आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेत: अरोकीस्वामींना म्हणतात देशाचा ‘डायग्नोस्टीक किंग’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी सुमति (डावीकडे) दोन मुलांसोबत अरोकीस्वामी वेलुमणी (मध्यभागी) - Divya Marathi
पत्नी सुमति (डावीकडे) दोन मुलांसोबत अरोकीस्वामी वेलुमणी (मध्यभागी)
चर्चेत - अरोकीस्वामी वेलुमणी, उद्योजक 
जन्म- १९५९
शिक्षण- बीएस्सी थायरॉइड बायोकेमिस्ट्रीत डॉक्टरेट  
कुटुंब - पत्नी सुमती आता नाही, एक मुलगी, एक मुलगा   
का चर्चेत -  यांच्या कंपनीला श्रेष्ठ हेल्थकेअर कंपनीच्या रूपात घोषित केले गेले आहे.  
 
कोइम्बत्तूरजवळील एका लहानशा गावात एका भूमिहीन शेतकऱ्याच्या घरी अरोकीस्वामींचा जन्म झाला. वडिलांनी कुटुंबाची देखरेख केलीच नाही, तेव्हा आईला पुढे यावे लागले. आईने दोन म्हशी खरेदी केल्या आणि १० वर्षे हे काम केले. ५० रु. एका आठवड्याला मिळत असत. त्यातच चार मुलांचे पालनपोषण होत होते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अरोकीस्वामीला गाव सोडावे लागले.  गावकरी म्हणायचे ज्याला गोऱ्या मुलीशी लग्न करायचे आहे तो महाविद्यालयात प्रवेश घेतो.   

१९ वर्षांच्या वेलुमणीने पदवी पूर्ण केली, पण नोकरी कोइम्बतूरमध्ये मिळाली. इंग्लिशवरील पकड चांगली नव्हती. त्यावेळी जो अनुभव मिळाला, त्याच कारणाने ते आजही आपल्या कंपनीत फ्रेशरलाच नोकरी देतात. एका कंपनीत नोकरी तर मिळाली. चार वर्षांच्या नोकरीनंतर वेलुमणीला वाटले की येथे आता आपला गुजारा होईल. वेलुमणीने तेव्हा भाभा अणू संशोधन केंद्रात शास्त्रज्ञाच्या नोकरीसाठी अर्ज केला. मुलाखतीनंतर निवड तर झाली आणि ८८० रु. महिन्याची नोकरी त्यांना मिळाली.  
 
सरकारी नोकरी ८ तासांची होती तेव्हा मुलांच्या शिकवण्या घेणे सुरू केले. यात अतिरिक्त ८०० रुपयांचे उत्पन्न होत असे. १२०० रुपये ते घरी पाठवू लागले. आईला खोटेच सांगितले की, वेतन २००० रुपये मिळले आहे. जर तिला कळाले असते की फक्त ८०० रु. च मिळतात तर तिने गावच सोडू दिले नसते.  
 
अरोकीस्वामी २७ वर्षांचे झाले होते. आता त्यांच्यासाठी मुलगी पाहणे सुरू झाले. एक मुलगी
एसबीआयमध्ये होती. अरोकीस्वामी यांनी केवळ एकदा तिला पाहिले आणि स्थळास होकार दिला ती गोरी नव्हती, पण अरोकीस्वामी तिला नकारही देऊ इच्छित नव्हते. सुमतीशी लग्नानंतर अरोकीस्वामींनी पीएचडी केली. तेव्हापर्यंत ते दोन मुलांचे वडीलही झाले होते.  पत्नीची इच्छा होती की, दिरांनी देखील प्रगती करावी.  नोकरी करताना त्यांनी पाहिले की, थायरॉइडच्या चाचणीत मुंबईत लोक खूपच पैसा कमावत आहेत. १९९५ मध्ये अरोकीस्वामींनी पत्नीशी सल्लामसलत न करताच नोकरी सोडून दिली. रात्री दोन वाजता त्यांनी पत्नीला सांगितले की, मी नोकरी सोडली तर पत्नीचे उत्तर होते बरोबर जगू आणि बरोबरच मरू. यानंतर थायरोकेअरची पहिली प्रयोगशाळा भायखळा येथे त्यांनी सुरू केली. एचआर १९९६ पासून पत्नी हे पाहत होती. पत्नीच्या मदतीने २ लाख रुपयांत उभी केली थायरोकेअरच्या आयपीओच्या चार महिने आधीच पत्नीचे निधन झाले. हा दोघांच्या संयुक्त कष्टाचा परिणाम होता. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, वादग्रस्त  - सुनील मंत्री, रिअल इस्टेट डेव्हलपर अाणि प्रेरणादायी  - डॉ. जॅक प्रेगर, चिकित्सक ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...