आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी: कुष्ठरोग्याला भीक मागताना पाहून माजी राष्ट्रपतींच्या मुलीने बनवल्या ‘लेप्रसी कॉलनी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय - ७० वर्षे
वडील- आर. व्यंकटरमण (माजी राष्ट्रपती), आई जानकी (गृहिणी), दोन बहिणी विजया व लक्ष्मी.
पती- सेवानिवृत्त आयएएस डॉ. के. व्यंकटरमण
 
चर्चेचे कारण- कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांना अव्वयार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
तामिळनाडूच्या चेंगलपेटच्या एका सुताराला कुष्ठरोग जडला. त्यामुळे कामकाज ठप्प पडले. त्यामुळे त्याच्या प्रचंड हालअपेष्टा होऊ लागल्या. हजार रुपयांचे कर्ज मिळाले तरी काम भागेल, असे त्याला वाटत होते. तेव्हा त्याला पद्मा व्यंकटरमण यांच्याविषयी माहिती मिळाली. त्या अशा गरजूंना कर्ज मिळवून देतात. सुतार पद्मा यांच्याकडून हजार रुपये घेऊन पुन्हा कामाला लागला.  काम वाढल्याने गावातील १२ जणांना त्याने कामावरही ठेवले व पद्मा यांचे कर्जही चुकते केले. पद्मा या माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या थोरल्या कन्या आहेत. अनेक वर्षांपासून त्या कुष्ठरोग्यांसाठी काम करत आहेत. कुष्ठरोग्यांवर भीक मागण्याची वेळ नये म्हणून त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी १० सरकारी निवास व ३० वसाहती स्थापन केल्या आहेत. याची प्रेरणा पद्मा यांना किशोरावस्थेतच मिळाली. तेव्हा त्यांच्या घरासमोर पहाटेपासून लोकांची रांग लागायची. वडील त्या लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करायचे. तेव्हा पद्मा यांना त्याचा अर्थ उमगला नव्हता. त्यांचे लग्न आयएएस डॉ. के. व्यंकटरमण यांच्याशी झाले. ते वेल्लोरचे जिल्हाधिकारी असताना पद्मा यांनी  सामाजिक कार्य केले. नंतर पती संयुक्त राष्ट्राच्या व्हिएन्ना येथील मुख्यालयात रुजू झाल्यानंतर त्यासुद्धा त्यांच्यासोबतच गेल्या.

असे बदलले आयुष्य
१९९० मध्ये दिल्लीत एका सिग्नलवर एक कुष्ठरोगी भीक मागत होता. पद्मा यांना भीक मागण्याची वृत्ती वाढू द्यायची नव्हती. त्या तिथून गेल्या मात्र ते दृश्य त्यांच्या पटलावर कायमचेच कोरले गेले. पतीसोबत व्हिएन्नाहून परतल्या तरी ती घटना मनातून जात नव्हती. म्हणून काही महिन्यांतच कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचा निश्चय घेऊन त्या दिल्लीत परतल्या. 
सर्वप्रथम त्या दिल्लीतील ‘लेप्रसी कॉलनी’मध्ये गेल्या. तेथील कुष्ठरोगी पद्मा यांच्याकडूनही नि:शुल्क वस्तूंची अपेक्षा करत होते. मात्र, त्यांनी अशाप्रकारे काही देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी कुष्ठरोग्यांना स्वत:च स्वच्छतेसाठी लिक्विड आणि पावडरसारख्या काही वस्तू बनवण्यास सांगितले. सरकारने तेव्हाच श्रमिक विद्यापीठ सुरू केले. मग कुष्ठरोग्यांनी तयार केलेल्या उत्पादनांची रुग्णालये व राष्ट्रपती भवनातही मार्केटिंग होऊ लागली. उत्पादन विक्रीतून पैशासोबतच त्यांचा आत्मविश्वासही वाढू लागला. सध्या पद्मा वुमन्स इंडियन असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत. या संघटनेची स्थापना ७ मे १९१७ रोजी अॅनी बेझंट यांनी केली होती. यात सरोजिनी नायडूंसारख्या क्रांतिकारिकेचाही समावेश होता.
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
 - देशातील सर्वाधिक ट्रकच्या मालकाने केला ८०० कोटी रुपयांचा घोटाळा
- बेघर बालकांना आश्रय देणाऱ्या सुमन यांचा मुलाशीच संपत्तीचा वाद...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...