग्री घेतली होती. त्यानंतर तिने मदुराई येथील एका स्कूलमध्ये काम करणे सुरू केले. या देशात फिजिशियन आणि मेडिकल टीचर्सची कमतरता आहे हे आेळखल्यावर ती अमेरिकेला गेली. तेथे तिने मेडिसीनचा अभ्यास केला. १९२६ ला ती पुन्हा भारतात आली. त्यानंतर तिने वेल्लोर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९३७ मध्ये तिला टीबी झाला आणि ती अमेरिकेला उपचार घेण्यासाठी गेली. तेथील डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरू असताना तिला पुन्हा भारतातील अप्रगत मेडिकल सुविधांची आठवण आली. ती पुन्हा भारतात आली. उटी जवळच्या कोटागिरीत ती थांबली. आपला आजार विसरून तिने तेथे कोटागिरी मेडिकल फेलोशिप (केएमएफ) सुरू केली. हा एक मिशनरी ट्रस्टच्या अधिपत्याखालील दवाखाना होता. तेथे ती स्वत: रुग्णांची सेवा करू लागली. १९४१ मध्ये काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तिने गायीच्या गोठ्यात केएमएफची सुरुवात केली होती. डोळ्यांचा दवाखाना म्हणून सुरू झालेला हा दवाखाना नंतर डॉ. जाफरी यांनी वाढवला आणि हे हॉस्पिटल जनरल हॉस्पिटलच्या रूपाने नावारूपाला आले. 
 
जून १९७४ मध्ये कोटागिरीमध्ये डॉ. जाफरी यांचे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८० वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात या ट्रस्टने अॅडमिनिस्ट्रेटिव्हचे काम क्रिश्चियन मेडिकल कॉलेजला (सीएमसी) आणि हॉस्पिटल वेल्लोरकडे सोपवले. निलगिरीच्या लोकांना योग्य सुविधा मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. येथे येणारे बहुतांश रुग्ण हे आदिवासी आहेत. ७५ वर्षांपूर्वीचा हा गायीचा गोठा आता एका जनरल हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाला आहे. जेथे आपले बालपण गेले तेथे सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात ही डॉ. जाफरी यांची इच्छा होती आणि त्यांनी त्यासाठी आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न केले. 
 
फंडा असा आहे की : जर तुम्ही तुमच्या आसपास काही बदल घडवू इच्छित असाल तर त्याची सुरुवात तुम्हाला तुमच्यापासून करावी लागेल. असे केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल. 
 

raghu@dbcorp.in

मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर 

 
बातम्या आणखी आहेत...