आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमधलं सिनेमॅटीक महानिर्वाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतीश आळेकरांचं महानिर्वाण रंगभूमीवर आलं त्याला आज 42 वर्षे उलटली. पण आजही त्यातले संदर्भ लागू पडतात. रुढी परंपरा आणि एकूणच मानवी स्वभाव कधीच बदलत नाहीत. त्यातूनच महानिर्वाणसारखा प्रयोग होतो आणि एकूणच विचार करणाऱ्या व्यक्तीच्या जाणिवा नेणिवांना जोरात हलवून सोडतो.
 
माणसाच्या स्वभावातले कांगोरे, समाज म्हणून पुढे जाताना त्यात आलेल्या अनेक वृत्ती आणि विकृतींना आळेकरांंनी थेट हात घातला. हे आज सांगण्यामागे कारण आहे. झेक प्रजासत्ताक इथं आयोजित 52 व्या कार्लोवी वॅरी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये सेतो सुर्या (2017) म्हणजेच व्हाईट सन हा सिनेमा पाहिला. तो आळेकरांच्या महानिर्वाणची नेपाळी आवृत्ती आहे.
 
माध्यम सिनेमाचं पण समाज आणि मानवी वृत्तीसोबत त्या राष्ट्रवाद आणि माओवादाचा संघर्ष आहे. सिनेमासाठी तो कथानकाचा भाग असला तरी बाकीचं सर्व काही आळेकरांच्या महानिर्वाणसारखं.

कुटुंब, संघर्ष आणि क्रांती
सेतो सुर्या या सिनेमाचा नायक चंद्रा हा माओवादी. काठमांडूपासून अगदी दूर डोंगरातल्या गावात त्याचा नेपाळच्या राजेशाहीविरोधात संघर्ष सुरु आहे. पकडला गेला आणि त्यानंतर तुरुंगातून थेट घरी येतोय. काही वर्षांच्या तुरुंगवासाच्या कालावधीत बाहेर खुप काही बदललंय. आणि चंद्रा ही आतून बदललाय. जुलमी राजेशाहीतून लोकशाहीकडे जाण्याची नेपाळमधली प्रक्रिया सोपी नव्हती. तरीही ती घडू लागलीय. यामुंळ चंद्रा आतून बदललाय. त्याला हे सर्व ठिक होईल असा विश्वास आहे.
 
गावात आल्यानंतर वडिलांचं निधन आणि त्यानंतरचा पूर्ण दोन तासांचा सिनेमा या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रक्रियेचा भाग दाखवतात. तिथंच आळेकराचं महानिर्वाण घडतं. जुन्या पिढीतून नवीन पिढीकडे जाताना विचारामध्ये होणारे बदल आणि त्यातून होणारा सिनेमातला संघर्ष फार महत्त्वाचा आहे. दिग्दर्शक दीपक रौनीयारनं तो चांगलाच टिपलाय. मानवी वृत्ती आणि विकृतींवर दीपकनं केलेलं सिनेमॅटीक भाष्य हे माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतं. एका घटनेभोवती फिरणारं हे नेपाळमधलं महानिर्वाण तिथल्या सामाजिक, राजकिय आणि क्लिष्ट अश्या धार्मिक भावनांचा वेध घेतं.
 
पुढील स्‍लाइडवर...सेतो सुर्याचं उत्तरायण..

 
बातम्या आणखी आहेत...