आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसव्या आयव्हीएफ केंद्रांवर सर्जरी करण्यासाठी देशात कायदाच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत नुकतीच डॉक्टर दांपत्याची नोंदणी निलंबित केली गेली. आयव्हीएफ क्लिनिकच्या निष्कर्षाबद्दल चुकीच्या जाहिराती दिल्या होत्या हे त्याचे कारण. नि:संतान दांपत्यांसाठी आयव्हीएफ यशस्वी पद्धत झाली आहे, पण जागोजागी सेंटर्स उघडल्यामुळे फसवणुकीची प्रकरणेही वाढली आहेत. यासाठी वेगळे नियम नसल्याने असे होत आहे. त्याचीच माहिती देणारा हा वृत्तांत...

कोचीयेथील एका इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये उपचार सुरू असताना शायनी विनरचा मृत्यू झाला. तेव्हा ती ४४ वर्षांची होती. डॉक्टरांच्या बेपर्वाईमुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. हे प्रकरण २०१३ चे आहे. शायनीच नव्हे, तर देशातील हजारो महिला आज संतानप्राप्तीसाठी या विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) क्लिनिकमध्ये जात आहेत. ही पद्धत यशस्वी आहे, पण देशात दररोज आयव्हीएफ क्लिनिक उघडत आहेत, तेही कुठल्याही नियम-कायद्याविना ही चिंतेची बाब आहे. त्यापैकी काहींकडे योग्य उपकरणे नाहीत तसेच क्वालिफाइड डॉक्टरही नाहीत. अनेक क्लिनिकच्या जाहिरातीही फसव्या असतात, त्यामुळे उपचारानंतर संतानप्राप्ती होईल, असे रुग्णांना १०० टक्के वाटते. दिल्ली आयव्हीएफ सेंटरचे प्रमुख डॉ. अनुज गुप्ता म्हणाले की, मूल होण्याची १०० टक्के गॅरंटी देणारी जाहिरात चुकीची आहे. अनेक नि:संतान दांपत्य अशा प्रकरणात बळी ठरले आहेत. अलीकडेच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियाने मुंबईतील डॉ. अनिरुद्ध मालपाणी आणि अंजली मालपाणी या दांपत्याची नोंदणी तीन महिन्यांसाठी निलंबित केली आहे. महिलांचे आरोग्य आणि त्यांच्या अधिकाराबद्दल काम करणाऱ्या ‘समा’ या संस्थेच्या प्रमुख एन. बी. सरोजनी म्हणतात की, जवळपास सर्व आयव्हीएफ सेंटर्सची संकेतस्थळे निपुत्रिक दांपत्यांना मूल होण्याची १०० टक्के हमी देत असल्याचे दिसते. पण त्याचा वारंवार वापर केल्यास महिलांवर दुष्परिणाम होतात हे कोणीही सांगत नाही. आमच्या संस्थेने महिला आणि बालविकास मंत्रालयाला विनंती केली आहे की, आपल्या नव्या एआरटी विधेयकात ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे आरोग्य मंत्रालयाला सांगण्यात यावे.

इंद्राणी आयव्हीएफ ग्रुपचे वैद्यकीय संचालक डॉ. क्षितिज मोडिया यांनी सांगितले की, इन्फर्टिलिटीची सर्वाधिक प्रकरणे भारत आणि चीनमध्येच आहेत. त्यामुळे आयव्हीएफ तंत्राने गर्भधारणाच उत्तम पर्याय आहे. १०-१५ वेळा अपयश येऊनही पुन्हा प्रयत्न करणाऱ्या अनेक दांपत्यांना आमच्या केंद्रात मूल मिळाले. अर्थात ते हेही मान्य करतात की, गल्ली-गल्लीत उघडणारी केंद्रे ही चिंतेची बाब आहे कारण त्यासाठी दक्ष डॉक्टर आणि उत्तम उपकरणे हवीत. याबाबत ‘दिव्य मराठी’ने देशभर पडताळणी केली तेव्हा या केंद्रांच्या नोंदणीसाठी कुठलेही नियम नसल्याने त्यांची संख्या वेगाने वाढत असल्याचे समोर आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डाॅ. अरुण पांडा यांनी सांगितले की, चुकीच्या जाहिरातींच्या आडून रुग्णांच्या जिवाशी खेळ केल्याची अनेक प्रकरणे केंद्र सरकारच्या नजरेत आली आहेत. डॉक्टरांच्या इथिक्स प्रकरणांवर कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियालाच आहे. अशा प्रकरणांत अजूनही शिक्षा करण्याच्या तरतुदी खूप जुन्या आहेत. अलीकडेच आरोग्य मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे. ती इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्टमधील (आयएमसी) सध्याच्या तरतुदी आणि नियमांचा आढावा घेऊन बदलांची शिफारस करेल.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) आपल्या एआरटी-विधेयक २०१४ मध्ये विशेषत्वाने आयव्हीएफ प्रकरणात गांभीर्य दाखवून अनेक नियम आणि दिशानिर्देश तयार केले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, फक्त २३-५० वर्षांपर्यंतच्या निपुत्रिक महिलांवर या तंत्राचा वापर करण्यात यावा. त्याशिवाय प्रत्येक आयव्हीएफ सेंटरने अनिवार्यपणे प्रत्येक निपुत्रिक महिलेला पूर्ण तपशिलासह डिस्चार्ज पेपर जारी करण्याचीही तरतूद आहे. ते यासाठी की एका सेंटरमध्ये आयव्हीएफ अयशस्वी झाल्यास दुसऱ्या सेंटरमध्ये वेगवेगळ्या तपासण्यांसाठी महिलांना जास्त रक्कम खर्च करण्याची गरज पडू नये. त्याचबरोबर नव्या आयव्हीएफ सेंटरला आधी वापरलेल्या तंत्राची माहिती व्हावी. अर्थात हे विधेयक संसदेत असल्यामुळे त्याबाबत जास्त काही सांगता येणार नाही.

महाराष्ट्रातलिंग निदान होते : आरोग्यमंत्रीडॉ. दीपक सावंत यांच्या मते, या केंद्रांच्या माध्यमातून लिंग निदानही केले जाते आणि सरोगसीसाठी शोषणाचे काही प्रकारही समोर आले आहेत. अर्थात त्याची ठोस माहिती सरकारकडे नाही. राज्यात एकूण ५२५ आयव्हीएफ केंद्र आहेत. १९८ केंद्रांनी बॉम्बे नर्सिंग अॅक्ट आणि क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्टनुसार नोंदणी केली आहे. उर्वरित ३२७ केंद्रांना तीन महिन्यांत नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे.

येथे तर नोंदणी करण्यास दिला नकार
कोटामध्येआयव्हीएफ सेंटर चालवणाऱ्या डॉ. अर्शी इक्बाल म्हणाल्या की, आम्ही नोंदणी करू इच्छितो. मी सीएमएचओंकडे अर्ज दिला तेव्हा त्यांनी तुमची नोंदणी करावी, असा कायदाच नसल्याचे लेखी उत्तर दिले. आता इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च त्यासाठी कायदा तयार करत आहे.

३० टक्क्यांच्या आसपास यश
‘आयव्हीएफद्वारे गर्भधारणेतील यशाचा दर २०-३५ टक्केच आहे. अर्थात कोणतीही महिला ५० वर्षांपर्यंत गर्भधारणेचा प्रयत्न करू शकते. -अनुप गुप्ता, प्रमुख, दिल्ली आयव्हीएफ सेंटर
‘बहुतांशसेंटर स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रणाकडे लक्ष देत नाहीत. सेंटर्सचा दर्जाही चांगला असणे आवश्यक आहे. -डॉ. सुनीता मित्तल, गायनकॉलॉजिस्ट, फोर्टिस

गर्भधारणेसाठी महिलेचे बीजांडच बदलले
केरळच्याअनिता जयादेवन यांना लग्नानंतर मूल झाल्याने त्यांनी एका फर्टिलिटी क्लिनिकची मदत घेण्याचे ठरवले. पण त्यांची फसवणूक झाली. अनिता यांचा आरोप आहे की, डॉक्टरांनी डोनरच्या बीजांडाद्वारे त्यांची गर्भधारणा केली. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यासाठी अनिता आणि त्यांच्या पतीने मूक संमती दिली होती. त्यानंतर अनिता यांनी या अनुभवावर एक पुस्तकही लिहिले आहे.

१० केंद्रांत जाऊन आणि ३० लाख खर्चूनही अपत्यप्राप्ती नाही
दिल्लीच्या४५ वर्षीय पायल कौर (नाव बदलले) १० वर्षांपासून आयव्हीएफमार्फत गर्भधारणा करू इच्छित आहेत. त्यांनी ३५ व्या वर्षी पहिल्यांदा एका प्रख्यात आयव्हीएफ केंद्रात जाऊन गर्भधारणेचा प्रयत्न केला. १० वर्षांत १० सेंटर्स बदलली आणि ३० लाखांपेक्षा जास्त खर्च करूनही यश मिळाले नाही. त्यामुळे आणखी किती वाट पाहावी लागेल, असा प्रश्न निर्माण होतो.

उपचारादरम्यानच झाला महिलेचा मृत्यू
२३वर्षीय एम. हरिनाची अभियांत्रिकी पदवीधर होती. मूल झाल्याने तिने चेन्नईचे एक फर्टिलिटी क्लिनिक निवडले. पण एका चाचणीदरम्यान अॅनेस्थेशिया दिल्यावर तिचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी डॉक्टरांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि डॉक्टरांमुळेच तिचा मृत्यू झाला असे म्हटले. असाच प्रकार जालंधरच्या राशी शर्माबाबतही झाला. तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

५ लाखांत मुलगा जन्माला घालण्याचे खोटे आश्वासन
कॅनडातराहणारे अमरिक सिंह आणि त्याची पत्नी रूपिंदर कौर यांनी २००५ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यात म्हटले होते की, आपण जालंधरच्या एका सेंटरमध्ये उपचार केले होते. कौर म्हणाल्या की, सेंटरने पाच लाख रुपये घेऊन त्यांना आयव्हीएफद्वारे मुलगा जन्माला घालण्याचे आश्वासन दिले होते. नंतर कौर यांची कॅनडात प्रसूती झाली असता त्यांना मुलगी झाली. त्यानंतर त्यांनी सेंटरविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.