आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निखिलने तीन आठवड्यांत बनवले भीम अॅप, नीलकेणींबरोबर आधारसाठीही केले होते काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय-  २७ वर्षे  
शिक्षण- रामकृष्ण विद्या शाळा, म्हैसूर येथून शालेय शिक्षण; विश्वेश्वरैया तंत्र विद्यापीठातून उच्च शिक्षण.
चर्चेत का?- त्यांनी बनवलेले भीम अॅप १.५ कोटींपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड झाले आहे. 
 
 
निखिल यांनी याआधी आधार कार्डसाठी नंदन निलेकणी यांच्यासोबत काम केले होते. त्यांनी गेल्या वर्षी आपल्या चमूसह बँका, फ्री चार्ज हे स्टार्ट अप आणि फ्लिपकार्ट यांच्याकडे जाऊन यूपीआयला प्रोत्साहन देण्याचा आग्रह केला होता. नोटाबंदीनंतर एकदम चित्र बदलले. कुठल्याही प्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जाऊन व्यवहार करता यावा, अशी प्रत्येकाची इच्छा होती. 
 
यूपीआय आणि यूएसएसडी यांसारखे शॉर्ट फॉर्म लोकांना समजत नाहीत, असे पंतप्रधानांना वाटत होते. पंतप्रधानांना अपेक्षित असलेले अॅप विकसित करण्यास किती वेळ लागेल, असा प्रश्न सरकारने नोव्हेंबरअखेर त्यांना विचारला. निखिल यांनी उत्तर दिले, तीन आठवडे. सरकारी अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला. त्यांना वाटले, तीन वर्षे लागतील. अखेर ते तीन आठवड्यांत बनवा, असे निखिल यांना सांगण्यात आले.
  
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीम अॅप लाँच केले. काही दिवसांतच ते देशात अँड्रॉइडवर सर्वाधिक मोफत डाउनलोड होणारे अॅप बनले. ते यूपीआयवर त्वरित पेमेंटची सुविधा देते. कोणत्याही बँकेतून कोणालाही रक्कम पाठवता यावी, असे अॅप पंतप्रधानांना नोटाबंदीनंतर हवे होते. सरकारच्या निर्देशानंतर निखिल यांनी ते बनवले.  
 
 
निखिल यांनी पहिल्या आठवड्यात त्याची संकल्पना तयार केली, डिझायनिंगवर काम केले आणि त्याचा प्रोटोटाइप बनवला. नंतरच्या दोन आठवड्यांत ते विकसित केले. 
 २५ डिसेंबरला निखिल आणि त्यांचा चमू दिल्लीला गेले. आधी त्यांनी नीती आयोगात सादरीकरण केले. त्यानंतर पीएमओत गेले. निखिल आणि त्यांचे सहकारी अत्यंत उत्साहित होते. त्यांच्या चमूचे सरासरी वय २४ ते २५ वर्षे आहे. या चमूला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली. पंतप्रधानांनी तत्काळ या अॅपचे नामकरण केले ‘भीम’. 
 
फक्त पाच मिनिटांत पंतप्रधानांनी या अॅपचे सर्व फीचर्स स्वत: समजून घेतले आणि पहिला व्यवहार केला. निखिल यांचा जन्म कर्नाटकमधील कोलारचा. ते आई-वडिलांसह बंगळुरूत राहतात. ते अॅक्सोटेलमध्ये चीफ अॅव्हेंजलिस्ट होते, नंतर आणखी दोन टेक्नॉलॉजी कंपन्यांत होते आणि आता ते प्रॉडक्टनेशन डॉट इनमध्ये काम करत आहेत. त्यांना एक धाकटा भाऊही आहे.
 
पुढे पाहा, निखिलचा कुटुंबाबरोबरचा फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...