आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार कार्डाचा आधार आपोआप मिळावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थव्यवहार
तीन वर्षांत दिले ऐंशी कोटी नागरिकांना आधार कार्ड म्हणजे ६६ टक्के काम पूर्ण झाले आहे.
सरकारी आकड्यांनुसार ऐंशी कोटी नागरिकांना आधार कार्डे दली गेली, म्हणजे ६६ टक्के काम पुर्ण झाले आहे. एवढे असे व्हायला तीन वर्षे लागली. नंदन निलेकणी यांची ही द्वादशअंकी ओळखपत्र योजना चांगली, अभिनव व उपयुक्त आहे व तिचाच मूलाधार आर्थिक, सामाजिक, राजकीय जीवनांत पूर्णपणे घेतला गेला तर अनेक सोई-सुविधा, सेवा मिळतील, वाढतील, भ्रष्टाचाराला आळा बसेल, व्यवहारांना गती येईल. दुसऱ्या बाजूला सरकार, आधार कार्डाची सक्ती करणार नाही म्हणताना आधार कार्ड योजनेच्या मूळ उद्देशावर बोळा फिरवित आहे. त्यामुळे आधार कार्ड नसले तरी काय बिघडते ही भावना वाढीस लागते आहे.

अडचणी दूर व्हाव्यात :
सक्ती सरळपणे पद्धतीत बदल, सुधारणा करत सुलभता आणण्याची वेळ आली. लहान-मोठ्या मुलांना, पाल्यांना घेऊन पालकांना ‘आधार कार्ड’साठी तिष्ठावे लागत आहे, सरकारी यंत्रणेकडे, सहज, आपोआप ‘आधार कार्ड’ देण्याची सेवासुविधा नाही.
- सज्ञान झाल्यावर बदलून देणार का? :
विद्यार्थ्यांना आधार कार्ड देणे शैक्षणिक अनुदान, शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप यांचे त्वरित व्यवस्थित, भ्रष्टाचारविरहित व विनाविलंब वितरणासाठी गरज आहे, तरी विद्यार्थ्यांच्या पालकांचे आधार कार्डसहित बचत खाते असले तरी हे प्रत्यक्ष वितरण होऊ शकत असताना विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती कशासाठी? समजा पालक, पाल्यांना प्राप्त रक्कमेची पाल्यासाठी उपयोग करणार नाहीत, अशी भीती असली तर ती पाल्यांच्या खात्यात पैसे देण्याने संपत नाही, लहान वयात दिलेली ही अाधार कार्डे, ही पाल्यांमुळे मोठी सज्ञान १८ वर्षांची झाल्यानंतर बदलून नवी आधार कार्ड द्यायची का? नाही. दिली तर ही कार्डे, जुनी, विसंगत व निरोपयोगी ठरतील. केवायसीसाठी बँकांना रिझर्व्ह बँक, सरकार सक्ती करून यात त्रुटी असल्यास कंवा केले नाही, तर पाचपन्नास लाख रुपये दंड करतात. या केवायसीला पूर्ण अधिकृततेचा आधार आहे, हे लक्षात घेऊन, त्याचा आधार, आधार कार्ड देताना घेतला पाहिजे.

पाच कोटी बँक खातेधारकांना काढावे लागणार नवे पॅन कार्ड
बँकेच्या खातेदारांना आता पॅनकार्ड सक्ती झाली आहे. ते नसेल तर २० टक्के टीडीएस व नसले, तर ते काढून घेऊन आता ‘फॉर्म १५ एच’ सोबत जोडावा लागणार आहे. किमान पाच कोटी बँक खातेदारांना नव्याने पॅनकार्ड घ्यावे लागत आहेत, यासाठी सरासरी तीनशे रुपये खर्च, कागद व वेळ वेगळा हे करावे लागणार आहे. ज्याचे आधार कार्ड आहे किंवा केवायसी झालेले बँकखाते आहे, त्याने पॅनकार्ड का घ्यायचे? आधारकार्डात फक्त बोटांचे ठसे व डोळ्याच्या रंगासहित फोटो एवढे जास्त आहे. तेवढे करून घ्यावे. पण केवायसचे बँक खाते, पॅनकार्ड व आधार कार्ड यापैकी एक जरी असले तरी बाकीचे दोन, सहजपणे आपोआप मिळण्याची, देण्याची सुव्यवस्था केली तर लोकांचा त्रास, वेळ, शक्ती वाचेल. यापुढे मुलगा, मुलगी, सज्ञान होईल, त्यादिवशी शाळा-कॉलेजच्या व बँकेचे दाखल्यावर आधारित आधार कार्ड दिले जावे व मनुष्य संपल्याचा दाखला देताना ‘आधार कार्ड’ संपल्याचे नमूद करावे, अशी व्यवस्था कार्यवाहीत आणावी.
बातम्या आणखी आहेत...