Home | Magazine | Niramay | news about Basic fitness

क्रिकेटर्सची हुकमत फिटनेसमुळेच; बेसिक फिटनेस आत्मसात करावे, वाचा फिटनेस फंडा

{जयंत दळ‌वी, सोलापूर | Update - Apr 03, 2017, 07:11 AM IST

फिटनेसमुळेच सचिन तेंडुलकरसारखा खेळाडू २० वर्षे क्रिकेटवर राज्य करून शकला. त्याचाच आदर्श घेऊन विराट कोहली भारतीय संघाची धुरा अगदी समर्थपणे पुढे नेताे अाहे.

 • news about Basic fitness
  फिटनेसमुळेच सचिन तेंडुलकरसारखा खेळाडू २० वर्षे क्रिकेटवर राज्य करून शकला. त्याचाच आदर्श घेऊन विराट कोहली भारतीय संघाची धुरा अगदी समर्थपणे पुढे नेताे अाहे. क्रिकेटरना मिळालेला पैसा, त्यांना मिळालेली वारेमाप प्रसिद्धी लोकांना दिसते. परंतु त्यांची तपश्चर्या दुर्लक्षित राहते.

  क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपात क्रिकेटरची फिटनेसची गरज जबरदस्त बदलत गेली. कारण कसोटी, एकदिवसीय व टी-२० या तीन प्रकारात प्रत्येक क्रिकेटरला फिजिकल आणि मेंटल फिटनेस कमालीचा वाढवावा लागतो. त्याने तो केलाच पाहिजे.

  जगाच्या पाठीवर अनेक खेळ खेळले जातात. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असूनही क्रिकेट हा फार लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही क्रिकेटला ‘प्रोफेशनल टच’ मिळत चालला आहे. अन्य खेळाच्या तुलनेत वारेमाप प्रसिद्धी आणि भरपूर पैसा आजच्या घडीला मिळायला लागला आहे. म्हणूनच प्रत्येकाची नजर क्रिकेटकडे वळलीय. वर-वर दिसायला आणि खेळायला सोपा वाटत असला तरी पैसे व प्रसिद्धी मिळवायची असेल तर प्रत्येक क्रिकेटरला यातून तावून-सुलाखूनच यावे लागते. हे त्रिवार सत्य आहे. याकडे कोणीही डोळेझाक करू शकत नाही. यासाठी फिटनेस अतिशय महत्वाचा आहे.
  (लेखक माजी रणजीपटू अाहेत.)
  शब्दांकन : अजित संगवे
  बेसिक फिटनेस आत्मसात करावे
  प्रत्येक ठिकाणी सामना खेळताना तिथले हवामान, खेळपट्टी व त्याचबरोबर स्वत:च्या खेळातील क्षमता समजून-उमजून विरुद्ध संघाचा अंदाज घेत क्रिकेटच्या बदललेल्या नियमांचा अभ्यास करून आपल्या खेळात सातत्य आणि चांगला खेळ करण्याच्या दृष्टीने क्रिकेटचे बेसिक फिटनेस प्रत्येक क्रिकेटरने जाणून घेऊन आत्मसात करणे गरजेच आहे. कारण या खेळात विविधता व नावीन्य आहे. खेळातील स्किलचे बारकावे शिकण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी हे सर्व व्यायाम प्रकार सर्वप्रथम अंगीकारणे आणि त्यानंतर खेळातील मास्टरकी मिळण्याच्या दृष्टीने फलंदाजीतील सर्व स्ट्रोक, डिफेन्स, गोलंदाजीतील विविधता घोटवून घेतली पाहिजे. त्याचप्रकारे फिल्डिंगमधील चपळता या व्यायामानेच मिळविता येते. कमीत कमी दिवसातले चार तास नेटमध्ये वर्कआऊट झाल्यावर घाम गाळला पाहिजे.
  शॉर्टकट मार्ग नको
  शॉर्टकट मार्गाने टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करताना सगळेच दिसतात, पण ते आले कधी व गेले कधी याची कुणालाच दखल नसते. दुसऱ्या
  खेळाडूला टाळ्या वाजविणे खूप सोपी गोष्ट आहे. परंतु खेळातील सातत्य
  राखत, खेळावर हुकमत गाजवत लोकांकडून टाळ्या मिळविणे खूप कठीण आहे. ज्यांना हे साध्य होते तेच क्रिकेटर यशाच्या शिखराजवळ जाऊ शकतात.
  पुढील स्लाईडवर वाचा, पंधरा दिवसांतून जलतरणातील व्यायाम, चेंजसाठी खो-खो, फुटबॉल व स्प्रिंट...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • news about Basic fitness
  पंधरा दिवसांतून जलतरणातील व्यायाम 
  रिपीटेशनमध्ये वेट ट्रेनिंग करणे, स्कीपिंग करणे स्ट्रेचिंगचे व्यायाम करणे. १५ दिवसांतून एकदा जलतरण करणे. कंबरेएवढ्या पाण्यात उभे राहून पाण्यात फुटबॉलच्या किक्स मारणे. यामुळे पायाची व मांड्याची ताकत वाढते, स्नायू लवचिक होतात. पाण्यात रोटेशन पद्धतीने हात मारणे. यामुळे खांद्याचे, दंडाचे आणि मनगटाचे स्नायू बळकट होतात. 
   
   
   
   
 • news about Basic fitness
  चेंजसाठी खो-खो, फुटबॉल व स्प्रिंट
  प्रत्येक क्रिकेटरने अधूनमधून प्रामुख्याने खो-खो, फुटबॉल व अॅथलेटिक्समधील स्प्रिंटचे प्रकार चेंज म्हणून अवश्य खेळले पाहिजे. स्टॅमिना आणि लवचिकतेसाठी प्रत्येक क्रिकेटरने खो-खो हा खेळ आवर्जून खेळला पाहिजे. कारण शारीरिक चपळता व स्टॅमिना या दोन गोष्टी यातून शिकण्यासारख्या आहेत. 
 • news about Basic fitness
  बुद्धिबळाचीही आवश्यकता
  जिम बॉल व मेडिसीन बॉलच्या मदतीने विविध व्यायामाचे प्रकार क्रिकेटरला खूप फायदेशीर असतात. कारण हा खेळ बॅट व बॉलपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो एक बुद्धिबळाचाही प्रकार आहे. तुमच्या संघाची क्षमता व संघातील खेळाडूंची क्षमता याचा अंदाज घेत विरुद्ध संघात वरचढ खेळ करीत सामना जिंकायचा असेल तर बुद्धिबळाचाही फायदा होतो. 

Trending