आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण : मुलाच्या ई-मेलमुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडकले वादात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण काहीसे थंडावले असल्याची चुणूक असतानाच ट्रम्प यांचा मुलगा ज्युनियर ट्रम्पवर कॅमेऱ्यापुढे माफी मागण्याची वेळ आली. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ज्युनियर ट्रम्पने रशियन अधिकाऱ्यांशी गोपनीय तसेच संवेदनशील माहितीची देवाणघेवाण केली. शिवाय, सीन व्हॅनिटी यांच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, त्यांचा मुलगा, जावई आणि सल्लागारांनी रशियाशी संगनमत करून निवडणुकीचा निकाल फिरवण्यासाठी प्रयत्न केले किंवा नाही हा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांपुढे सध्या चौकशीचा विषय आहे. मात्र, त्यांना रशियाच्या सहकार्याची इच्छा होती हे ज्युनियर ट्रम्पच्या ट्विटवरून स्पष्ट झाले. असे आरोप सुडाच्या भावनेने केले जाते, असा दावा ट्रम्प कुटुंबीयाने आधी केला होता. २४ जुलै २०१६ रोजी ज्युनियर ट्रम्पनेही ही बाब लाजिरवाणी असल्याचे म्हटले होते. रशिया वडिलांच्या निवडणूक प्रचारात मदतीस इच्छुक होता व याची माहिती आपल्याला होती, असे त्याने म्हटले आहे.  याचे प्रमाण ‘रशिया-क्लिंटन-प्रायव्हेट अँड कॉन्फेडेन्शिअल’ या शीर्षकाखाली आलेल्या मेलमधून मिळते. हा मेल ज्युनियर ट्रम्पने भाऊजी जेरेड कुशनर व निवडणूक प्रचार अभियानाचे माजी व्यवस्थापक पॉल मानाफोर्ट यांना पाठवला होता. त्यानंतर एका रशियन पाहुण्यांची त्याने ट्रम्प टॉवर्समध्ये भेट घेतली होती. त्या पाहुण्याने हिलरी क्लिंटन यांच्याविरोधातील दस्तऐवज देण्याबाबत चर्चा केली होती. त्या दस्तऐवजाची डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक प्रचारात मदत मिळाली असती. दस्तऐवज अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील असूनही रशियाचे सरकार तुमच्या मदतीस इच्छुक आहे, असे त्या पाहुण्याने ट्रम्पला सांगितले होते. प्रायमरीजमध्ये विजय मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या दावेदारीसाठी ट्रम्प प्रयत्न करत होते त्या वेळची ही गोष्ट आहे.  या बैठकीनींतर ट्रम्प यांनी घोषणाही केली होती की, आपण क्लिंटन कुटुंबीयांची अनेक गोपनीय रहस्ये उघडकीस आणणार आहे. दरम्यान, ज्युनियर ट्रम्पने ट्विटरवरून खुलासा केला आहे की, रशियाकडून मिळालेले दस्तऐवज तितके महत्त्वाचे नव्हते.  याच्याशी वडिलाचा संबंध नसल्याचे त्याने व्हॅनिटीच्या शोमध्येही म्हटले होते. व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यानेही यास दुजोरा दिला आहे. आपण हा चारपानी ईमेल पूर्ण वाचू शकलो नाही, असा कुशनर यांचा दावा अाहे. रशियन पाहुण्याच्या बैठकीनंतर काय झाले यापेक्षा या तिघांनी नेमके काय केले हे अधिक महत्त्वाचे आहे. राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या प्रवक्त्यांप्रमाणे या तिघांनी रशियाच्या मदतीचा दावा फेटाळलेला नाही. मदतीच्या अपेक्षेने ते रशियन संदेशवाहकाला भेटण्यासाठी ट्रम्प टॉवरपर्यंत गेले. अन्य देशांकडून निवडणूक प्रभावित करण्याच्या प्रयत्नांचाही त्यांनी खुलासा केला नाही. विशेष म्हणजे कुशनर यांनी त्यांच्या सिक्युरिटी क्लियरन्स अर्जात याचा साधा उल्लेखही केला नाही.  
 
२०१६ हे वर्ष अमेरिकेसाठी परिवर्तनाचे ठरले. राष्ट्राध्यक्षपदाच्या अलोकप्रिय उमेदवारांसोबतच लाखो लोकही हिलरी क्लिंटन यांचा वारू रोखण्यासाठी समझोता करण्यास तयार होते, तर निवडणूक प्रचाराच्या शेवटपर्यंत लाखो लोक ट्रम्प यांना रोखण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सह्या करत होते. रशियाचे प्रकरण यापेक्षा वेगळे आहे. रशिया अमेरिकेचा कट्टर शत्रू आहे. ज्युनियर ट्रम्पपर्यंत ही माहिती क्रेमलिनच्या मुख्य वकिलाने अरास अगलारोव्ह या व्यापाऱ्याच्या माध्यमातून पाठवली. अगलारोव्ह यांनी २०१३ मध्ये मॉस्कोत मिस युनिव्हर्स स्पर्धेचे आयोजन केले होते तेव्हापासून ट्रम्प  अन् त्यांच्यात मैत्री आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशीही अगलारोव्ह यांचे घनिष्ट संबंध आहेत. हा करार संपुष्टात आल्यानंतरही अगलारोव्ह ट्रम्पच्या संपर्कात होते. त्यांचे रशियातील वकील यूरी शायका यांच्याशीही संबंध आहेत. या प्रकरणाला देशभक्तीपेक्षा जास्त कायदेशीर व राजकीय कंगोरे आहेत. १९७४ मध्ये बेन्टसेन घटनादुरुस्तीनंतर अनेक प्रकारच्या माहितींच्या देवाणघेवाणीवर बंदी आहे. क्लिंटन यांची माहिती प्राप्त करून ज्युनियर ट्रम्पने या कायद्याचे उल्लंघन केले की नाही याबाबत कायदेपंडितांची परस्परविरोधी मते आहेत. काही जण ज्युनियर ट्रम्पला लोगान अॅक्टमधील तरतुदींचे दोषी मानतात. १८ व्या शतकातील या कायद्यानुसार देशांतर्गत वादासाठी अन्य देशांची मदत घेण्यावर बंदी आहे.  २०० वर्षांत या कायद्यानुसार कुणालाच शिक्षा झालेली नाही. डेमोक्रॅट सिनेटर टिम कॅने यांनी हे खोटारडेपणा, विश्वासघात आणि देशद्रोहाचे प्रकरण असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यामुळे कुशेनर यांना अडचणी येऊ शकतात. पण काहीच लिखित न दिल्यामुळे ज्युनियर ट्रम्प आणि मानाफोर्टबाबत साशंकता आहे.
 
नव्या खुलाशामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अडचणीत वाढ  
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी या प्रकरणाचे राजकीय परिणाम घातक ठरू शकतात. ईमेल सार्वजनिक झाल्यानंतर रिपब्लिकन सिनेटरसुद्धा ट्रम्प कुटुंबीयांच्या बचावासाठी सरसावले नव्हते. २०१८ वर्ष लवकरच येणार आहे. त्यामुळे आपल्या नेत्यासोबत किती लोक आहेत हे रिपब्लिकन पक्षाला ठरवावे लागणार आहे. माध्यमांपासून सरकारी संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्येही संशयाचे वातावरण आहे. ज्यूनियर ट्रम्पच्या ईमेल खुलाशाचे परिणाम किती गंभीर असतील हे अद्याप स्पष्ट नसले तरी डोनाल्ड ट्रम्प या प्रकरणामुळे चांगलेच त्रासले आहेत. तथापि, यासाठी ट्रम्प यांचेच निर्णय जबाबदार असल्याचे मानायला स्वत: ट्रम्प यांनी त्यांचे समर्थक तयार नाहीत. निवडणूक प्रचारादरम्यान पुतिन यांचे तोंडभरून कौतुक करणे, मानाफोर्ट आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लिनला नियुक्ती दिल्याने या आरोपाला बळ मिळत आहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, वादविवाद - ब्रिटनमधील एका बालकाच्या उपचाराचा मुद्दा बनला जागतिक...
बातम्या आणखी आहेत...