आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलच्या कोड युद्धाची ‘अंदर की बात’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या सॅन बर्नारडिनो, कॅलिफोर्निया येथे सय्यद रिझवान फारूक आणि तशफीन मलिक यांनी केलेल्या १४ व्यक्तींच्या हत्येनंतर फक्त एकच दिवसानंतर एफबीआयची टीम हल्लेखोरांच्या रेडलँड येथील निवासस्थानी पोहोचली. या पथकाने तेथून शस्त्रास्त्रांसह तीन सेलफोन जप्त केले. दोन फोन अतिरेक्यांनी नष्ट केले होते. तिसरा फोन मात्र सुरक्षित आहे. हा आयफोन ऑपरेटिंग सॉफ्टवेअर-९ याद्वारे चालणारा आयफोन-५ सी आहे. तपासणी अधिकाऱ्यांनी हा फोन चालू करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चारअंकी पासवर्ड या सेलफोनने मागितला.

एफबीआयजवळ पासकोड नव्हता. तो तयार करणाऱ्या फारुक आणि मलिक हल्ल्यानंतर काही तासांनी पोलिस चकमकीत मारले गेले होते. फोनमध्ये डाटा आहे परंतु त्यालाही पासवर्डची गरज आहे. हा फोन तयार करणाऱ्या अॅपल कंपनीजवळही याचा पासवर्ड नाही. यासंदर्भात एफबीआयने कंपनीशी संपर्क साधला, परंतु कोड नसल्यामुळे तपासणीत प्रगती होऊ शकली नाही. तेव्हा एफबीआयने सांगितले की, पासवर्ड नसेल तर आयओएस-९ हे नवीन व्हर्जन तयार करा. टाइमने यासंदर्भात अॅपल कंपनीचे प्रमुख टिम कुक यांच्याशी बातचीत केली. त्यांनी नवीन व्हर्जन बनवण्यास नकार दिला. अॅपलने नव्या व्हर्जनच्या कल्पनेला गव्हर्नमेंट ऑपरेटिंग सिस्टिम (जीओएस) असे नाव दिले. दुसऱ्या बाजूला एफबीआयने न्यायालयाच्या माध्यमातून हा जीओएस बनवण्याचे आदेश मिळवले. तेव्हा जगातील सर्वात प्रसिद्ध कंपनी असलेल्या अॅपलने दहशतवादासंदर्भात एफबीआयला सहकार्य न केल्याबद्दल संतापाची लाट उसळली. रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलवर बहिष्काराची घोषणा केली. सिलिकॉन व्हॅलीशी चांगले संबंध असणाऱ्या अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले की, दूरध्वनी क्षेत्रालाही अन्य क्षेत्रांचे मापदंड लावले जात आहेत. हे ठीक नाही. दुसऱ्या बाजूला एटी अँड टी, एअरबीएनबी, ईबे, किकस्टार्टर, लिंक्डइन, रेडिट, स्क्वेअर, ट्विटर, सिस्को, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप, अमेझॉन, गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट यासह अनेक कंपन्यांनी अॅपलचे समर्थन केले आहे. कुक यांचे म्हणणे आहे की, आम्ही जर आयफोन उघडण्याचे उपक्रम बनवले आणि हे उपकरण हॅकिंग करणाऱ्या लोकांच्या हाती लागले, तर आयफोनच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल. नागरिकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या हुकूमशहा सरकारच्या हातात जणू जळते कोलित दिल्यासारखे होईल. एफबीआयचे असे म्हणणे आहे की, नवीन कोड फक्त एका फोनसाठी असेल; परंतु याच्यात सुधारणा करून दुसरे फोन हॅक करणे सोपे होणार आहे. काहीही झाले तरी यामुळे लोकांचे खासगी जीवन धोक्यात येऊ शकते. या फोनचा गुप्त कोड हाच यावर चांगला मार्ग आहे. २०१३ मध्ये एडवर्ड स्नोडन याने जे काही खुलासे केले ते पाहून काही कंपन्यांनी आपल्या उपकरणात गुप्त कोड घालायला सुरुवात केली. २०१४ मध्ये आलेल्या अॅपलच्या फोनमध्ये आयओएस-८ ही सुरक्षित सिस्टिम आहे. गुगलचे पुढील अॅन्ड्रॉइड असेच असेल. आता कोर्ट हा निर्णय करेल की, मोबाइलची सुरक्षा तोडून लोकांचे खासगी जीवन धोक्यात आणायचे की नाही? अॅपलने घटनेचे नुकसान केल्याचा आरोप एफबीआयने केला आहे.
फोक्सवॅगनवर २४३ अब्ज रु. नुकसान भरपाईचा दावा
फोक्सवॅगनवर २७८ गुंतवणूकदारांनी २४३ अब्ज रुपयांचा दावा ठोकला आहे. अमेरिकन इमिशन चाचणीत धोका झाल्याचे समोर आल्याने जर्मन मोटार निर्मात्यांना शेअरमधील पडझडीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले.

हल्लेखोरांचे मानवाधिकार
२०११ मध्ये ७७ लोकांची हत्या करणाऱ्या नॉर्वेचा खुनी आरोपी एंडर्स बेहरिंग ब्रीविक याने आपल्याला तुरुंगात वेगळे ठेवल्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध खटला दाखल केला आहे. ब्रीविकचे म्हणणे आहे की, यामुळे मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे. त्याला तीन खोल्यांच्या सूटमध्ये ठेवण्यात आले आहे.

एका आईच्या ब्लॉगमुळे जपान सरकारला आली जाग
जपानचे पंतप्रधान शिंजो एबे यांनी २०१७ च्या अखेरपर्यंत ५ लाख नवीन डे केअर सेंटर उभारण्याची घोषणा केली. एक ब्लॉग त्यांच्या वाचनात आल्यानंतर त्यांनी
हा निर्णय घेतला. मुलांच्या देखभालीसाठी नोकरी सोडलेल्या महिलेने हा ब्लॉग लिहिला होता.
बातम्या आणखी आहेत...