आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एन’ सेरीज नोकिया... अफलातून... (दिव्यमराठी ब्लॉग)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच फुटी ‘मनु’, आज सकाळी लवकरच आंघोळ करून तयार झाला होता .

लाल,सोनेरी,अश्या विविध रंगात रंगवलेल्या स्वताच्या केसाना, तो टॉवेल ने कोरडे करत होता .

आपल्यापेक्षा अर्धा फुट उंच बायकोने, टेबलावर ठेवलेला कोफ्फी चा कप त्याने घेतला !

“ह्म्म्म…………कोफ्फी काय मस्त झालीय आज ! व्वा !”, मनू म्हणाला.

“अरेरेरे …… आज तुम्हाला माझा कप गेला वाटत !” उद्धट बायको वदली !!

मनुची सटकली तसा त्याने कप मोरीत रिता केला अन मग दोघांची चांगलीच जुंपली !

मनुने शक्य तेवढे आपले डोळे वटारले, त्याच्या तोंडावर राग ‘डिसप्ले’ होऊ लागला !

सवयी प्रमाणे(!) तो आपल्या मुलाला चड्डी घालू लागला (आंघोळ त्यानेच घातली होती, हे वेगळे सांगावयास नको ! ते पण घरचे सगळे प्यायचे पाणी भरून ,हा हा हा !) व आपला मोबाईल, दोन्ही हात गुंतल्याने त्याने दातात धरला !

बायकोची टकळी अव्याहत चालू होती !

त्याचा राग वाढत होता आणि मोबाईलच्या ‘डिसप्ले’ वरील दातांचा दाब देखील ……..

“काड !”…… डिसप्ले तुटला !

तशी त्याने बायकोला आई माई वरून एक शिवी हासडली व पाठमोरा झाला !

तो पाठमोरा झाला तसा त्याच्या उंच बायकोने(कराटे ‘ब्राऊन’ बेल्ट) मागून पाठीत लाथ घातली व त्याच्या पाठीच्या ‘डिस्क’ मध्ये ‘प्ले’ आणला !!

तो मागे वळण्याच्या आत तिने आपला हात पुढे केला होता !

सगळी खबरबात त्याच्या अमेरिकेतल्या बहिण व भावाकडे पोचली तशी त्यांनी पैश्याची तजवीज केली !

सकाळी सकाळी मनू,त्याचे वडील व ते कार्ट (आंख थू वाला! आठवत नसेल तर वाचा माझी ह्या आधीची पोस्ट ‘आंख’ !) तिघांनी टी शर्ट, जीन्स व स्पोर्ट शूज असा पेहराव केला !

नोकिया शोरुम ला जाण्याआधी चार मित्राना सांगून मगच नव्या मोबाईल खरेदीला ते गेले !

(मोठेपणा मिरवण्याच्या शुद्ध हेतूने !)

कर्णोपकर्णी ही माहिती सर्व मित्रात पसरली की मनु सात हजाराचा फोन घेणार आहे ते !

सर्व मित्रांचे संगनमताने असे ठरले की त्याचा फोन आला की सगळ्यांनी म्हणायचे …..

“तुझ्या फोन मधे काहीतरी प्रोब्लेम आहे,आवाज जरा फाटतो आहे आणि निटस ऐकू पण येत नाही !!”

संध्याकाळ पर्यंत मनुला घाम फुटला ,जो तो मित्र आवाज नीट ऐकू येत नाही असेच म्हणू लागला !!

बाहेरून त्याने आपल्या बायकोला फोन लावला, जी की अजून रागात होती, म्हणाली , “मला काही माहिती नाही, मला काही वेळ पण नाही, तुमचा आवाजच तसलाच जळाला आहे ,तुमची आई रिकामीच असते, तिलाच बोला ….. घ्या मरा ”!

आईला वाटल की ह्या दोघांच भांडण चालू आहे तेव्हा कशाला मधे पडा, ती म्हणाली ,“बाळा, फोनच सोडून काहीपण बोल रे …..तुझा आवाज काय कुणाचा आवाज काय, देवांनी कान बहिरे केले एकदाचे, तर बर होईल बघ ,पीडा जाईल रे एकदाची !”

त्याच रागाच्या भरात त्याने आपल्या सासुरवाडीला फोन लावला आणि आज सोक्षमोक्षच लावावा म्हणून रागाने बोलू लागला !

फोन सासूने उचलला ,तिच्या मुलीने आधीच कल्पना देऊन ठेवली होती!

ती म्हणाली,“ कोण हाय ? नीट ऐकू येइना गेलंय, ह्यांनी घरी न्हाईत,भाईर गेलेत, नंतर लावा !”

उद्विग्न अवस्थेत थोडा वेळ बसल्यावर त्याला त्याचे सख्खे मामा आठवले व त्याना त्याने फोन लावला.

ह्या मामांना दोन्ही कानाने कमी ऐकू येत असे व एका कानाने तर अगदीच कमी !

आलटून पालटून ते कधी ह्या कानाला तर कधी त्या कानाला फोन धरू लागले !

ते म्हणू लागले,“ आता येवूलालय बग, आता येईना गेलंय बग,हींग, आता काई समजणा गेलंय बग, माय तू दुसऱ्याला इचार की र्र ,कस व्हय की काय व्हय की ……!!”

मनुचे बोलणेच खुंटले व थोडा वेळ त्याने फोन खुंटीला टांगून ठेवला !!

ह्या मामा व्यतिरिक्त सगळे पाहुणे आई व वडीलाकडचे सावत्र होते !

घाबरत घाबरत त्याने एका सावत्र काकाला फोन लावला, कारण बऱ्याच वर्षापासून त्यांचे बोलणेच नव्हते !

“काही नाही ,सहज केलो होतो, काही काम नाही …..आपल आप्पा लाव म्हणले मला …..आप्पा बर्याचदा ……आवाज ऐकू येतोय ना ?”

पुढे वाचण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा.