आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपातविरोधी अभियानात हेरगिरीची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोनिका मेकलेमोर अमेरिकेच्या बाल्टीमोरमध्ये हयात रिजन्सी हॉटेलच्या बारमध्ये बसलेल्या होत्या तेव्हा एक अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आला. त्याने ओळख देताना मी महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे सांगितले.राष्ट्रीय गर्भपात फेडरेशनच्या बैठकीत काहीवेळापूर्वी झालेल्या मोनिका यांच्या भाषणाचे त्याने कौतुक केले. मोनिका वैज्ञानिक आणि गर्भपात परिचारिका आहेत. तरुणाने त्यांना गर्भपातानंतर निघत असलेल्या भ्रूणाचे टिश्यू एकत्र करण्याच्या पद्धतीबाबत प्रश्न विचारले. उंदरांवर प्रयोग करण्यासाठी हे जाणून घ्यायचे असल्याचे तो म्हणाला.

एप्रिलमध्ये झालेल्या भेटीच्या तीन महिन्यांनंतर मोनिकाला समजले की, तो अनोळखी कुणी विद्यार्थी नव्हता. गर्भपात करणारे इतर लोक त्याला अस्तित्वहीन बायोमेडिकल कंपनीचा मॅनेजर रॉबर्टच्या नावाने ओळखतात. त्याचे खरे नाव डेविड डेलीडेन आहे.तो गर्भपातविरोधी कार्यकर्ता आहे. गेल्या अडीच वर्षांत गर्भपाताविरोधात सुरू असलेल्या अभियानाचा एक गुप्त एजंट आहे. २६ वर्षीय डेलीडेनने टाइम नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भ्रूणाचे टिश्यू घेणाऱ्या एजंटच्या रूपात- प्लांड पॅरेंटहुड संघटनेच्या आत डोकावण्याच्या अभियानाची माहिती दिली. त्याने बॉयोमेक्स प्रोक्योरमेंट सर्व्हिसेस् नामक कंपनी बनवली. खोटे ओळखपत्र मिळवले. वेेबसाइट सुरू केली. व्हिजिटिंग कार्ड बनवले. तो गर्भपात करणाऱ्या संघटनांच्या संमेलनामध्ये भाग घ्यायचा. डॉक्टरांकडून पूर्ण प्रक्रिया जाणून घेतली.

या गुंतागुंतीच्या अभियानाअंतर्गत अनेक गोपनीय व्हिडिओ बनवण्यात आले. त्यामुळे प्लांड पॅरेंटहुडला बचावाच्या मुद्रेत यावे लागले आहे आणि राजकीय केंद्रात गर्भपात परतला. डेलीडेनने गर्भपात केंद्रातील व्हिडिओ आणि डॉक्टरांशी केलेल्या गप्पांचे टेप जारी झाल्यानंतर फक्त दोन महिन्यांत अमेरिकी सरकार आर्थिक संकटात (शटडाऊन) सापडण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या नियोजनात प्लांड पॅरेंटहूडचा निधी बंद नाही केला तर (काँग्रेस) ३० सप्टेंबरला जे वित्तीय विधेयक पारित होणे गरजेचे आहे त्याला पक्ष विरोध करेल, असे रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांच्या एका गटाने सांगितले. एक वर्षासाठी रिपब्लिकन पक्षाच्या बहुमताने सदनात निधी न देण्याचे बिल पास केले आहे.

डेलीडेनचे स्टिंग ऑपरेशन मेडिकल जगतावर प्रकाश टाकते. अमेरिकेतील गर्भपात करणाऱ्या मोठ्या संस्थेने कसे मेडिकल रिसर्चच्या भ्रूणाचे टिश्यू सप्लाय केले हे त्या फुटेजवरून कळते. १९३० पासून भ्रूण टिश्यूचा अभ्यास मेडिकल रिसर्चचा भाग आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या संशोधनावर ५०२.८४ कोटी रुपये खर्च झाला. पार्किन्सन्स आजारावरील उपचाराच्या संशोधनामध्ये त्याची मदत होईल. डेलीडेनच्या रेकॉर्डिंगने पुरावे मिळू शकले नाहीत की, प्लांड पॅरेंटहुडने भ्रूणांच्या विक्रीतून नफा मिळवला. मात्र, या रहस्याने अनेकांना धक्का बसला.