आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादमध्ये नवे अ‍ॅप : कर्मचारी फोटो पाठवून सांगतील ठावठिकाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - कामचुकार कर्मचार्‍यांना आळा घालण्यासाठी अहमदाबाद महानगरपालिकेने (एएमसी) एक उपाय शोधला आहे. एएमसीने त्यासाठी विशेष मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. यामुळे फील्डवर जाणारे कर्मचारी अधिकार्‍यांच्या डोळ्यात धूळफेक करू शकणार नाहीत. कर्मचार्‍यांना कामावर गेल्यानंतर त्या ठिकाणचा फोटो अ‍ॅपमध्ये अपलोड करावा लागणार आहे.

कर्मचारी कामाच्या जागीच आहे हे दिसावे अशा पद्धतीने फोटो काढावा लागेल. मनपाने प्रायोगिक तत्त्वावर दोन विभागांतील कर्मचार्‍यांच्या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. अ‍ॅप जीपीएस आधारित असल्यामुळे ई-देखरेखीपासून बचाव करण्याची कोणतीही पळवाट यात नाही. त्यामुळे कर्मचार्‍याचे लोकेशन मुख्य सर्व्हरशी जोडलेल्या अधिकार्‍याला समजेल. त्याने काही गडबड करण्याचा प्रयत्न केल्यास ही बाब लपून राहणार नाही. अधिकारी-कर्मचारी ठरवून दिलेल्या ठिकाणी वेळेवर पाेहोचला किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी अ‍ॅप आले आहे. एएमसीच्या ई-प्रशासन विभागाने हे अॅप तयार केले आहे.
रस्ता आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहे.

आतापर्यंतची स्थिती : महानगरातील रस्ते बांधकामाचे काम रात्रंदिवस चालते. सायंकाळी सहा वाजता मनपातून देखरेखीचे आदेश जातात. यानंतर संबंधित अधिकारी साइटवर जात असत. अॅप आल्यामुळे अधिकार्‍याला संबंधित ठिकाणी जाणे बंधनकारक होईल. याशिवाय कामाची गुणवत्ताही सुधारेल.