देशात मध्यमवर्गीय कुटुंबापासून ते कमी उत्पन्न गटातील घरांमध्येही वाहनांचा उपयोग कोणत्या ना कोणत्या रूपात होतच असतो. सध्याच्या काळात वाहन ही लोकांची मुलभूत गरज बनली आहे. त्यामुळेच वाहनांचे उत्पादनही वाढलेले आहे. यासाठी उत्पादन कंपन्यांना तसेच याचे सुटे भाग निर्माण करणाऱ्यांना तशा व्यावसायिकांची गरज असते. देशातील वाहनांच्या वाढत्या उत्पादनाने या क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झालेल्या आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळानुसार भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्रात पुढील पाच वर्षांपर्यंत दरवर्षी २० लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऑटोमोबाइल क्षेत्र हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. देशाच्या जीडीपीमध्ये याचा ७.१ टक्के वाटा आहे. ऑटोमोबाइलमध्ये सर्वाधिक म्हणजे ८१ टक्के वाटा दुचाकींचा आहे. इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशननुसार २०२० पर्यंत प्रवासीव वाहनांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा ८ टक्के वाटा होईल. २०१५ मध्ये हा २.४० टक्के होता. दुचाकी वाहनांचे उत्पादन २०१६ च्या १.८८ कोटी युनिटवरून २०२० पर्यंत ३४ कोटी युनिट्स होणार आहे. याचबरोबर देशातील प्रवासी वाहनांची विक्री पुढील १० वर्षांत १३ टक्के वेगाने वाढणार आहे. यावरून असे दिसते की, हे क्षेत्रा पुढील काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढेल. ज्यामुळे रोजगारांच्या संधी वाढणार आहेत.
आॅटोमोबाइल इंजिनिअरिंगमध्ये मोटार, ट्रक, मोटरसायकल, स्कूटर यांचे डिझायनिंग, डेव्हलपिंग, मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग, रिपेअरिंग, सर्व्हिसिंग यांचा समावेश आहे.
डिझायनिंगपासून मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत ऑटोमोबाइल इंजिनिअर, इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि सॉॅफ्टवेअर या शाखांचाही उपयोग होतो.
ऑटोमोबाइल इंजिनिअरचे प्रमुख काम कोणत्याही कॉन्सेप्टचे डिझायनिंगपासून उत्पादनापर्यंत जबाबदारीने पार पाडावे लागते. ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगचे अनेक उपविभाग असतात, ज्यात स्पेशलायझेशन करता येते. या उपविभागामध्ये इंजिन सिस्टम, इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल सिस्टम, फ्ल्यूड मेकॅनिक्स, थर्मोडायनामिक्स, एरोडायनामिक्स यांचा समावेश आहे. ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग साधारणपणे तीन विभागात विभागले जाते. प्रॉडक्ट किंवा डिझाइन इंजिनिअर, डेव्हलपमेंट इंजिनिअर आणि मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअर. प्रॉडक्ट किंवा डिझाइन इंजिनिअर डिझायनिंग आणि टेस्टिंगचे काम पाहतो. मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअर, प्रॉडक्ट जोडण्याचे काम करतो. सर्व सिस्टम जोडणे तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे जो काम करतो, त्याला डेव्हलपमेंट इंजिनिअर असे म्हणतात.
बीई किंवा बीटेक करूनही करता येते करिअर
फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स घेऊन बारावी केलेले विद्यार्थी ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगमध्ये बीई किंवा बीटेक कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. काही संस्था प्रवेशासाठी स्वत:च्या प्रवेश परीक्षाही आयोजित करतात. स्पेशलायझेशन करण्यासाठी ग्रॅज्युएशन डिग्रीनंतर विद्यार्थी यांच्या एमई किंवा एमटेक कोर्सला अॅडमिशन घेऊ शकतात. पण उच्च संस्थेत प्रवेशासाठी गेट परीक्षेत चांगले गुण लागतात. संशाेधन क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी याच्या पीएच.डी. कोर्समध्येही प्रवेश घेता येतो.
मॅन्युफॅक्चरिंगमधील संधी
ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये अनेक प्रकारच्या नोकऱ्यांचे पर्याय उपलब्ध अाहेत. यात ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, प्रॉडक्शन प्लांट, सर्व्हिस स्टेशन, स्टेट रोड ट्रान्सपोर्टेशन, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट कंपनी, इन्शुरन्स कंपनी आणि मोबाइल व्हेइकल डिपार्टमेंटमध्ये नोकरी करता येते. ऑटोमोबाइल इंजिनिअर कॉम्प्युटर ऐडेड इंडस्ट्रीजमध्ये डिझायनर म्हणून काम करू शकता.यात वाहनांचे डिझाइन करणे यासारखी कामे असतात. ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा होल्डर ऑटोमोबाइल मेंटेनन्स वर्कशॉप, फॅक्टरीमध्ये तुमच्या करिअरची सुरुवात तुम्ही करू शकता.
नवोदितांना मासिक १५-२० हजार रुपयांचे पॅकेज
फ्रेशर्सना दरमहा १५ ते २० हजारांचे पॅकेज असते. अनुभवानंतर हे पॅकेज ४० हजारांपर्यंत जाते.
पुढील स्लाइडवर वाचा, कोर्स, जॉब, इंटर्न आणि स्कॉलर...