आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना तीन वेळा पद्मश्री मिळालेले देशातील एकमेव गाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुबनी - बिहारच्या मधुबनी शहरापासून १० किमी अंतरावरचे जितवारपूर गाव. गेल्या महिन्यात हे गाव नव्याने चर्चेत आले . या वेळचे निमित्त आहेत बौआ देवी. त्यांना २६ जानेवारी रोजी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार प्राप्त होताच  देशाच्या इतिहासात गावाचे नाव सोनेरी अक्षराने  नोंदले गेले. गावच्या सर्वाधिक तीन जणींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान होणारे हे एकमेव गाव. केेंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हस्तशिल्प विभागातील माजी मुख्य डिझायनर  भास्कर कुलकर्णी यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १९६१- ६२ च्या दुष्काळात कुलकर्णी तिघींच्या संपर्कात आले होते.
 
१. दुसऱ्यांचे घर सजवून स्वत:चे घर चालवत होती
जगदंबा देवी, पद्मश्री मिळणाऱ्या गावच्या पहिल्या महिला . लहान वयात लग्न झाले. संततीसुख मिळाले नाही,त्यामुळे एकटेपणा घालवण्यासाठी त्या गृहसजावटीची कामे करू लागल्या. त्यांचे भाचे कमलनारायण म्हणाले, लग्न समारंभ, गृहप्रवेशावेळी घराची सजावट, रंगरंगोटी करून त्या घर चालवत. १९६१-६२ मध्ये दुष्काळानंतर भास्कर कुलकर्णी गावात आले. जगदंबा यांची चित्रकला पाहून ते चकित झाले. इंदिरा गांधींचे सांस्कृतिक सल्लागार पुपुल जयकरांनी त्यांच्या कामास प्रसिद्धी दिली. १९७५ मध्ये पद्मश्री  मिळाल्यानंतर १९८४ त्यांचे निधन झाले.
 
२. सीता देवीच्या पेंटिंगने इंदिरा गांधी प्रभावित
सीता देवी, यांचा जन्म सुपौल जिल्ह्यात झाला.  जगदंबा देवींसोबत त्या चित्रकलेत तयार झाल्या. त्यांच्यातील कलागुण पाहून भास्कर कुलकर्णींनी त्यांना प्रोत्साहन दिले. यादरम्यान बौआ देवींची त्यांची भेट झाली. नातू प्रभात झा म्हणाले, आजीच्या चित्रकलेवर जर्मनीच्या एरिका स्मिथसह अनेक विदेशींनी संशोधन केले. सन २००५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान आदी देशांत झाले. त्यांना १९८१ मध्ये पद्््मश्री मिळाला.
 
३. दीड रुपयांत विकत होती बौआ देवींची पेंटिंग, आज लाखोंची किंमत
बौआ देवी यांचे वयाच्या १२ व्या वर्षी लग्न झाले. सासरच्यांनी पाठिंबा दिल्यामुळे बौआ देवी चित्र काढत राहिल्या. १९७० मध्ये एका चित्राला दीड रुपया मिळत होता,आता त्याचे लाखो रुपये मिळतात,असे त्यांनी सांगितले. अमेरिकेत ९/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर बौआ देवी यांनी एका चित्रात गगनचुंबी इमारतीस कोब्रा नागाने विळखा घातल्याचे दाखवत लोकांच्या वेदना मांडल्या होत्या. या भावनेस जगात मोठी प्रसिद्धी मिळाली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...