आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रिल ऑपरेटर म्हणून सुरुवात; आता 13 अब्ज डॉलर्सचे मालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वगीट अलकपेरोव्ह, अध्यक्ष, ल्यूकॉइल - Divya Marathi
वगीट अलकपेरोव्ह, अध्यक्ष, ल्यूकॉइल
-  ‘ऑइल ऑफ रशिया-पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर’ नामक पुस्तकाचे लेखन अलकपेरोव्ह यांनी केले.  
- रिजनल सोशल प्रोग्राम सुरू केला होता.  
- बिझनेसची ३५ पेक्षा अधिक देशात व्याप्ती. कंपनीत १ लाख १० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी. 
 
अलकपेरोव्ह यांनी १९७२ मध्ये वेस्ट सैबेरियन ऑइल प्रॉडक्शन कंपनीत ड्रिल ऑपरेटर म्हणून करिअरची सुरुवात  केली होती. आज १३.३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे ते मालक आहेत. ड्रिल ऑपरेटर पदावर असताना चमूचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. महासंचालक पदापर्यंत त्यांची पदोन्नती झाली. सोव्हिएत युनियनमध्ये तेल इंधन मंत्रालयात सहमंत्रिपदी काम केले. १९९१ मध्ये त्यांच्याकडे तीन महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी होती. याचदरम्यान त्यांनी ल्यूकॉइल कंपनी सुरू केली. ही आज रशियातील सर्वात मोठी स्वायत्त तेल शुद्धीकरण कंपनी आहे.  

अलकपेरोव्ह यांचे वडील ऑइल कंपनीत काम करत. वयाच्या १८ व्या वर्षी तेदेखील ऑइल कंपनीत नोकरी करू लागले. सोबत शिक्षणही सुरू होते. अझरबैजान ऑइल आणि गॅस इन्स्टिट्यूटमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी तांत्रिक बाजू समजून घेतल्या. कंपनीसमोर याच मुख्य समस्या होत्या. यात खनिकर्म, शुद्धीकरण, विपणन, वितरण याविषयी समस्या होत्या. संशोधनाद्वारे तेल उत्पादनाला एकीकृत करण्याचा फॉर्म्युला तयार केला आणि समस्यांवर विविध उपाय सुचवले. रशियन तेल कंपन्यांना जागतिक बाजारात स्पर्धा करण्यासाठी ब्रिटिश तेल कंपन्या तसेच ब्रिटिश पेट्रोलियम आणि शेलप्रमाणे काम करावे लागेल असे ते म्हणत. डॉक्टरेट पदवी त्यांनी मिळवली. ‘ऑइल मॅन’ अशी त्यांची आेळख निर्माण झाली. त्यांना नव्या पद्धतीने काम करायचे होते. याचदरम्यान कॅस्पियन समुद्रात ड्रिलिंग प्लॅटफॉर्मवर काम करताना स्फोट झाला. यात ते नशिबानेच वाचले. या अपघातात त्यांच्या दोन सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. अलकपेरोव्ह यांनी १९८३ मध्ये ऑइल कंपनीचे काम स्वतंत्र स्वरूपात हाती घेतले. त्यांच्या परिसरात तेलाच्या वखारी होत्या. त्यांनी भांडवलशाही पद्धतीने तेलाचे उत्पादन सुरू केले. कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी साम्यवादी स्वरूपाची कार्यसंस्कृती ठेवली. कामगारांसाठी घरापासून इतर सुविधादेखील पुरवल्या. त्यांच्या व्यवस्थापनामुळे पूर्वी २ दशलक्ष बॅरल उत्पादन होते, ते १९९० पर्यंत २४० बॅरलपर्यंत गेले. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच १९९० मध्ये त्यांना उपपेट्रोलियम मंत्रिपद मिळाले. या वेळी सोव्हिएत रशिया विघटनाच्या उंबरठ्यावर होता. १९९१ नंतर सरकारी तेल कंपन्यांचे खासगीकरण सुरू झाले.  अलकपेरोव्ह यांनी ल्यूकॉइल नावाची स्वत:ची कंपनी स्थापली. त्या वेळी रशियातील ही पहिली खासगी तेल कंपनी होती. दोन वर्षांनंतर १९९३ मध्ये पेट्रोलियम मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सोव्हिएत युनियनची स्थित्यंतरे आपण पाहिली असल्याचे ते सांगतात. त्याच काळात आपल्यातही बदल झाले. यावर त्यांनी ‘ऑइल ऑफ रशिया-पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर’ हे पुस्तक लिहिले. त्यांनी प्रादेशिक सार्वजनिक योजनाही सुरू केली. अवर फ्यूचर नामक योजनेद्वारे त्यांनी सोशल आंत्रप्रेन्योरशिपला प्रोत्साहन दिले. आज ल्यूकॉइलची गणना जगातील आघाडीच्या तेल आणि गॅस कंपन्यांमध्ये होते. त्याची व्याप्ती ३५ पेक्षा अधिक देशांत आहे. २०१४ कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ लाख १० हजारपेक्षा अधिक होती.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
> सकाळचे व्यवस्थापन - जगातील दिग्गज उद्योजक महिलांचा असा उगवतो दिवस 
>  युक्तिवादाचे व्यवस्थापन  - चर्चेदरम्यान आदर राखण्याच्या पद्धतीच
> भीतीचे व्यवस्थापन - भीतीची भावना नैसर्गिक, बिंबवलेलीही
बातम्या आणखी आहेत...