आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनिफरचे स्टोअर अनोखे! ब्रँडेड कपडे भाड्याने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क शहराच्या उपनगरात जेनिफर यांचे बालपण गेले. विशेषप्रसंगी वापरण्याजोगी उंची वस्त्रे आणि अॅक्सेसरीज त्या भाडेतत्त्वावर देतात. गेल्या वर्षी कंपनीने १३९ डॉलर्सची मासिक अमर्यादित योजना सुरू केली. यात ग्राहक  एका महिन्यासाठी ३ पोशाख भाडेतत्त्वावर घेऊ शकतो. ईमेलद्वारे हा व्यवहार होतो. या डिझायनर ड्रेसेसचा विमा असतो हे याचे वैशिष्ट्य.  

शिक्षण पूर्ण केल्यावर जेनिफर यांनी पर्यटन कंपनीत नोकरी केली. ९/११ नंतर पर्यटन कंपन्यांच्या व्यवसायात मंदी आली. त्यामुळे या कंपन्या व्यवसायात तग धरण्यासाठी नव्या संकल्पनांच्या शोधात होत्या. हॉटेल व्यवसाय कंपनी स्टारवूडची स्थितीदेखील खालावली होती. जेनिफरने संकटाला संधीत परावर्तित केले. विवाहात भेटवस्तू दिल्या जातात त्या बहुतांश वेळा निरूपयोगी असतात, असे त्यांचे निरीक्षण होते. अशा निरूपयोगी वस्तू देण्याची पद्धत रूढ झाली होती. तेव्हा जेनिफरचे वय केवळ २१ वर्षे होते. ती कंपनीच्या अध्यक्षांकडे गेली. जगातील पहिली हनिमूनची रजिस्ट्री सुरू करण्यासाठी तिने काही लाख डॉलर्सची मागणी केली. नवविवाहित दांपत्याला भेटवस्तू म्हणून स्वयंपाकघरातील भांड्यांचा सेट मिळू नये यासाठी ती नवी पद्धत प्रचलित करू इच्छित होती. त्याऐवजी रम्य ठिकाणी जाण्याची संधी त्यांना मिळावी, असे तिला वाटत होते. अध्यक्षांशी बोलण्यापूर्वी तिला आत्मविश्वास नव्हता. आपले म्हणणे मान्य होईल का याविषयी संभ्रम होता. मात्र, तिची कल्पना त्यांना आवडली. पैसाही मिळाला. जेनिफरसाठी ही केवळ एक सुरुवात होती. 
 
त्यानंतर कपडे भाडेतत्त्वावर देण्याची कल्पना तिने मांडली. पैसा उभारण्याची कला ती स्टारवूड कंपनीत शिकली होती. उद्यमशीलतेची कौशल्ये तिच्यात होती. या दोन्हींच्या बळावर रेंट रनवे कंपनीची स्थापना २००९ मध्ये केली. हे ऑनलाइन स्टोअर होते. २०१५ पर्यंत रेंट रनवेमध्ये ११४ दशलक्ष भांडवल जमा झाले. यादरम्यान पाच लाख ग्राहकांपर्यंत त्यांची पोहोच निर्माण झाली. २५० पेक्षा अधिक डिझायनर ब्रँड येथे भाडेतत्त्वावर मिळतात.  

महाविद्यालयात शिकत असताना आपले मत मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, असे जेनिफर सांगते. मी जेव्हा काम करू लागले तेव्हा लोकांना महिलांनी फारसे बोललेले व आत्मविश्वासपूर्ण जगणे मान्य नव्हते. या मानसिकतेचा सामना मलाही करावा लागला. एका बैठकीनंतर एका वयस्कर महिलेने माझा हात धरला आणि मला बाजूला घेऊन गेल्या. त्यांना सांगितले,मुलींनी इतके बोलणे बरे नव्हे. तुला बैठकींमध्ये शांत बसले पाहिजे होते. माझ्याकडे चांगल्या कल्पना असताना मला हा सल्ला मिळाला.

महिलेसाठी हे अयोग्य असल्याचे अनेकांना वाटे. मला थोडा गोडवा आणण्याचा सल्ला दिला गेला. मी एका महिलेचा प्रचंड आदर करायचे, त्यांनीच मला सल्ला दिला.मी कार्यालयातच रडू लागले. त्या वेळी कंपनीचे एसव्हीपी जिम बारा यांनी मला जीवनातील अमूल्य सल्ला दिला, जशी आहेस तशीच राहा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नकोस. ते म्हणाले, जे वरिष्ठ आहेत आणि वयाने तुमच्यापेक्षा मोठे आहेत ते दरवेळी तुम्हाला उपयुक्त आणि हितकारक सल्लाच देतील असे नसते. या सल्ल्याने मला उद्योजक बनण्यात मोलाची साथ दिली. मी जर त्या महिलेचा सल्ला ऐकला असता तर माझे करिअर भलत्याच दिशेने गेले असते.  

रेंट अँड रनवे कंपनीच्या सीईओ आणि सहसंस्थापक जेनिफर हेमन यांची एकूण संपत्ती ३०० दशलक्ष डॉलर्स आहे. एका दिवशी बहिणीकडे नवे वापरण्यास काहीच नव्हते. त्या वेळी त्यांना अशी कंपनी स्थापन करण्याची कल्पना सुचली. ही कंपनी डिझायनर पोशाख आणि अॅक्सेसरीज  भाडेतत्त्वावर देते. ऑनलाइन कंपनी म्हणून या कंपनीने काम सुरू केले होते.  
बातम्या आणखी आहेत...