आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू: बाबरी मशीद सोन्याने मढवण्याने सर्वांचे भले होईल का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिया धर्मगुरू मौलाना डॉ. कल्बे सादिक
उपाध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
 
- उत्तर प्रदेशात राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहताना दिसत आहे? 
सर्व राजकीय पक्षांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल दिली आहे. स्वातंत्र्यांच्या ७० वर्षांनंतरही शिक्षण, रोजगार, अज्ञान, भ्रष्टाचार यासारख्या समस्या सुटलेल्या नाहीत.  इतकेच नव्हे तर तीन तलाक, शरियत आणि बाबरी मशिदीचा वाद उपस्थित केला जातो. हे लहान वर्गाचे मुद्दे आहेत, समान नागरी कायदा देशासमोरील मोठा मुद्दा नाही. बाबरी मशीद सोन्याने मढवली तर सर्व समस्या सुटणार आहेत काय? याने देशाचे भले होणार आहे काय?

- तुम्ही म्हणता, राजकीय नेते जुने मुद्दे उकरून काढत आहेत,  यावर तोडगा काय?
हे पाहा, मी काही राजकारणी नाही.  मी देशभक्त आहे. देशाचा फायदा कसा होईल, यासाठी काही मागितले नाही, असे मी शपथेवर सांगतो. यासाठी आम्ही काही उपकार केले असेही नाही. ७०० वर्षांपूर्वी लाखो शियांची कत्तल करून  मुस्लिम भाई आम्हाला अरबस्तानातून बाहेर काढत होते, तेव्हा या देशानेच आमच्या पूर्वजांना आश्रय दिला. मग आम्ही गद्दारी कसे करू शकतो?

- देशाच्या नागरिकांना दिशा कोण दर्शवेल?
मी  इस्लामबाबत बोलतो. इस्लाम ही चळवळ होती. ती योग्य लोकांच्या हातात होती. राजकारण्यांचा ताब्यात हा धर्म गेला तो अडचणीचा वाटू लागला. त्याच्यावर राजकारण्यांचा ताबा नसावा. राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी धर्माचा वापर करतात.

- तुम्ही म्हणता, धर्म राजकारण्यांपासून दूर ठेवायला हवा? 
होय, ते आवश्यकच आहे. मूलभूत प्रश्नांची तेव्हाच सोडवणूक होईल.

- यासाठी जनतेने काय करावे?
आंधळ्या माणसाला तुम्ही रस्ता कसा दाखवता? प्रत्येक नागरिकास योग्य शिक्षण दिले तर तो स्वत: मार्ग शोधून काढेल. गरीब माणूस रोजीरोटीसाठी लढेल की देशाचा विचार करेल? यासाठी शिक्षण दिलेच गेले पाहिजे आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणायला हवा.

- मुस्लिम तरुणांत त्यांच्या प्रश्नांवरून अस्वस्थता आहे. त्यांना राजकीय नेतृत्व योग्य दिशा दाखवत नाही...
आमची तक्रार नेतृत्वाशी आहे. मुस्लिम नेतृत्वाशीही आहे. आपल्याकडे शरियत कायदे आहेत. एकीकडे जनता आणि दुसरीकडे अल्ला असा प्रश्न असेेल तर आधी जनतेची समस्या सोडवा. म्हणजे, एकीकडे मशीद आणि दुसरीकडे गरिबांच्या घरांचा प्रश्न असेल तर मशीद विसरा, गरिबांचे प्रश्न सोडवा. परंतु येथे झटपट मशीद बांधा, जनतेची दिशाभूल करा, तिला विसरून जा.
आपण सांगताहात की, धर्मगुरू योग्य मार्ग दाखवत नाहीयेत? तर जनतेने त्यांचे ऐकू नये?  
दोन प्रकारचे अॅप्रोच आहेत. एक खरा दुसरा भावनात्मक. मुस्लिम नेतृत्व मुसलमानांना फक्त इमोशनल लाइनवर घेऊन चालत आहे. यावर पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. आज तिथे काय होते आहे. त्याचेच नाव मी पापिस्तान केले आहे. इमोशनमुळे समस्या निर्माण होतात. व्यावहारिक मार्गाने समस्यांचे निराकरण होईल.  
उप्रच्या निवडणुकीला कसे पाहता?  
अखिलेशने विकासाच्या नावे जे काम केले आहे, त्यास आंधळादेखील पाहू शकतो. पिता-पुत्राची लढाई बंद झाली पाहिजे.