आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍ही सांगाल तेवढेच पाणी देईल हा नळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाथटबमध्ये पाणी वाया जाऊ नये म्हणून एक विशेष प्रकारचा नळ तयार करण्यात आला आहे. यामध्ये एक लॉक आणि एक मीटर बसवण्यात आले आहे. तुम्हाला आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण तुम्ही मीटरवर सेट करू शकता. दिलेल्या प्रमाणाएवढे पाणी पडल्यानंतर हा नळ आपोआपच बंद होईल.

बाथ टबमध्ये अंघोळ करताना होणारी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी हा विशेष प्रकारचा नळ तयार करण्यात आला आहे. या नळात लावलेल्या लॉकमध्ये त्यातून बाहेर पडणार्‍या पाण्याची नोंद ठेवली जाते. या नव्या नळाच्या वापरामुळे लोकांमध्ये जागरूकता वाढेल आणि ते पाण्याची नासाडी टाळण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.