आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 शहरांत 8000 पेक्षा अधिक संपत्तीचे मालक होते ट्रामेल क्रो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रामेल क्रो यांचा जन्म १९१४ मध्ये डलास येथे झाला. वयाच्या १० व्या वर्षापासूनच छोटी-मोठी कामे करून करिअर सुरू केले. त्यांचे वडील बुककीपर होते. वडिलांची नोकरी गेली. कुटुंबाच्या पालनासाठी त्यांना काम करणे भाग पडले. ट्रामेल यांनी चिकन विक्रीच्या दुकानात काम केले. मालगाडीतून सामान उतरवण्याचे काम केले. एका बांधकाम साइटवर १५ सेेंट प्रतितास रोजगारावरही काम केले. एका किराणा दुकानात लिपिक म्हणून काम करू लागले. अशा रीतीने विविध कामे करत राहिले. सोबत शिक्षणही सुरू होते. हेच ट्रामेल पुढे अमेरिकेतील सर्वात मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर झाले. १९७१ मध्ये फोर्ब्जने आणि १९८६ मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये त्यांना अमेरिकेतील सर्वात मोठा लँडलॉर्ड म्हणून घोषित करण्यात आले. १०० पेक्षा अधिक शहरांत त्यांच्या नावे ८००० मालमत्ता आहेत.  

१९३२ मध्ये ते हायस्कूल ग्रॅज्युएट झाले. एका बँकेत काम सुरू असतानाच रात्री ते अकाउंटिंगचा अभ्यास करत. १९३८ मध्ये सीपीएची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर अर्नेस्ट अँड अर्नेस्ट कंपनीत ऑडिटर म्हणून रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धात नौदलात नोकरी केली. १९४६ मध्ये डलासला परतले. धान्य विक्रीचा व्यापार सुरू केला. चांगल्या संधीच्या शोधात हा व्यापार बंद केला. पहिली रिअल इस्टेट डील केली. एका इन्शुरन्स कंपनी आणि स्थानिक बँकेतून कर्ज घेतले. ट्रिनिटी नदीकाठी पहिले गोदाम जॉन एम स्टिमॉन्ससह भागीदारीत उभारले. बॅटरी कंपनीला हे लीजवर दिले. नंतर एका वेगळ्या तऱ्हेने त्यांनी व्यापार सुरू केला. याला तेव्हा ‘स्पेक्युलेटिव्ह बिल्डर’ म्हटले जात. ही नवी संकल्पना होती. यात बिल्डर खास कंपनीच्या मागणीनुसार गोदाम उभारतात आणि नंतर ते लीजवर दिले जाते. डलासमध्ये ५० विअर हाऊस उभारण्याचे उद्दिष्ट होते. त्याला भाड्याने देण्याची योजना त्यांनी बनवली. त्यांना यात यश आले. दशकभरात डलासमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट उद्योजक म्हणून ख्याती मिळवली. ७० च्या दशकात ट्रामेल क्रो यांनी कंपनीला देशव्यापी कंपनीत विकसित केले. ही अगदी नवी पद्धत होती. या वेळी बहुतांश बाजारावर स्थानिक बिल्डर्सचे वर्चस्व होते. आता एकच कंपनी देशभरात काम करत होती. त्यांनी हॉटेल्स, रुग्णालये आणि अनेक औद्योगिक प्रकल्पांवर काम केले. २००६ मध्ये त्यांनी कंपनी सीबी रिचर्ड हिल्स समूहाला २.२ अब्जांत विकली. २००९ मध्ये क्रो यांचे निधन झाले.  
 
- २६०० पेक्षा अधिक इमारती आणि संपत्ती विकसित करणारी कंपनी.  
- आज ६० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कंपनीचे बाजारमूल्य  
- स्पेक्युलेटिव्ह बिल्डरची नवी संकल्पना यांनी सुरू केली.
 
पुढील स्लाईडवर वाचा, स्वभाव नव्हे, चांगले काम बनवते महान...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...