आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे वाटते अण्वस्त्रसज्ज जग जणू युद्धाच्या पवित्र्यात आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे जग हे समस्यांनी वेढलेले आहे. धोरण निर्माण करणाराच भ्रमित आणि त्रस्त आहे. पण राजकारणाचे लष्करीकरण आणि नवनव्या शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेपेक्षा अधिक महत्त्वाची इतर कुठलीही समस्या नाही. या विनाशकारी स्पर्धेला थांबविणे आमची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे. वर्तमान स्थिती धोकादायक आहे. युरोपात अधिक तुकड्या नियुक्त केल्या जात आहेत. नाटो आणि रशियन सैन्य समोरासमोर आहे.  

सरकाराकडे जनतेच्या सामाजिक गरजांसाठी पैसाच नाही आणि लष्करी खर्च वाढतो आहे. अत्याधुनिक आणि विनाशकारी शस्त्रास्त्रे, आपल्या एका प्रहाराने अर्धे महाद्वीपच नष्ट करण्याच्या क्षमतेच्या पाणबुड्या आणि क्षेपणास्त्र प्रतिरक्षा प्रणालीसाठी मात्र सहज पैसा उपलब्ध आहे. राजकारणी आणि लष्करातील जनरल अधिक लढाऊ वृत्तीचे युद्धखोर दिसताहेत. बचावाचे सिद्धांत अधिकच धोकादायक झालेले आहेत. समीक्षक आणि वाहिन्यांवरील निवेदक-सूत्रसंचालक हे युद्धाच्या गडबड गोंधळात जणू सूर मिळवत आहेत. एकूणच असे वाटते  की, जणू संपूर्ण जगच युद्धाची तयारी करत आहे.  

१९८० च्या दशकाच्या दुसऱ्या भागात आम्ही अमेरिकेसह आण्विक अस्त्रे कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. शीतयुद्धादरम्यान एकत्र केली गेलेली ८० टक्के अण्वस्त्रे एकतर परिणामशून्य झालीत वा ती नष्ट केली गेली आहेत. यामुळे कोणाच्याही सुरक्षेच्या तयारीत कमतरता आली नाही आणि तांत्रिक खराबी वा दुर्घटनेमुळे आण्विक युद्धाचा धोका कमी झाला आहे. नोव्हेंबर १९८५ मध्ये जिनिव्हातील पहिल्या शिखर परीषदेत सोव्हिएत संघ आणि अमेरिकी नेत्यांनी जाहीर केले होते की, आण्विक युद्ध जिंकले जाऊ शकत नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये.   

आज पुन्हा जगासमोर आण्विक धोका वास्तवात दिसू लागला आहे. अनेक वर्षांपासून महाशक्तींमधील संबंध बिघडत चालले आहेत.  पुतीन यांनी आण्विक युद्धाविरोधात ठराव आणावा
- मिखाईल गोर्बाचेव्ह, माजी सोव्हिएत संघाचे राष्ट्रपती 
बातम्या आणखी आहेत...