आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIME 100 : दिग्गजांच्या यादीत पंतप्रधान मोदींसह तीन भारतीयांचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदा अमेरिकन नियतकालिक ‘टाइम’ने बनवलेली जगभरातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी अनेक बाबतींत विशेष आहे. ‘टाइम’च्या संपादक नेन्सी गिब्स यांच्या मते, टाइम-१०० च्या वार्षिकीमध्ये संबंधित व्यक्तींचे प्रभाव सांगणारे मत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यादीत समाविष्ट व्यक्तींच्या सर्व पैलूंना उजाळा देऊ शकतील, अशा व्यक्तींना आम्ही यासाठी लिहिण्याची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिले आहे. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरन यांनी इराकी नेते हैदर अल अबादी यांची, तर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांनी प्रशंसा केली आहे. पाकिस्तानची युवा समाजसेविका मलाला युसुफजई हिचा सलग तिसऱ्या वर्षी या यादीत समावेश करण्यात आला आहे. पाहुयात यातील काही महत्त्वाच्या व्यकतींविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेली मते...

नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारतातील परिवर्तनाचे शिलेदार - बराक ओबामा
नरेंद्र मोदी लहान असताना कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून वडिलांना चहा विकायला मदत करायचे. ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते आहेत. गरिबी ते पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांच्या संघर्षातून भारताची भविष्यातील गतिशीलता व शक्यतांची जाणीव होते.

त्यांनी भारतीयांच्या मदतीचा दृढ संकल्प केला आहे. गरिबी निर्मूलन, शिक्षणाचे स्तर सुधारणे, महिला व मुलींना सशक्त बनवणे, तसेच जलवायू परिवर्तन पाहता भारताच्या वास्तविक आर्थिक क्षमतेला वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे. भारताप्रमाणेच तेसुद्धा पारंपारिकता आणि आधुनिकतेसह वाटचाल करण्यावर विश्वास ठेवतात. ते योगाचे समर्थक आहेत. भारतीयांशी ट्विटरवरून संपर्कात असतात आणि डिजिटल इंडियाची त्यांची संकल्पना आहे.

नरेंद्र मोदी वाॅशिंग्टनला आले होते तेव्हा आम्ही दोघे मार्टिन ल्युथर किंग यांच्या स्मारकाला भेट दिली. आम्ही किंग आणि गांधीजींच्या आदर्श आणि मूल्यांचे स्मरण केले. दोन्ही देशांची विविधता आणि विश्वास त्यांची शक्ती आहे, ज्याचे आपल्याला संरक्षण करायचे आहे. एकत्र येऊन प्रगती करणारे एक अब्जापेक्षा अधिक भारतीय जगासाठी प्रेरणादायी ठरतील, असा पंतप्रधान मोदींना विश्वास आहे.
(ओबामा अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष आहेत.)
बातम्या आणखी आहेत...