आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राहकांना भुरळ घालणा-या वेष्टनात द्या नवे उत्पादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टीव्ह जॉब्ज यांच्या जीवनचरित्रातून घेतलेले नेतृत्वासाठीचे धडे या मालिकेत प्रकाशित केले जात आहेत. त्यांच्या आयुष्यातील सातवी शिकवण पुढीलप्रमाणे...


जॉब्ज यांचे जुने मार्गदर्शक माइक मरक्कुला यांनी 1979 मध्ये त्यांना एक पत्र लिहिले. त्यामध्ये तीन तत्त्वांबद्दल माहिती होती. पहिले ‘समानुभूती’ व दुसरे ‘लक्ष केंद्रित’ करणे हे होते. तिसरे काही वेगळेच होते. ते म्हणजे ‘आरोप किंवा लांछन लावणे’. पण तेच जॉब्जचे प्रमुख तत्त्व बनले होते. ग्राहक पॅकिंग (वेष्टन) वरून किंवा सादरीकरणावरून कोणत्याही उत्पादनाबद्दल मत मांडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. जॉब्ज म्हणायचे, माइकने मला शिकवले होते की, लोक पुस्तकाच्या मुखपृष्ठावरूनच ते चांगले किंवा नाही हे ठरवतात. 1984 मध्ये मॅकिन्तोशची शिपिंग करताना त्याचा बॉक्स व रंगाकडे ते आकर्षित झाले होते. त्यांनी आयपॉड व आयफोनच्या बॉक्सची डिझाइन दागिन्यांच्या बॉक्सप्रमाणे करून घेतली होती. त्याच्या पेटंटसाठी त्यांनी स्वत:चे नाव दिले. एखाद्या उत्पादनाची पॅकिंग उघडणे हे थिएटरचा पडदा उघडण्यासारखे किंवा त्याची व्याख्या समोर मांडण्यासारखे आहे, असे त्यांचे मत होते.


जेव्हा कोणी आयफोन किंवा आयपॅडचा बॉक्स उघडेल तेव्हा त्याच्या स्पर्शानेच त्या उत्पादनाचा अनुभव यायला हवा, असे जॉब्ज यांचे म्हणणे होते. अनेकदा जॉब्ज अशी डिझाइन तयार करायचे, ज्यामध्ये केवळ एक संकेत दडलेला असायचा. उदाहरणार्थ, अ‍ॅपलमध्ये परतल्यानंतर ते नवीन आयमॅक बनवू लागले. त्यांना आइव्ह यांनी एक डिझाइन दाखवले. त्यात वरच्या बाजूला एक चिकटवलेले हँडल लावण्यात आले होते.


डेस्कटॉप कॉम्प्युटर घेऊन लोक फिरू शकत नव्हते. जॉब्ज व आइव्ह यांच्या लक्षात आले की, अजूनही बहुतांश लोकांना संगणक सोपे वाटत नाही. हँडल असते तर ते अधिक सोपे वाटले असते. हे हँडल पाहून असे वाटायचे की, आयमॅकला हात लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. याचे उत्पादन करणारी टीम त्यासाठी वेगळे भांडवल लावण्यास विरोध करत होती. तेव्हा जॉब्ज यांनी अगदी सहजपणे घोषणा केली, ‘नाही, आपण ते करत आहोत. ’