आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांना विचारूनच नवे उत्पादन वापरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदर दिसण्यासाठी बाजारात मेकअपची असंख्य उत्पादने उपलब्ध आहेत. आजकाल लिपस्टिकने प्लम्पिग इफेक्ट दिलेला पाहायला मिळतो. यामुळे ओठांचा आकार खुलून दिसतो. ओठ सुंदर दिसतात. यामध्ये असलेल्या घटकांमुळे रक्ताभिसरण वाढते. ओडेमा म्हणजे पेशींमध्ये पाणी जमा होऊ लागते. ज्यामुळे ओठ चार ते पाच तास मोठे आणि सुंदर दिसतात. लिप प्लमरमध्ये कापूर, पुदिना, विंटरग्रीन आणि अद्रक असे घटक असतात. हे लावल्यावर सुमारे 15 मिनिटे ओठांची आग होते, जळजळल्यासारखे होते पण ती सहन करता येते. पण ओठांची होणारी आग जर सहन करण्यापलीकडे असेल तर लिप प्लम्पर लगेच पुसून टाका.

विसाव्या वर्षानंतर चेहर्‍यावर मुरमे येण्याची बहुतेकांची तक्रार असते. गुणसूत्रातील दोष किंवा हार्मोन्सचे संतुलन बिघडणे हे याचे एक कारण असू शकते. फारच त्रास असेल तर त्वचारोगतज्ज्ञाचा सल्ला घ्या, म्हणजे ते तुमच्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर प्रभावीपणे उपचार करतील. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोममुळे ही तक्रार वाढत असते, जीवनशैलीत थोडा बदल केल्याने चांगला लाभ होईल. याशिवाय आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करा. पौष्टिक आहार घेणेही आवश्यक आहे. असे केल्याने हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रित राहील.

वजन वाढू देऊ नका. कारण त्यामुळेही शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण बिघडते. त्वचा फार रगडून धुतल्यास त्वचेचे नुकसान होेते. चेहर्‍यावर एखादे सौम्य अँटिसेप्टिक क्लीनिंग क्रीम वापरा. मुरमांवर अँटीअ‍ॅक्ने ट्रॉपिकल जेलचा वापर करा. आठवड्यातून तीन वेळा हे जेल लावल्याने निश्चितच लाभ मिळेल. काही अँटीअ‍ॅक्ने जेल लावल्यास रुक्षपणा किंवा खाज सुटू शकते. त्यामुळे कोणत्याही उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- प्रिव्हेंशन नियतकालिकातून
डॉ. रेखा शेठ
स्किन स्पेशालिस्ट, मुंबई