आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येणाऱ्या 4 वर्षांत 2 लाख नोकऱ्या, कौशल्ययुक्त व्यावसायिकांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील टेक स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये २०१६ मध्ये १० ते १२ टक्क्यांची वाढ पाहावयास मिळाली आहे. २०१७ मध्ये हीच वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये १४०० नवे स्टार्टअप उघडण्यासह यांची संख्या ४,७५० झाली आहे. नेसकॉमच्या अहवालानुसार २०२० पर्यंत स्टार्टअपची संख्या वाढून १० हजार ५०० होईल. ही जवळपास २ लाख ५० हजार लोकांना जॉब देईल. याशिवाय भारतीय स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकदेखील वाढली आहे. २०१६ मध्ये ६५० स्टार्टअप्सला जवळपास ४ अब्ज डॉलरची फंडिंग मिळेल. सध्याच्या आकड्यानुसार भारतातील स्टार्टअप्समध्ये ९० ते ९५ हजार लोक काम करताहेत. एका अंदाजानुसार २०१७ मध्ये यात ४० ते ५० हजार लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. एका अहवालानुसार स्टार्टअपमध्ये अकुशल जॉबमध्ये मार्केटिंग, कंटेंट आणि विक्रीच्या क्षेत्रात सर्वाधिक लोकांची मागणी होती. यासह तांत्रिक कुशलतेत पीएचपी डेव्हलपर, जावा डेव्हलपरची आवश्यकता असेलच. 

मार्केटिंग आणि सेल्स  
एका अहवालानुसार टेक स्टार्टअप्समध्ये अकुशल नोकऱ्यांत जवळपास ५१ टक्के नोकऱ्या विपणन आणि विक्री क्षेत्रात असतील. अशात हा त्या विद्यार्थ्यासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो, जे नवे व्हेंचर जोडून आपल्या करिअरची सुरुवात करू इच्छितात. सामान्यत: राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय सर्व प्रकारच्या कंपन्यांत विपणन आणि विक्री व्यावसायिकांची मागणी होत असते. विपणन व्यवस्थापकाचे काम कंपनीच्या उत्पादनाची विक्री आणि मार्केटिंगला मॅनेज करणे असते. याशिवाय यात उत्पादनाचे प्रमोशन, प्रचार आणि संस्थानच्या अन्य कंपन्यांसह संबंध उत्तम करणेदेखील विपणन व्यवस्थापकाचे काम असते. काही अन्य कामांमध्ये मार्केट रिसर्च, उत्पादन विकसन, प्रायसिंग आणि वितरणदेखील समाविष्ट आहे. 

मार्केटिंगमध्ये मॅनेजमेंट करणारे विद्यार्थी यांना अधिकतर कंपन्या प्राधान्य देतात. चांगल्या संस्थांत एमबीए कोर्समध्ये प्रवेशासाठी कॅट, मॅट, जॅट या एटीएमएचा स्कोअर गरजेचा असतो. काही संस्था स्वत:च्या प्रवेश चाचण्यादेखील आयोजित करतात. या क्षेत्रात फ्रेशर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह वा सेल्स एक्झिक्युटिव्ह आपले करिअर सुरू करू शकतात. फ्रेशरला २.५ ते ३ लाख रुपये वार्षिकचे पॅकेज मिळण्याची शक्यता असते. काही वर्षांच्या अनुभवानंतर वार्षिक पॅकेज ५ ते ६ लाख रुपयांपर्यंत होऊ शकते.  

 टेक्निकल जॉब  
स्टार्टअप्स क्षेत्रात टेक्निकल स्किलच्या क्षेत्रातच सर्वाधिक मागणी पीएचपी डेव्हलपर, जावा डेव्हलपर, प्रोग्रामिंग लँग्वेज आणि अँड्रॉइड डेव्हलपरची आहे. तांत्रिक क्षेत्रातील जवळपास ५० टक्के नोकऱ्यात कुशल व्यावसायिकांची मागणी आहे. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी वा तत्सम विषयांतील पदवी वा पदविका करणारे विद्यार्थी या क्षेत्रात जॉब करू शकतात. याशिवाय विविध प्रोग्रामिंग लँग्वेजचे प्रमाणपत्र कोर्सही संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. 

हे कुशल व्यावसायिक असोसिएट इंजिनिअर, जावा सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रामर अॅनालिस्ट जॉब करू शकतात. फ्रेशरला प्रारंभी २ ते ३ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळण्याची शक्यता असते. काही वर्षांच्या अनुभवानंतर सॅलरी पॅकेज ४ ते ६ लाख रुपये वार्षिकपर्यंत होऊ शकते.