आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेल्सन मंडेला:कॉलेजपासून क्रांतीची सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंडेला यांनी हेल्डटाउनमधून पदवीचे शिक्षण घेतले. हेल्डटाउन कृष्णवर्णीयांसाठी तयार करण्यात आलेले विशेष कॉलेज होते. तेथे त्यांची भेट ऑलिव्हर टाम्बो यांच्याशी झाली. त्यांची मैत्री आयुष्यभर टिकली. 1940 पर्यंत मंडेला व टाम्बो यांना कॉलेज कॅम्पसमध्ये आपले राजकीय विचार व कार्यातून लोकप्रियता मिळाली होती. कॉलेज प्रशासनाला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा दोघांनाही महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले.
क्रांती सोडून विवाह करावा, कुटुंबाची इच्छा
मंडेला यांच्या क्रांतिकारक वागणुकीने त्यांचे कुटुंबीय त्रस्त झाले होते. त्यांनी घरी परतावे, असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटे. म्हणूनच त्यांच्यासाठी मुलगी पाहिली होती. त्यांना विवाहबंधनात अडकवण्याची योजना होती. दुसरीकडे मंडेला यांचे मनाचीही घालमेल सुरू होती. विवाहाचे नाव ऐकताच ते घर सोडून जोहान्सबर्गला गेले.
जोहान्सबर्गमधून संघर्षाला सुरुवात
जोहान्सबर्गला आल्यानंतर त्यांनी सोन्याच्या खाणीत चौकीदाराची नोकरी केली. अलेक्झांड्रा वस्तीत राहू लागले. त्याच काळात त्यांची मुलाखत वॉल्टर सिसुलू व वॉल्टर अल्बर्टाइन यांच्याशी झाली. मंडेलांच्या राजकीय जीवनावर या दोघांचाही प्रभाव पडला. हे तिघेही वर्णभेदाच्या विरोधात होते. नंतर मंडेला यांनी एका कायदेविषयक फर्ममध्ये नोकरी केली.
विवाह करून राजकारण सुरू
1944 मध्ये मंडेला यांनी इव्हलिन मेस यांच्याशी विवाह केला. त्यांचे मित्र वॉल्टर सिसुलू यांच्या त्या भगिनी होत्या. त्याचकाळात मंडेला आफ्रिकेच्या नॅशनल काँग्रेसमध्ये सहभागी झाले. लवकरच त्यांनी टाम्बो, सिसुलू व आपल्या काही मित्रांच्या मदतीने आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची युवक आघाडी तयार केली. 1947 मध्ये मंडेला त्याचे सचिव बनले.
जन्म घेत होता एक महान नेता...
मंडेला यांच्या विचारशैली व कामामुळे सामान्य माणूस प्रभावित होऊ लागला. त्याच काळात एका महान नेत्याने जन्म घेतला होता. त्यांनी एकिकडे कायद्याचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. परंतु व्यग्रतेमुळे कायद्याची परीक्षा देऊ शकले नव्हते. त्याचवेळी आफ्रिका नॅशनल काँग्रेस निवडणुकीत पराभूत झाली. तत्कालीन अध्यक्षांना पदावरून हटवून नवीन अध्यक्ष बनवण्याची मागणी सुरू झाली. सिसुलूने एक र् योजना बनवली. त्याला पक्षाने स्वीकारले होते. 1951 मध्ये मंडेला यांना युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. आपल्या लोकांना कायद्याची लढाई लढता यावी यासाठी सन 1952 मध्ये त्यांनी कायदेविषयक संस्थेची स्थापना केली.
गांधीजींचा प्रभाव
त्या काळी जगभरात महात्मा गांधी यांचा प्रभाव होता. गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने मंडेलादेखील भारावले होते. वैचारिक पातळीवर ते स्वत: गांधींच्या निकट समजत. म्हणूनच हा प्रभाव त्यांनी केलेल्या प्रत्येक आंदोलनातून स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेला दिसत असे. काही दिवसांतच त्यांची फर्म वर्णभेदाच्या विरोधात लढणारी देशातील पहिली फर्म बनली होती.
सरकारच्या डोळ्यात खुपू लागले
सरकारला त्यांची वाढती लोकप्रियता खुपत होती. त्यांच्यावर निर्बंध लावण्यात आले. वर्णभेदाच्या मुद्द्यावरून त्यांना जोहान्सबर्गबाहेर काढण्यात आले. बैठकीला हजर राहण्यास विरोध करण्यात आला.
बनवला ‘एम’ प्लान
सरकारने मंडेला यांच्यावर दमननीतीचा वापर केला. परंतु मंडेला व ऑलिव्हर टाम्बो यांनी ‘एम प्लॅन’ बनवला. एम अर्थात मंडेला होता. काँग्रेसचे तुकडे करून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. गरज भासल्यास भूमिगत राहून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्बंध असतानाही ते क्लिप टाऊनला दाखल झाले. काँग्रेसच्या सभांमध्ये त्यांनी हजेरी लावली. लोकांचा विरोध असतानाही त्यांनी वर्णभेदातून स्वातंत्र्य मिळावे, यासाठी संघर्ष करणा-या संघटनांसोबत काम केले.
इव्हलिनने साथ सोडली
सतत आंदोलनात सक्रिय असलेल्या मंडेला कुटुंबासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे पत्नी इव्हलिन यांच्यासोबत त्यांचा दुरावा वाढला. त्यातून इव्हलिन यांनी त्यांची साथ सोडली.
आंदोलन तीव्र, अटकसत्र सुरू
आंदोलन हेच मंडेला यांच्यासाठी जीवनाचा जोडीदार बनले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची धार वाढतच होती. सरकार हादरले होते. त्या दरम्यान पक्षाने स्वातंत्र्याचा प्रस्ताव मांडला. त्यातून सरकारचा संयम तुटला. संपूर्ण देशात अटकसत्र सुरू झाले. मंडेला व पक्षाच्या अध्यक्षांसह 156 नेत्यांना अटक झाली. देशाच्या विरोधात युद्ध पुकारल्याबद्दल मंडेला व सहका-यांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. त्या गुन्ह्याची शिक्षा मृत्युदंड होती. परंतु 1961 मध्ये मंडेला व 29 सहका-यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. त्याच खटल्याच्या काळात त्यांची भेट नोमजामो विनी मेडिकीजाला अर्थात विनी यांच्याशी झाली. त्याच दरम्यान ते दोघे विवाहबध्द झाले.
अहिंसेवरील विश्वास उडाला
दक्षिण आफ्रिका सरकारची दडपशाही आणखी वाढली. मंडेला यांचा जनाधारही वाढत होता. त्याचकाळात सरकारने कृष्णवर्णीयांच्या विरोधातील काही कायदे मंजूर केले. दक्षिण आफ्रिकेतील शार्पविले शहरात निदर्शनादरम्यान आफ्रिकन पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. त्यात 180 नागरिक ठार झाले आणि 69 जण जखमी झाले. त्यानंतर मंडेला यांचा अहिंसेवरील विश्वास उडून गेला.
अत्याचार वाढू लागले
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले होते. आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि इतर पक्षांनी सशस्त्र लढा देण्याचा निर्णय घेतला. दोघांनी सशस्त्र दल तयार केले. दलाचे नाव ‘स्पीअर ऑफ द नेशन ’ असे ठेवण्यात आले. मंडेला यांना त्याचे अध्यक्ष करण्यात आले. सरकारने त्यांच्या दलावर बंदी घातली. मंडेला यांच्यावरील बंदीनंतर जगभरातून सरकारवर टीकेची झोड उठली. मंडेला यांचा जागतिक नेता म्हणून उदय झाला होता. सरकारचे लक्ष मात्र त्यांना अटक करून त्यांची संघटना संपवण्याकडे होते.
देशातून पलायन, गोरिला लढाई शिकले
सरकारकडून होणा-या कारवाईच्या भीतीने मंडेला यांनी देशातून पलायन केले. सर्वात अगोदर त्यांनी आदिस अबाबामध्ये आफ्रिका नॅशनलिस्ट लीडर्स कॉन्फरन्सला मार्गदर्शन केले. तेथून अल्जेरियाला गेले, गनिमी लढाई शिकले. पुन्हा लंडनला गेले, तेथे टाम्बो त्यांच्यासोबत आले. लंडनमध्ये विरोध पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आणि जगाला आंदोलनाचा अर्थ समजावून सांगितला. त्यानंतर पुन्हा ते मायदेशी पोहोचले. तेथे त्यांना लगेच अटक झाली.
जन्मठेप, काळ्या पाण्याची शिक्षा
मंडेला यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. बेकायदा देशाबाहेर गेल्याचा आरोप ठेवण्यात आला. क्रांतीचे प्रणेते असल्याचे सरकारला अमान्य होते. त्याचदरम्यान जोहान्सबर्गच्या लिलिसलीफमध्ये सरकारने छापा मारून मंडेला यांच्या मुख्यालयाची नासधूस केली. सर्व नेत्यांना पकडले. नेल्सन यांच्यासह सर्व लोकांवर देशाच्या विरोधात युद्ध केल्याचा ठपका ठेवून जन्मठेप सुनावण्यात आली. त्यांना रोबेन बेटावर पाठवण्यात आले. त्याला दक्षिण आफ्रिकेची काळ्या पाण्याची शिक्षा म्हटले जाते.
न्यायालयात जबाब
‘संपूर्ण जीवनकाळात मी आपले सर्वकाही आफ्रिकन लोकांच्या संघर्षासाठी घालवले. मी गो-यांच्या वर्णभेदाच्या विरोधात लढलो आहे. कृष्णवर्णीय वर्णभेदाविरुद्धही मी लढा दिला. मी नेहमीच एक मुक्त व लोकशाही समाजरचनेचे स्वप्न पाहिले आहे. जेथे सर्व लोकांना परस्परांचा आदर, प्रेम व सन्मानाची समान संधी मिळावी. हा आदर्श आहे, तो माझ्या जीवनाची एक आशा बनली आहे. मी ते मिळवण्यासाठीच जगत आहे. वेळ आल्यास त्यासाठी प्राण देण्याचीही माझी तयारी आहे.’
या शब्दांनी आंदोलनाला नेहमीच एक नवीन ऊर्जा दिली. 1976 मध्ये पोलिस मंत्री जिमी क्रूगर हे नेल्सन यांच्याकडे सरकारकडून एक प्रस्ताव घेऊन गेले. त्यांनी आंदोलन स्थगित करावे. तसे झाले तर त्यांची मुक्तता करेल, असे आमिष ठेवण्यात आले होते.
सरकारवर दबाव, पहिला विजय
वर्णभेदी सरकारवर जगभरातून दबाव वाढत होता. सरकारने मंडेला व सिसुलूला रोबेन बेटावरून आफ्रिकेवर आणून केपटाउनजवळ पाल्समूर तुरुंगात ठेवले. नेता म्हणून त्यांचा हा पहिला विजय होता. आपल्या प्रभावातून सरकारला झुकवण्यात ते यशस्वी ठरले. परंतु यात त्यांची प्रकृती बिघडली. सरकारने आणीबाणी जाहीर केली. मंडेला यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्रोस्टेट ग्लँडची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर सरकार मंडेला यांच्याविषयी काहीसे नरमले.
सरकारकडून विनवणी, आंदोलनावर ठाम
कायदा मंत्री कोबी कोएत्जी यांनी स्वातंत्र्यासाठी हिंसेचा मार्ग सोडण्याचे आवाहन केले. परंतु मंडेला यांनी इन्कार केला. ते भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर सरकारने त्यांच्यावर सवलतींचा पाऊस पाडला. कुटुंबीयांना भेटण्याची मुभा, जेल वॉर्डनसोबत केपटाउनमध्ये भटकंती करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे बाहेरच्या जगात मोकळा श्वास घेण्यास मंडेला यांनी सुरुवात केली होती.
मृत्यूच्या उंबरठ्यावर, टीबीचे निदान
1983 मध्ये मंडेला मृत्यूच्या उंबरठ्यावर आले होते. त्याचे निदान करण्यात आले, तेव्हा त्यांना क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाले. उपचारासाठी त्यांना पार्लजवळील व्हीक्टर तुरुंगात पाठवण्यात आले.
11 फेब्रुवारी 1990 मध्ये सुटका
वर्णभेदाच्या विरोधातील संघर्ष टिपेला पोहोचला होता. 1989 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सत्तांतर झाले. उदारमतवादी एफ. डब्ल्यू. क्लार्क यांच्या हाती देशाची सुत्रे आली. सत्तारुढ होताच त्यांनी कृष्णवर्णीयांवरील निर्बंध हटवले. त्याचबरोबर राजकीय कैद्यांचीही सुटका केली. मंडेला त्यापैकी एक होते. 11 फेब्रुवारी 1990 मध्ये मंडेला यांची सुटका झाली.
स्वातंत्र्यानंतर राज्यघटना बदलली
कृष्णवर्णीयांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी 1991 मध्ये ‘कन्व्हेंशन फॉर ए डेमोक्रॅटिक साऊथ आफ्रिका’ची स्थापना झाली. देशाची राज्यघटना बदलली. पुढल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदरहित निवडणूक झाली. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा विजय झाला. मंडेला राष्ट्राध्यक्ष झाले.
राजकारणातून निवृत्ती
@1997 मध्ये मंडेला सक्रिय राजकारणातून बाहेर.
@ 1999 मध्ये पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा.