Home | Divya Marathi Special | Nashik Kalaram Mandir Satyagrah 85 years

रामकुंडात उडी घेणारा म्हणाला होता, 'माझे जामीनदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये आहेत'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 02, 2015, 06:12 PM IST

काळाराम मंदिर प्रवेश सत्यागृहाला आज 85 वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त दिव्यमराठी डॉट कॉम या सत्यागृहाच्या आठवणींना उजाळा देत आहे.

 • Nashik Kalaram Mandir Satyagrah 85 years
  काळाराम मंदिर प्रवेश सत्यागृहाला आज 85 वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त 'दिव्य मराठी डॉट कॉम' या सत्यागृहाच्या आठवणींना उजाळा देत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक सत्याग्रहांमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला विशेष महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेबांनी अनेक दिवस विचार केल्यानंतर या सत्याग्रहाचे नेतृत्व करण्याचे मान्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहाचे नेतृत्व करणार हे कळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते. पाच वर्षे 11 महिने, सात दिवस हा सत्याग्रह सुरु होता. 'आम्ही जर हिंदू असू तर आम्हाला मंदिरात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.' ही समानतेची वागणूक मिळावी यासाठीचा हा लढा होता. तो डॉ. बाबासाहेबांसोबत त्यांच्या हजारो अनुयायांनी निकराने लढला होता.
  अशी झाले होती सत्याग्रहाची सुरुवात
  नाशिकच्या काळाराम मंदिराच्या चारही प्रवेशद्वारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात तत्कालिन महार, चांभार आणि मातंग समाजाचे हजारो स्त्री-पुरुष प्रवेशासाठी बसून होते.
  त्याआधी सत्याग्रह समितीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड केली होती. भाऊराव उर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते, तर नाशिकचे शंकरराव गायकवाड हे सभासद म्हणून समाविष्ट झाले होते. या कमिटीतर्फे महाराष्ट्रभर सत्याग्रहाबद्दल जनजागृती करण्यात आली. शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर मूळचे निफाड तालुक्यातील, पण नाशिकला मोठा राजवाडा परिसरात स्थायिक झाले होते.

  पुढील स्लाइडमध्ये वाचा,
  - काय घडले रामकुंडावर
  - कोणी बांधले काळाराम मंदिर

 • Nashik Kalaram Mandir Satyagrah 85 years
  रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर यांच्यावर सोपवण्यात आली. गोदावरीच्या तीरावर जनता सत्याग्रहासाठी सज्ज होती. ब्रिटिश पोलिसही रामकुंडावर पहारा देत होते. शहरात तणावपूर्ण शांतता होती.
  अंगरखा, धोतर, पुणेरी जोडा, पंचा, कपाळावर गंधाचे तीन आडवे पट्टे व मधोमध लाल रंगाचा गोल कुंकवासारखा टिळा अशा वेशात शंकरराव 2 मार्चला रामकुंडावर आले व अंगातील वेश उतरवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. आंबेडकरी चळवळीतील तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी आर.जी. गॉर्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.

  सत्याग्रह यशस्वी करणार्‍या कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मोठया राजवाड्यातील जाहीर सभेत शंकरराव गायकवाड यांना या धाडसाबद्दल बेलमास्तर ही पदवी बहाल करण्यात आली.
  सत्याग्रहाबद्दल गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्यांना तुमचा जामीनदार कुठे आहे’, अशी विचारणा करताच त्यांनी डॉ. आंबेडकर माझे जामीनदार असून ते इंग्लंडमध्ये आहेत, असे सांगितल्याने न्यायालयाने त्यांना सात दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.
  डॉ. आंबेडकर यांनी भारतात परतल्यावर दादासाहेब गायकवाड, सावळीराम दाणी, सखाराम वस्ताद काळे, तुळशीराम काळे, अमृतराव रणखांबे यांच्या उपस्थितीत बेलमास्तरांचा सत्कार केला.

  (काळाराम मंदिर सत्याग्रहावेळी बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी)

  पुढील स्लाइडमध्ये, कोणी बांधले काळाराम मंदिर
 • Nashik Kalaram Mandir Satyagrah 85 years
  काळाराम मंदिर 
  नाशिकचे काळाराम मंदिर हे एक सुंदर मंदिर आहे. सरदार रंगराव ओढेकरांनी साधाऱण तेवीस लाख रुपयांमध्ये 1782 साली हे मंदिर बांधले. राम वनवासात असताना ज्या ठिकाणी राहिला त्या जागेवर हे मंदिर बांधल्याची भक्तांची समजूत आहे. मंदिरात सुवर्णालंकारांनी सजवलेली रामाची मूर्ती आहे. दरवर्षी रामनवमीला येथे रथयात्रा निघते. माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी देवस्थानास दोन रथ भेट दिले. तेच रामनवमीच्या निमीत्त शहरभर मिरवत नेले जातात. 
  गोपिकाबाई नाशिकच्या सरदार रास्त्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या असल्याने या रथांच्या देखभालीची जबाबदारी सरदार रास्त्यांच्या वंशजांकडे आली.  मंदिरातील हे रथ स्पृश्य व अस्पृश्य दोघांनी मिळून ओढण्याची प्रथा सुरुवातीपासुनच चालत आलेली होती.  

  (काळाराम मंदिराचे संग्रहित छायाचित्र)
 • Nashik Kalaram Mandir Satyagrah 85 years
  आठ हजार महारांनी केला सत्यागृह 
  नाशिकचे जिल्हाधाकारी आर. जी. गॉर्डन यांनी मध्यविभागाचे आयुक्त घोषाळ यांना सत्यागृहाची माहिती कळविली होती. त्यांच्या माहितीनुसार 2 मार्च 1930 रोजी नाशिकमध्ये आठ हजार महार जमले होते. त्यांनी पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण चारही दरवाज्यांसमोर ठिय्या दिला होता. या सत्यागृहात सहभागी होण्यासाठी फक्त नाशिक जिल्ह्यातीलच नाही तर रत्नागिरीसारख्या दुरवरच्या भागातून लोक आले होते. 
  जोपर्यंत देवळाचे दरवाजे बंद आहेत तोपर्यंत सत्यागृहीचे पथक ठाण मांडून बसतील असे डॉ. आंबेडकरांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले होते. कोणी दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न केला तर रांगेत जो पहिला त्याने आधी जावे या नियमानुसार सत्याग्रही आपल्याआधी देवळात जाऊ पाहाणार्‍यास प्रतिबंध करतील आणि शांततापूर्ण रीतीने पुढे घुसतील असेही ठरले होते. 
   
   
  (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ छायाचित्र )
 • Nashik Kalaram Mandir Satyagrah 85 years
  कोण-कोण होते आंदोलनात 
  2 मार्च 1930 रोजी सुरु झालेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, डी.व्ही.प्रधान, बाळासाहेब खरे, स्वामी आनंद हे होते. मंदिराचे दरवाजे जिल्हाधिकार्‍यांच्या हुकुमावरुन बंद करण्यात आले होते. चारही दरवाजांजवळ सत्याग्रहींचे पथक ठाण मांडून होते. उत्तर दरवाज्याजवळ पतितपावनदास, पूर्व दरवाजा येथे कचरू मथुजी साळवे, दक्षिण दरवाजा येथे पांडूरंग नथूजी राजभोज आणि पश्चिम दरवाजाजवळ शंकरदास नारायणदास नेतृत्व करत होते. बाबासाहेब आणि भाऊराव गायकवाड सर्व व्यवस्था पाहात होते. 
   
  स्त्रियांचाही मोठा सहभाग 
  दरवाजापाशी धरणे धरून बसलेल्या सत्याग्रह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया देखील होत्या. विशेषम्हणजे नाशिक सत्याग्रहानंतर महात्मा गांधींचा मीठाचा सत्यागृह झाला.  गांधीजींनी केलेली आंदोलने ही परकीय राजवटीविरुद्ध होती. तर बाबासाहेबांचा सत्याग्रह हा स्वकीयांविरुद्ध होता. त्याचवेळी परकीय अधिकार्‍यांविरुद्ध. त्यांना एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर लढावे लागत होते. 

  (काळाराम मंदिरातील श्रीराम मूर्ती)

Trending