आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांना सुखात ठेवण्याचे काम माझे! एनबीएत निवड झाल्यानंतर सतनाम प्रथमच मायदेशात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतनामच्या स्वागतासाठी आलेले मित्र आणि बास्केटबॉल फेडरेशनचे अधिकारी. - Divya Marathi
सतनामच्या स्वागतासाठी आलेले मित्र आणि बास्केटबॉल फेडरेशनचे अधिकारी.
७ फूट, २ इंच उंचीचे व लुधियानाच्या बल्लो गावातील सतनाम सिंह प्रथमच मायदेशी आले. दिल्ली एअरपोर्टवर गुरुवारी त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी उमेश शर्मा यांनी केलेली बातचीत...

एनबीएची ड्रॉफ्टिंग होणार होती त्या वेळी मी रात्रभर झोपू शकलो नव्हतो. संघात समावेश झाल्यानंतरही मला रात्रभर झोप आली नव्हती. डलासचे टी-शर्ट मिळाले होते, पण मी सकाळी ५ वाजेपर्यंत जागाच होतो. न्यूयॉर्कहून माझी फ्लाइट सकाळी सात वाजता होती आणि मी थेट एअरपोर्टवर गेलो. फ्लोरिडातील अकादमीत पोहोचल्यावर सुखाने झोपू शकलो. गावातून लुधियाना व तेथून अमेरिकेपर्यंतचा प्रवास आठवत होता. जे स्वप्न घेऊन अमेरिकेत आलो ते साकार झाल्याचे खरेच वाटत नव्हते. सतनाम तू आमच्या जीवनाचे सार्थक केलेस, हे पापाजींचे शब्द होते.

एनबीएत निवड झाल्यावर मला माझा मोबाइल नंबरही बदलावा लागला. माहितीये का? कारण भारतच नव्हे, जगभरातून इतके फोन, मेसेज येत होते की वैतागून गेलो. माझ्या कोचने मला सांगितले की, नंबर बदल, नाही तर खेळावर परिणाम होईल. ही तर लहानशी सुरुवात आहे. तुझ्या यशात मला एखाद्या छोट्याशा गोष्टीचाही अडसर मला नको आहे. एनबीएच्या डल्लास मेव्हरिक्स बास्केटबॉल टीममध्ये निवडीने झालेला आनंदच आज मायभूमीवर ठेवलेल्या पावलाने होत आहे. माझ्या आई-वडिलांनी खूप दु:ख भोगले आहे. आता जगातील सगळी सुखे त्यांना देण्याची माझी पाळी आहे. गावातील लहानशा घरात आयुष्य काढून त्यांनी मला इथवर पोहोचवले. आता त्यांना आरामात राहता येईल असे चांगले घर बांधून देणे माझे कर्तव्य आहे. येथून मी थेट अमृतसरच्या सुवर्णमंदिरात जाईन व वाहेगुरूंच्या दर्शनानंतर घरी जाईन.'
दरम्यान, सतनामच्या बल्लों गावात त्याच्या स्वागताची तयारी सुरू आहे. लुधियाना येथील बास्केटबॉल अकादमीतही त्याचा सत्कार होईल.
बातम्या आणखी आहेत...