आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्या दिवशीच पावली हाेती नीरजा, विमान अपहरणकर्त्या दहशतवाद्यांशी केले होते दोन हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९८६ : अाजच्या दिवशी भारताच्या नीरजा भानाेतचा कराचीत मृत्यू झाला हाेता. नीरजा पॅन अमेरिका वर्ल्ड एअरवेजची कर्मचारी हाेती. मुंबईहून न्यूयाॅर्कला जाणाऱ्या पॅन एम-७३ या विमानाचे कराचीत चार दहशतवाद्यांनी अपहरण केले हाेते. नीरजा या विमानात वरिष्ठ हवाई सुंदरी हाेती. तिच्या सूचनेवरून चालक दलाचे तिन्ही सदस्य काॅकपिटमधून पळून गेले हाेते. त्यामुळे विमानात सर्वात वरिष्ठ विमान कर्मचारी तीच हाेती. 

अपहरणाच्या सुमारे १७ तासांनंतर दहशतवाद्यांनी प्रवाशांची हत्या करणे व विमानात स्फाेटके ठेवणे सुरू केले. नेमकी याच वेळी नीरजा अापत्कालीन दरवाजा उघडण्यात यशस्वी झाली; परंतु ती स्वत: विमानातून पळाली नाही, तर तिने प्रवाशांना पळून जाण्यास मदत केली. तसेच दहशतवाद्यांनी गाेळीबार सुरू करताच प्रवाशांना वाचवण्यासाठी ती दरवाजात उभी राहिली. भारत सरकारने तिला मरणाेत्तर अशाेकचक्राने सन्मानित केले. यासह पाकिस्तान व अमेरिकेच्या सरकारनेदेखील नीरजाला सन्मानित केले.

विशेष : २०१६ मध्ये नीरजा भानाेतच्या जीवनावर ‘नीरजा’ नावाचा हिंदी चित्रपट बनला हाेता. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार साेहळ्यात हा चित्रपट सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपट म्हणून निवडला गेला.
बातम्या आणखी आहेत...