आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम यांनी चर्चेची तयारी दर्शवली तरच तणाव निवळेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरिया आणि अमेरिका संबंध नेहमीच शत्रुत्वाचे राहिले आहेत. उत्तर कोरिया नेहमी अमेरिकेला नष्ट करण्याची धमकी देतो. अमेरिकेनेदेखील त्यांच्याच शैलीत प्रतिहल्ला केल्याच्या घटना क्वचित आहेत. मात्र ८ ऑगस्ट रोजी उत्तर कोरियाविरुद्ध संयुक्त राष्ट्राने नव्या निर्बंधांना लागू केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील उ. कोरियाविरुद्ध त्यानंतर भाषणबाजी केली. जगाने कल्पनाही केली नसेल इतका उ. कोरियात विध्वंस करू, असे ट्रम्प म्हणाले. यानंतर परस्परांवर विखारी टीकांची मालिकाच सुरू झाली. सीआयएचे संचालक माइक मोरेल यांनी म्हटले की, १९६२ मध्ये क्यूबा संकटानंतर प्रथमच परिस्थिती बिकट झाली आहे. युद्धापासून दोन्ही देशांना रोखण्याचे मार्ग आहेत. उत्तर कोरियाने अमेरिका अथवा त्याच्या मित्रराष्ट्रांवर हल्ला केला तर किम जोंग उन यांची सत्ताच संपुष्टात येईल. दुसरीकडे, अमेरिकेने हल्ला केला तर उत्तर कोरिया सेऊल आणि टोकियोसारख्या शहरांवर हल्ला करून हजारो लोकांचे जीव घेऊ शकतो. अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांच्या वारंवार चाचण्या घेऊन आपली शस्त्रास्त्र सज्जता उ. कोरियाने सिद्ध केली आहे.  

प्रक्षोभक टीकांची मालिका संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने उ. कोरियाविरुद्ध निर्बंध २३७१ इतक्या मतांनी मंजूर केल्यानंतर सुरू झाली. उ. कोरियाला एक तृतीयांश परकीय चलनाची कमतरता भासेल. हा प्रस्ताव चीन आणि रशियाने नकाराधिकार न वापरल्याने संमत होऊ शकला. सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका बीजिंगची आहे. उ. कोरियाच्या व्यापाराचा ९०% वाटा चीनवर अवलंबून आहे. चीनने निर्बंध गांभीर्याने घेतले तर उत्तर कोरियात अराजकाची स्थिती निर्माण होऊ शकते. किम यांना चर्चेसाठी तयार व्हावे लागेल. चीन विनामूल्य मदत करू इच्छित नाही. उ. कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर रोख लावण्याच्या बदल्यात द. कोरियातून क्षेपणास्त्र काढून घेण्याची अट चीनने घातली आहे. चीनला सत्तेमध्ये किम जोंग उन हवे आहेत. 

यातून मध्यम मार्ग काढायचा झाल्यास किम जोंग यांनी ६ सदस्यीय चर्चेसाठी तयार होण्याची गरज आहे. यात उ. कोरिया, द. कोरिया, जपान, रशिया, चीन आणि अमेरिका सामील असतील. वर्ष २००३ ते २००९ दरम्यान या वाटाघाटी होत होत्या. त्यानंतर किम यांचे वडील किम जोंग दुसरे यातून बाहेर पडले. कोरियन पक्षकार वारंवार सद्दाम हुसेन आणि कर्नल गद्दाफींचे उदाहरण देतात. त्यांनी अण्वस्त्र कार्यक्रम बंद केल्यानंतर अमेरिकेने त्यांना सत्तेतून बेदखल केले होते. अमेरिकेने म्हटले आहे की, उ. कोरियात सत्तांतर घडवून आणण्याचा त्यांचा मनसुबा नाही. किम यांचा अमेरिकेवर भरवसा नाही. मात्र ते चर्चेत सहभागी झाले नाहीत तर पेच सुटणे कठीण होईल. 
बातम्या आणखी आहेत...