आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील प्रेरणादायी महिला, उद्योजक जोऊ कनफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोऊ यांचा जन्म चीनच्या हुनान राज्यात झाला. पाच वर्षांच्या असताना आईचे निधन झाले. १५ व्या वर्षी अडचणींमुळे शाळा सोडावी लागली. याच काळात त्यांनी स्वत:च्या राज्यातून स्थलांतर करत शेनजेनमध्ये एका आर्थिक विकास क्षेत्रात कामास सुरुवात केली.
त्या वेळी त्यांना घड्याळाचे डायल बनवणाऱ्या बेएन कंपनीत नोकरी लागली. कारखान्याच्या मालकाशी त्यांनी विवाह केला. एक मुलगा झाल्यानंतर लग्न टिकले नाही. आपल्या चुलत भावाच्या मदतीने त्यांनी १९९३ मध्ये स्वत:ची कंपनी सुरू केली आहे. घड्याळाची काच बनवण्याची ही कंपनी होती. हळूहळू कंपनी मल्टिमीडिया, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल डिव्हाइस स्क्रीन बनवू लागली. त्यांची कंपनी मोबाइल फोनमधील विंडो ग्ला, टॅब्लेट पीसी, नोटबुक पीसी तयार करू लागली. आता त्या फॅक्ट्री गर्ल नव्हे, तर क्वीन ऑफ मोबाइल फोन ग्लास म्हणून आेळखू लागल्या. २००१ मध्ये कंपनीला चीनची दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स
कंपनी टीसीएल कॉर्पोरेशनकडून मोठी ऑर्डर मिळाली. कधीकाळी अन्य कारखान्यात काम करणाऱ्या जोऊ यांच्या कंपनीत आता ६०,००० लोक आहेत.
जन्म : १९७०
शिक्षण : अकाउंटिंग, कॉम्प्युटर ऑपरेशन, कस्टम प्रोसेसिंगमध्ये विद्यापीठातून अर्धवेळ कोर्स
कुटुंब : दोन विवाह, एक मुलगा, एक मुलगी
चर्चेत - त्या चीनमधील सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिला आहेत. मालमत्ता ७ अब्ज डॉलर आहे.