जन्म- ८ मार्च १९६४
वडील - गुरुबख्श, आई - सुरजित, मोठे बंधू - जगदेव, लहान बंधू - हरकेश
पत्नी- सरबजित, मुलगी- नवसीरत
व्हायब्रंट गुजरातमध्ये कॅनडाच्या प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख होऊन आले. तेथील मंत्री अमरजित सोही मूळचे ते संगरूर जिल्ह्यातील बनभौरा गावातील राहणारे आहेत. अमरजित यांचे वडील शेती करत होते. मोठे भाऊ जगदेव १९७७ मध्ये अभियांत्रिकीनंतर एनआरआय मुलीशी लग्न करून कॅनडाला निघून गेले होते. अमरजित तेव्हा गावातील सरकारी शाळेत १० वी केल्यानंतर मालेरकोटलाच्या महाविद्यालयात प्रवेशकर्ते झाले. १९८१ मध्ये जगदेवने आई-वडिलांना आपल्याकडे कॅनडात बोलावून घेतले. १० वर्षीय अमरजितही त्यांच्याबरोबर कॅनडात गेले.
दोन दिवसांपूर्वी मित्र-नातेवाइकांना भेटायला बनभौरा गावात पोहोचलेले अमरजित यांचे लहान भाऊ हरकेश सोही यांनी भास्करला सांगितले की, १९८१ पर्यंत पंजाबमध्ये राहत असताना अमरजित ह्यूमन राइट ग्रुपमध्ये राहून लोकांच्या चांगल्यासाठीच्या कामात गुंतलेले होते. ते प्रसिद्ध नाटककार गुरुशरणसिंह यांच्याबरोबर होते. १९८८ मध्ये अमरजित पंजाबात आले होते. त्याचदरम्यान त्यांना बिहारात ह्यूमन राइट्सच्या एका कार्यक्रमात येण्याचे निमंत्रण मिळाले, तेव्हा अमरजित तिथे गेले. तेव्हा पंजाबमधील दहशतवाद चरमसीमेवर होता. त्या कार्यक्रमावर छापा टाकून पोलिसांनी २७ लोकांना अटक केली, ज्यात अमरजित सोही हेदेखील होते. टाडा लावून त्यांना तुरुंगात पाठवले गेले. त्या वेळी हरकेश लुधियानाच्या कॅटल फीडचा व्यवसाय-उद्योग करत होते. अमरजितच्या अटकेच्या पुढील सकाळीच पोलिस लुधियानात पोहोचले आणि शेजारच्यांशी विचारपूस करू लागले. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी अमरजितसाठी न्यायालयाचा दरवाजाही वाजवला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. जवळपास एक वर्षाच्या सुनावणीनंतर १९९० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अमरजित सोहींना मुक्त करण्याचे आदेश दिले. पण बिहार सरकार त्यांना सोडण्यास तयार नव्हते. हरकेश यांनी सांगितले की तेव्हा त्यांनी तत्कालीन उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांची फिर्याद (कहाणी) ऐकल्यानंतर ताऊ देवीलाल यांनी लगेचच बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना फोन केला. तेव्हा कुठे अमरजित यांना तुरुंगातून सोडले. तुरुंगातून सुटल्यानंतर अमरजित सोही पुन्हा कॅनडाला निघून गेले. हरकेश सोही यांनी सांगितले की, बिहार पोलिसांनी अमरजित सोहींवर अतिरेकी असल्याचा आरोप लावला होता. त्यांचा संपर्क एलटीटीईशी दर्शवला गेला आणि त्यांना एका बँक दरोड्यात सहभागी असल्याचे दाखवले गेले. पोलिसांना छाप्यादरम्यान अमरजितकडे एक कॅमेरा मिळाला होता. पण एफआयआरमध्ये पोलिसांनी त्यांच्याकडून बंदूक मिळाल्याचे जप्त केल्याचे दाखवले होते. कोर्टाने पोलिस कुठलेही आरोप सिद्ध करू शकले नाहीत. पोलिसांनी ज्या दिवशी बँक दरोडा टाकल्याचे म्हटले, त्या दिवशी अमरजित कॅनडात होते. २००७ मध्ये सिटी कौन्सिलमध्ये ते निवडून आले. एडमंटन शहरातील सर्वात मोठ्या २७ किलोमीटरच्या रेल्वे प्रकल्पावर त्यांनी काम केले. आपल्या जबरदस्त कामामुळे प्रांतीय आणि फेडरल दोन्ही सरकारांच्या नजरेत ते येऊन चुकलेच होते. त्यात त्यांच्याद्वारे केलेल्या कामांना अनेक पुरस्कारही मिळाले. ते लिबरल पार्टीशी जोडले गेले होते संसदीय निवडणुकीत त्यांना एडमंटनमधून तिकीट दिले गेले. ( जसे बंधू हरकेश यांनी पुनीत गर्ग यांना सांगितले.)
का आहेत चर्चेत- कधीतरी ते टाडामध्ये कैदेत होते, आता भारत सरकारचे पाहुणे.