आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या संगोपनात नव्या पिढीचे पालक असा घडवताहेत बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळ बदलत आहे. प्रत्येक जण मुलांच्या विकासाची संकल्पना मनाशी बांधून मुलांमागे धावत आहेत. १९६५ ते १९९० दरम्यान जन्मलेल्या पिढीवर (मिलेनिअल पॅरेंट्स) आपल्या मुलांच्या संगोपनाचे नवीन आव्हान आहे. अमेरिकेत मिलेनिअल पॅरेंट्सची संख्या दोन कोटी वीस लाखांपेक्षा अधिक आहे. दररोज ९ हजार बालके जन्माला येतात. उशिरा विवाह करणारे पूर्वीच्या कुठल्याही अन्य पिढीच्या तुलनेत आई-वडिलांच्या परंपरागत भूमिकेत बंदिस्त नाहीत. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक गंभीर आर्थिक संकटाच्या काळात नोकरी करणाऱ्या मिलेनिअल लोकांनी अशा संस्कृतीला आकार दिला जेथे प्रत्येक जण आपले वरिष्ठ, सहकारी, कुटुंब आणि मित्रांची सोबत करण्याची अपेक्षा केली जाते. स्मार्ट फोन आणि सोशल नेटवर सोबत आई- वडिलांची भूमिका अशी पार पाडत आहेत जसे पहिले कुठल्याही पिढीने केले नाही. त्यांच्या वाट्याला सार्वजनिक टीका आणि स्तुतीही आहे.

हे तरुण आपल्या कुटुंबाला एका छोट्या लोकशाहीप्रमाणे वागणूक देत आहेत. ते छोट्या- छोट्या निर्णयांमध्ये पत्नी, मुले आणि मित्रांचा सल्ला घेतात. ते मुलांना नवीन गोष्टी शिकवत आहेत. स्वत:चे अनुभव चित्रित करून जगभरात ते दाखवतात. पालकांच्या रूपात मिलेनिअल्स आशावादी आहेत. त्यांचा प्रगती, समानता आणि गुगलवर विश्वास आहे. ते सेल्फीचे विशाल भांडार उभे करत आहेत. या पिढीसमोर आता हा प्रश्न आहे की, त्यांचा विश्वास, सवयी आणि व्यवस्था त्यांच्या मुलांच्या आयुष्याला कशाप्रकारे आकार देतील.

क्लीवलँडच्या अली डिप्लेटचॅट (३१) यांना इतर मिलेनिअल पालकांसारखे दुसऱ्या कुटुंबांशी तुलना करणे पसंत आहे. ९० टक्के मिलेनिअल सोशल मीडिया वापरत असल्याचे मार्केट रिसर्च फर्म ई-मार्केटरचे म्हणणे आहे. त्याच्या तुलनेत ७६ टक्के जनरेशन एक्स (१९६० ते १९८० दरम्यान जन्मलेले), ५९ टक्के बेबी बूमर्स(दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेले) सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत. याचा परिणाम म्हणजे यातील अनेक वेबवर आपल्या कुटुंबाची खरी माहिती देत आहेत.

पालकांना जेथे आपल्या पाल्याबाबत सर्वकाही सांगण्याचा गर्व होईल असा प्लॅटफॉर्म सोशल मीडिया बनला आहे. मिलेनिअल्सकडे २४ तास चालणारा प्लॅटफॉर्म आहे. एचडी व्हिडिओसुद्धा आहे, ज्याचा उपयोग करण्यात त्यांना कुठलाही संकोच नाही. सिएटलमध्ये लेखिका डेनिअॅले कॅम्पोसोर (२८) गेल्या वर्षी जेव्हा प्रसूतिगृहात गेल्या त्यावेळी त्यांचे दोन मित्रही सोबत होते. ते फक्त त्यांच्या खांद्याच्या वरचे छायाचित्र घेऊ शकतील अशी अट होती. डेनिएलेचा मुलगा मथायसचा जन्म झाल्यानंतर तत्काळ त्यांनी छायाचित्र घ्यायला सुरुवात केली. पहिल्या श्वास घेतल्याच्या काही क्षणातच तो ऑनलाइन असल्याचे त्या सांगतात. आपले मूल सुंदर असल्याचे ऐकायला कुणाला आवडणार नाही.

आदर्श पालक होण्याचा दबाव मिलेनिअल्सवर आहे. फेब्रुवारीत पॅरँटिंग साइट बेबी सेंटरने आधुनिक मातांवर आपला वार्षिक अहवाल सादर केला. त्यांनी १८ ते ४४ वर्षे वयाच्या २७०० अमेरिकन मातांचे सर्वेक्षण केले. जवळपास ८० टक्के मिलेनिअल आयांचे म्हणणे आहे की सुयोग्य आई होणे महत्त्वाचे आहे. जनरेशन एक्समध्ये हे प्रमाण ७० टक्के होते. पालक होणे आव्हानात्मक असल्याचे सर्व वयाच्या ७० टक्के मातांनी मान्य केले. मिलेनिअल्ससाठी ही प्रतिस्पर्धा फार लवकर सुरू होते. टाइम नियतकालिक आणि सर्वेमंकीच्या सर्वेक्षणामध्ये ४६ टक्के मिलेनिअल्स पालकांनी सांगितले की, त्यांनी आपल्या पाल्याचा फोटो एकतर गर्भात असताना किंवा जन्माच्या दुसऱ्या दिवशी पोस्ट केला. जनरेशन एक्सच्या १० टक्के जोडप्यांनी असे केले. तसे वर्तमान डिजिटल नाक्यावर पालकत्वाशी संबंधित प्रत्येक पोस्ट शेअर करण्याची किंमतही मोजावी लागते. प्रत्येक पोस्ट किंवा ट्विटवर मित्रांच्या प्रतिक्रिया येतात. ऑनलाइन लोक अशा कमेंट्स करू शकतात, ज्या ते पालकांसमोर करू शकत नव्हते.

प्रचंड चेष्टेनंतरही सर्वाधिक मिलेनिअल पालक अद्यापही ऑनलाइन आहेत. जर त्यांना आपल्यासारख्या व्यक्तीला ऑनलाइन सहारा नाही मिळाला तर ते एकटे पडतील, असे घरात राहून मुलांचे संगोपन करणारे वडील म्हणतात. प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया असते, त्यामुळे नातेवाईक आणि मित्रांकडून प्रोत्साहन मिळते. मिशीगन युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्रोफेसर असलेल्या सरिता स्कोनेबेकने फेसबुक वापरासंदर्भात काही मातांसोबत चर्चा केली होती. त्यांचे म्हणणे होते की, बाळाचा फोटो अपलोड केल्यानंतर मिळणारी प्रत्येक लाइकमुळे आई होण्याच्या कठीण काळात ते मदत म्हणून चांगले वाटते.

मुलांच्या पालन-पोषणासंबंधी माहितीचा भांडार उपलब्ध आहे. मुलांनी मोबाइल, कॉम्प्युटर पाहावा की नाही, झोपेची वेळ, डायपरचे व्रण आणि प्राकृतिक उपचारासह अन्य कंगोऱ्यांसंबंधात मिलेनिअल्स अन्य लोकांच्या तुलनेत गुगलवर जास्त माहिती शोधतात. अनेक लोक पुस्तकांची मदत घेतात. सर्व वयाचे पालक आपल्या आई- वडिलांचा सल्ला घेण्याची शक्यता जास्त असते. मिलेनिअल्स फेसबुक, ट्विटर, ब्लॉग आणि अॅपचा वापर करतात.

मिलेनिअल्स त्यांच्या आई-वडिलांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहेत. ते जास्त वय झाल्यावर पालक बनलेत. पहिल्यांदा आई बनण्याचे सरासरी वय २६ आहे. १९७० मध्ये ते २१ वर्षे होते. आणखी एक परिवर्तन मुलांसाठी गोष्टी मिळवण्यात दबाव टाकण्याशी संबंधित आहे. त्याला हॅलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणतात. मिलेनिअल्सचे पालक त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवतात.
पालक आता मुलांभोवती घुटमळतात (ड्रोन पॅरेंटिंग) मात्र त्यांना सल्ला देणे किंवा त्यांच्यसाठी काही निवडण्याऐवजी मुलांच्या कलानुसार ते निर्णय घेतात. अनेक संशोधकांची विचार करण्याची पद्धत आहे, मुलांना गरजेपेक्षा जास्त सल्ले देण्याऐवजी पालक कुटुंब चालवण्यासाठी लोकशाही प्रक्रियेचा अवलंब करतात. ते मुलांचे मत जाणण्याचा प्रयत्न करतात. मुलांना बंधनात बांधले जाऊ शकत नसल्याचे ६१ टक्के मिलेनिअल पालक मान्य करत असल्याचे मार्केटिंग फर्म फ्यूचरकास्टच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. वयात आल्यावर मुलांनी मोकळ्या मनाची, बुद्धिवादी, जिज्ञासू व स्पष्टवक्ते असावे, असे मिलेनिअल पालकांची इच्छा आहे.

मिलेनिअल्स व दुसऱ्या कुटुंबाबाबत काय विचार करतात?
मागील पिढ्यांच्या तुलनेत नाव ठेवणे, खेळण्यांच्या निवडीसह इतर प्रकारांत मिलेनिअल्सचे विचार वेगळे आहेत. टाइम नियतकालिक - सर्वेक्षण मंकीनुसार १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांच्या दोन हजार पालकांच्या सर्वेक्षणातील काही निष्कर्ष.

>पालकांनी सोशल मीडियावर आपल्या पाल्याचा फोटो शेअर नाही केला. मिलेनिअल्स - १९ टक्के, जेन एक्स - ३० टक्के, बेबी बूमर्स - ५३ टक्के.
>पालक विचार करतात, त्यानुसार त्यांच्या मित्रांची मुले सर्वाधिक खेळांत भाग घेतात. मिलेनिअल्स - ३६ टक्के, जेन एक्स ५० टक्के, बेबी बूमर्स ५३ टक्के.
>पालकांनी विचार करून अापल्या पाल्यांसाठी अशी खेळणी घेतली ज्यात लिंगभेदाचा काहीच संबंध नाही. मिलेनिअल्स - ५० टक्के, जेन एक्स ३४ टक्के, बेबी बूमर्स ३४ टक्के.
>पालक विचार करतात, मुलाचे नाव वेगळे आणि अर्थपूर्ण अाहे. मिलेनिअल्स - ६० चक्के, जेन एक्स ४४ टक्के, बेबी बूमर्स ३५ टक्के.
>पालकांचे म्हणणे आहे, मुलाच्या जन्मापूर्वी जाेडप्यासाठी विवाह फार महत्त्वाचा आहे. मिलेनिअल्स - ४२ टक्के, जेन एक्स ४९ टक्के, बेबी बूमर्स ५१ टक्के.
>घरात राहून मुलांचे संगोपन करणारे पालक. मिलेनिअल्स - २३.२%, जेन एक्स १६%, बेबी बूमर्स २२%.
मिलेनिअल्स- १९६५ ते १९९० दरम्यान जन्म
जनरेशन एक्स- १९६० ते १९८० दरम्यान जन्म
बेबी बूमर्स- १९४६ ते १९६४ दरम्यान जन्म