आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 तासांचे काम 15 मिनिटांत करणाऱ्या सॉफ्टवेअरचे निर्माते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
-मिचो हाशीमोटो, संस्थापक हाशीकॉर्प - Divya Marathi
-मिचो हाशीमोटो, संस्थापक हाशीकॉर्प
वर्ष २०१० मध्ये मिचो हाशीमोटो वॉशिंग्टन विद्यापीठात शिक्षण घेत होते. शिक्षण घेत असताना ते एका कन्सल्टिंग कंपनीत कामही करत. संगणकातील सॉफ्टवेअर्स वेळखाऊ आहेत असे त्यांना जाणवले. हाशीमोटोंनी या प्रक्रियेला ऑटोमेटेड करण्यासाठी कोडिंग केले आणि त्यासाठी लागणारा १५ तासांचा वेळ १५ मिनिटांवर आणला. याच तंत्राच्या आधारे त्यांनी आपले वारग्रांट नामक सॉफ्टवेअर विकसित केले. आज याचे लाखो ग्राहक आहेत. हाशीकॉर्प ही त्यांची कंपनी आेपनसोर्स टूल्स देते. याद्वारे संगणक, सर्व्हर आणि डेटाबेसला ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर्स इन्स्टॉलेशन आणि कॉनफिगर करता येते. या स्टार्टअपमध्ये ६० लोक होते. ३.५ कोटी डॉलर्सचा फंड या कंपनीने उभारला आहे. यांच्या ग्राहकांमध्ये ईबे, पेपाल, डिस्ने, जवळपास सर्वच अमेरिकी बँका आणि अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश होतो. मिताशी सांगतात की, जपानीमध्ये हाशीचा अर्थ ‘सेतू’ होतो. त्यामुळे कंपनीचे नाव ‘हाशीकॉर्प’ ठेवले आहे. भविष्य आणि
वर्तमानादरम्यानचा हा सेतू आहे. ते सांगतात की, आम्ही संगणकासाठी नव्हे, तर लोकांसाठी सॉफ्टवेअर्सची निर्मिती करू इच्छितो.  

हाशीमोटो सध्या २७ वर्षांचे आहेत. ते वयाच्या १२ व्या वर्षी कोडिंग शिकले होते. व्हिडिआे गेम्सविषयी विलक्षण जिज्ञासा असल्याने ते कोडिंग शिकले. संगणकाची आवड त्यांना होती. महाविद्यालयात असताना वडील म्हणाले, हीच वेळ तुझ्या हातात आहे. संगणकासोबत किती प्रयोग करून दाखवायचे ते करून दाखव. यात अपयश आले तर डॉक्टर किंवा वकिलीविषयी विचार कर. पहिल्याच वर्षी त्यांना बिझनेसची संधी दिसून आली. विद्यार्थी क्लाससाठी नाव नोंदणी करण्यास येत. हे विद्यार्थी सकाळी ६ ला उठतात हे हाशीमोटोंच्या लक्षात आले. ते लांब रांगांमध्ये उभे असतात. तरीसुद्धा जो अभ्यासक्रम निवडायचा तो मिळत नाही. क्लाससाठी ऑटोमॅटिकली नोंदणी करता येण्याजोगे सॉफ्टवेअर निर्माण करण्याची कल्पना त्यांना सुचली. यासाठी विद्यार्थ्यांना काही पैसे मोजावे लागतील. ही सेवा अल्पावधीत लोकप्रिय ठरली. वार्षिक ५ लाख डॉलर्सची कमाई याद्वारे झाली. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी हा बिझनेस विकला. वडिलांना यामध्ये समाधान नव्हते. मुलाने काही भव्य काम करावे असे त्यांना वाटे. क्लास रजिस्ट्रेशन बिझनेसशिवाय त्यांनी महाविद्यालयीन जीवनात एका वेब डेव्हलपमेंट कंपनीत नोकरी केली. या नोकरीमुळेच संगणकशास्त्रात उच्च शिक्षण घेण्याची परवानगी वडिलांनी दिली. 

नोकरी करत असतानाच त्यांनी वारग्रांट आेपन सोर्स टूलची निर्मिती केली. त्यांच्या हाशीकॉर्पची पायाभरणी येथेच झाली. त्यांची भेट आरमॉन डाडगरशी झाली. दोघांनी पेड अॅड ऑन अॅप वारग्रांटची सुरुवात केली. १ वर्ष दोघे संस्थापक आणि १ कर्मचारी तिघेच काम करत. यादरम्यान नफा मिळाला. खूप प्रकल्प आल्याने मनुष्यबळ कमी पडू लागले. इतर मुलांकडे लहानपणी पैसे नसतात. आपल्याबाबतीतही तसेच होते असे ते सांगतात. गरजेपुरते पैसे पालकांकडून मिळत. त्यांनी प्रोग्रामिंग शिकणे सुरू केले. आेपन सोर्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांनी याचे ज्ञान घेतले. सॉफ्टवेअर आणि पुस्तक खरेदी करण्यासाठी पैसा नसे. ब्लॉग्ज आणि आेपन सोर्स कोडच्या माध्यमातून शिक्षण सुरू होते.  
 
- ६० कर्मचारी असलेल्या स्टार्टअपने ३५ दशलक्ष डॉलर्स निधी जमवला.  
- वयाच्या १२ व्या वर्षी कोडिंग, व्हिडिआे गेम्सद्वारे प्रेरणा घेतली.  
- यांच्या ग्राहकांमध्ये ईबे, डिस्ने, अनेक अमेरिकन बँकांचा समावेश.  
 
पुढील स्लाईडवर वाचा, संवाद व्यवस्थापन, स्वव्यवस्थापन, बैठक व्यवस्थापन आणि नात्यांचे व्यवस्थापन... 
बातम्या आणखी आहेत...