Home | Divya Marathi Special | naxal target police inspector

नोकरी सोडा किंवा परिणाम भोगा

दिव्य मराठी टीम (धमतरी) | Update - Jun 04, 2011, 01:12 PM IST

धमतरी जिल्ह्यातील धूर या नक्षलवादी भागात बेलरबाहरा येथे नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षकांना अशी धमकी दिली आहे की, काम सोडा, राजीनामा द्या आणि निघून जा.

  • naxal target police inspector

    धमतरी जिल्ह्यातील धूर या नक्षलवादी भागात बेलरबाहरा येथे नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षकांना अशी धमकी दिली आहे की, काम सोडा, राजीनामा द्या आणि निघून जा.

    गावातील लोकांमध्ये अशी पत्रके वाटून नक्षलवाद्यांनी सांगितले की, सात दिवसांच्या आत एस.पी. राजीनामा देऊन गेले नाहीत तर तीरन मांझीप्रमाणे त्यांनाही जीव गमावण्याची तयारी ठेवावी लागेल. या इशा:यामुळे सिहावा अंचल येथे दहशतीचे वातावरण पसरले आहे. एस.पीं.च्या हत्येचे प्रकरण या जिल्ह्यात पहिलेच आहे. अंचल गावाला नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पोलिसांची मदत करणा:या विशेष पोलिस अधिका:यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

    आठवड्याच्या आत या अधिका:यांनी आपला राजीनामा दिला नाही तर त्यांनाही आपला जीव गमवावा लागेल. एस.पीं.वर नक्षलवाद्यांचा दबाव पडत आहे. त्यांच्या गावात, घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देऊन भीती दाखवण्यात येत आहे. तीरन मांझी या अधिका:याची नक्षलवाद्यांनी गळा घोटून हत्या केली होती. त्यांच्या दबावाला हा अधिकारी बळी पडला नव्हता. एस.पी. अविनाश मोहंती यांनी सांगितले की, तीरन मांझी यांच्या मारेक:यांचा तपास पोलिस करत आहेत. नक्षलवाद्यांच्या धमकीला भीक घालू नका. पोलिस प्रत्येक अधिका:याच्या पाठीशी आहे.

Trending