आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन : पाळीव प्राण्यांमुळे मानवी आजारावर उपचार शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात पाळीव प्राणी आणि मानव यांचे घनिष्ठ संबंध आहेत. अमेरिकेत २०१५ मध्ये एका सर्वेक्षणानुसार ९५ टक्के मालक आपल्या पाळीव प्राण्याला कुटुंबाचा सदस्य मानतात. पाळीव प्राण्यांपासून आम्हाला फायदेदेखील आहेत. ज्या लोकांकडे पाळीव प्राणी आहेत त्यांच्या तुलनेत प्राणी न पाळणाऱ्या लोकांना रक्तदाब आण हृदयविकाराचा धोका कमी असतो असे दिसून आले आहे. पाळीव प्राण्यांबरोबर खेळल्याने व्यायाम होतो, तणावही दूर होतो. आता संशोधक असा पुरावा गोळा करत आहेत की, जटिल शारीरिक आजाराने प्रभावीत लोकांचे मानसिक स्वास्थ प्राण्यांमुळे चांगले होऊ शकते काय? या क्षेत्रात तसे कमी संशोधन झाले आहे, पण त्याचे इतके फायदे समोर आले की, पारंपरिक इलाजाबरोबर पशू प्राण्यांचे सहकार्य घेतल्याचे अनेक मार्ग समोर आले. परड्यू विद्यापीठात मानव-पशू संबंध केंद्राचे संचालक एलन बेक म्हणतात की, इन्फेक्शनच्या भीतीमुळे पूर्वी पाळीव प्राण्यांना रुग्णालयात आणण्याचा विचार लोक करत नव्हते. आता अनेक बाल रुग्णालयात कोणता ना कोणता तरी अॅनिमल प्रोग्रॅम चालूच असतो. माणसाच्या एकलकोडे पणावर पाळीव प्राण्यांची मदत होऊ शकते काय, यावर काम सुरु आहे. मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना वाटणारे भय आणि तणाव यावर अनेक प्रकारचे प्राणी सहकार्य करू शकतात असे दिसून आले आहे. मात्र यावर आणखी संधोधन गरजेचे आहे. पाहण्यांमधून असे दिसून आले आहे की, उपचार आणि चांगल्या मानसिक स्वास्थ्यांमध्ये प्राण्यांची भूमिका महत्त्वाची अाहे. या क्षेत्रात झालेल्या काही पाहण्यांवर नजर टाकूया..
 
ससा, कुत्रा, घोडा आणि माशांशी मैत्री मुले आणि किशोरवयीनांसाठी फायदेशीर
ससा- एका पाहणीत तणावग्रस्त वृद्धांना ससा, कासव पाळण्यासाठी तसेच तशा प्रकारचे खेळणे बाळगण्यास सांगण्यात आले. खेळण्याचा परिणाम तर काही झाला नाही, परंतु ससा किंवा कासव पाळल्याने चिंता कमी झाली.  ज्यांना प्राणी पसंद नव्हते, त्यांच्यासाठी हा उपचार फायदेशीर ठरला.  
 
झिंगुर- मानवाच्या मदतीसाठी जनावरांवर प्रेम करण्याची गरज नाही. जेरोंटॉलॉजी (वृद्धांच्या आजाराचे विज्ञान) या पत्रिकेत २०१६ मध्ये प्रकाशित एका पाहणीत सांगितले आहे की, वृद्धांच्या एका गटाला एका पिंजऱ्यातील पाच झिंगूर देण्यात आले. आठ आठवड्यानंतर त्यांच्यातील तणाव कमी झाला. जीवंत प्राण्याच्या देखभालीमुळे हा फरक पडला.
 
 घोडे-युरोपात १८६० पासून उपचारात घोड्यांचा वापर होत आहे. यावर अनेक संशोधने झाली. घोड्यांची देखभाल केल्यामुळे लहान मुले तसेच किशोरवयीनांचे पीटीएसडी सारखे मानसिक आजार कमी झाले. 
 
मासे- जनावरांमुळे माणूस एकाग्र होतो. अल्झायमर पीडित रुग्णांना जेव्हा रंगीत मासे असलेल्या मत्स्यालयासमोर भोजन देण्यात आले तेव्हा त्यांचा आहार वाढल्याचे दिसून आले. याशिवाय ते अधिक सतर्क झाले. 
 
श्वान- ज्या मुलांचे शिकण्यात लक्ष लागत नाही अशा ठिकाणी प्रशिक्षित श्वान आणि ट्रेनरसमोर शिकवल्यास भीतीची लक्षणे कमी झाल्याचे दिसून आले. ह्यूमन-अॅनिमल टफ्ट्स इन्स्टिट्यूूटच्या संचालिका  लीजा फ्रीमन सांगतात की, या मुलांचा दृष्टिकोन बदलला ते जास्त कुशल झाले.
 
गिनी पिग- परड्यू विद्यापीठाच्या मॅगी हेअर म्हणतात की, प्राण्यांमुळे मुले सामाजिक बनतात. दक्षिण अमेरिकत पाळीव उंदीर मोठ्या प्रमाणात आहेत. ऑटिझ्म पीडित लहान मुलांच्या वर्गात हे उंदीर सोडण्यात आले, तेव्हा या मुलांत खेेळी-मेळीचे वातावरण दिसून आले. त्यांनी हास्यविनोद केले आणि ते तणावमुक्त झाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...