आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neeru Abrol Chairman And Managing Director Of National Fertilizers News In Marathi

नॅशनल फर्टिलायझर्समध्ये सर्वोच्च पदावरील एकमेव महिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणापासून नीरू यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी नववीनंतर विज्ञान विषय घेतला. अलिगड मुस्लिम विद्यापीठातून वैद्यकीय पूर्वशिक्षण घेण्यास गेल्या. त्याच वर्षी विद्यापीठात आंदोलन झाल्यामुळे डॉक्टरकीचे स्वप्न भंगले. वर्ष वाया जाऊ नये म्हणून बीएस्सी केमिस्ट्री केले. दिल्लीत परतल्यावर चांगले करिअर घडवण्यासाठी काही तरी नवे शिकायचे होते. गणित चांगले होते, त्यामुळे सीए करायचे ठरवले. हाच सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला.

सीएमध्ये तीन वर्षांची आर्टिकलशिप केल्यानंतर ओळखीच्याच रघुनाथ राय कंपनी या फर्ममध्ये रुजू झाल्या. तेथे त्या एकट्याच महिला होत्या. धीर खचू लागला; पण पुढे जायचेच, हे ध्येय होते. या काळात त्यांना आरबीआयचे ऑडिट इत्यादींसारखी अनेक मोठी कामे करण्याची संधी मिळाली. नोव्हेंबर 1980 मध्ये सीए पास झाल्या. 1981 मध्ये त्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ज्युनियर फायनान्स मॅनेजर पदावर रुजू झाल्या. हा पहिला ब्रेक ठरला. नीलू सांगतात, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात कुणीच ओळखीचे नव्हते. इंटरव्ह्यू झाला. शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळाली. इंटरव्ह्यूला त्या एकमेव महिला होत्या. नीरू सांगतात, आर्टिकलशिपसाठी त्यांना अनेक कंपन्यांमध्ये जावे लागते. त्यामुळे मुलींना सीए व्हावे वाटत नव्हते.

पहिल्याच वर्षी त्यांना बेस्ट एक्झिक्युटिव्ह अवॉर्ड मिळाला. त्या कंपनीत आल्या तेव्हा डॉ. कृष्णमूर्ती अध्यक्ष होते. नीरू यांची मेहनत आणि चिकाटीने ते खूप प्रभावित झाले होते. 2005 मध्ये त्यांना जीएम फायनान्स हे पद देण्यात आले. नीरू यांना थांबायचे नव्हते. एनएफएलच्या डायरेक्टर फायनान्सच्या पदासाठी अर्ज केला. फेब्रुवारी 2007 मध्ये निवड झाली आणि ऑक्टोबरमध्ये एनएफएलमध्ये आल्या. हा दुसरा ब्रेक होता. आठ महिन्यांतच पानिपत, बठिंडा, नांगल आणि विजयपूर प्लांट फ्युएल ऑइलपासून नैसर्गिक वायूवर आणण्यासाठी 4 हजार 300 कोटींचा निधी दिला. हा दुसरा टर्निंग पॉइंट ठरला. पीएसबीने जून 2011 मध्ये सीएमडीसाठी सिलेक्शन झाले. खूप संघर्षानंतर ऑगस्ट 2013 मध्ये सीएमडी बनल्या. हा तिसरा ब्रेक ठरला.

जन्म : 7 फेब्रुवारी 1955
कुटुंब : लग्न केले नाही. आई-शांतिदेवी, बहीण- रेणू तुली, भाऊ- अशोक अब्रोल
चर्चेचे कारण : वर्ल्ड एचआरडी काँग्रेसने नुकतेच त्यांना ग्रेटेस्ट कॉर्पोरेट लीडर्स ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित केले.