आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोकेमॉनचे नवे व्हर्जन लोकप्रिय 80 नव्या पात्रांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को येथील नियांटिक या कंपनीचा पोकेमॉन गो हा स्मार्टफोन गो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोकप्रिय झाला आहे. कंपनीने आता या गेमचे नवे व्हर्जन लाँच केले आहे. पूर्वीच्या व्हर्जनपेक्षा नव्या व्हर्जनला लोकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आहे. कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, युझर्सनी हे व्हर्जन अपडेट केल्यास त्यांना गेममध्ये ८० नवे पात्र दिसतील. 
 
या नव्या व्हर्जनला जनरेशन-२ असे नाव देण्यात आले आहे. पोकेमॉन गोल्ड आणि पोकेमॉन सिल्व्हर व्हर्जनचा नवा गेम युझर्सला या आठवड्यात मिळू शकेल. यासाठी कंपनीने पूर्ण तयारी केली आहे. नव्या पिढीतील युझर्सना दररोज नवे अनुभव देण्यासाठी नवे पात्र आणि नव्या गोष्टींवर सतत काम केले जाते.
बातम्या आणखी आहेत...