Home | Magazine | Niramay | news about Psoriasis is a complex vitiligo

सोरायसिस एक किचकट त्वचारोग, ही अाहेत लक्षणे

डॉ. योगेश चव्हाण, एम.डी.(आयु.) केरळ | Update - Apr 03, 2017, 07:11 AM IST

पूर्वी तुरळक सापडणाारा सोरायसिस हल्ली सहजपणे अाढळणारा त्वचाविकार झालाय. जागतिक सोरायसिस फेड्रेशननुसार १०० पैकी २ ते ३ व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत.

 • news about Psoriasis is a complex vitiligo
  पूर्वी तुरळक सापडणाारा सोरायसिस हल्ली सहजपणे अाढळणारा त्वचाविकार झालाय. जागतिक सोरायसिस फेड्रेशननुसार १०० पैकी २ ते ३ व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत. सोरायसिस या ग्रीक शब्दाचा अर्थ खाज किंवा खवले पडणे असा होतो. हा एक किचकट त्वचाविकार असून, यावर आधुनिक वैद्यकशास्त्रात कुठलाही खात्रीशीर उपाय अद्याप नाही. आयुर्वेदानुसार या आजाराला एककुष्ठ असे म्हटले जाते. काही आयुर्वेदतज्ज्ञ याला किटिभ कुष्ठ देखील म्हणतात. चुकीच्या आहार-विहारामुळे शरीरातील पित्त प्रकुपित होते व ते आहाराचे योग्य पाचन करू शकत नाही. या कारणाने शरीरात आम तयार होतो व तो रस, रक्त, मांस व लसिका यांना दूषित करतो. अशा दुष्ट झालेल्या रस, रक्त, मांस व लसिका यांमुळे त्वचेवर माशासारखे खवले येणे, प्रचंड खाज येणे, खाजल्याने त्वचेवरचा कोंडा पडणे अशी लक्षणे दिसायला सुरुवात होते व ही लक्षणे दिवसेंदिवस वाढतच जातात. साधारणत: आपल्या त्वचेचा वरचा थर हा दर २१ दिवसांनी बदलत असतो व त्या जागी नवा थर येतो. परंतु, सोरायसिस या त्वचाविकारामध्ये नवीन त्वचा निर्मितीचा हा वेग २० पट अधिक वाढतो व परिणाम सदृश्य त्वचेवर खवले दिसणे, कोंडा पडणे, खाज अशी लक्षणे दिसू लागतात. आधुनिक शास्त्रानुसार या आजारात आपली व्याधी प्रतिकारशक्ती ही विकृत होते व ती स्वत:च्या त्वचेच्या वरच्या स्तराला शरीराबाहेरील घटक म्हणून ओळखते व त्या त्वचेविरुद्ध काम करून तो स्तर शरीरापासून विलग करते व यामुळे त्वचेच्या बाहेरील स्तराची निर्मिती प्रक्रिया देखील जलद सुरू होते व त्वचा लालसर व चांदेरी रंगाच्या चट्ट्यांनी व खवल्यांनी भरून जाते. हा आजार कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.

  ही अाहेत लक्षणे
  } त्वचेवर लालसर व चांदेरी रंगाचा चट्टा, माशाप्रमाणे खवले येणे.
  }खुप जास्त प्रमाणात खाज येणे व नंतर तेथे आग होणे.
  } डोक्यात कोंडा होणे.
  } त्वचा कोरडी पडणे व त्वचेवर गा पडणे.
  } नखांवर छोटे छोटे खड्डे पडणे.
  } सोरायटिक आर्थोपॅथी- सांधे दुखणे.
  } मानसिक अस्थैर्य व तणाव वाढणे.

  कारणे
  {आधुनिक शास्त्रानुसार याचे कारण अद्याप सांगता येऊ शकले नाही, अचानकपणे विपरीत झालेली ईम्युन सिस्टिम हीच या आजारासाठी कारणीभूत आहे. परंतु आयुर्वेदानुसार हा त्वचाविकार खालील कारणांचे खूप कालावधीपर्यंत सेवन केल्यास होऊ शकतो-
  {दही- गूळ, असात्म्य पदार्थांचे सेवन
  {विरुद्ध आहार सेवन- जसे- फळ व दूध एकत्र खाणे, दूध व मासे इ.
  {खूप क्रोध करणे, उन्हात जास्त फिरणे, रात्री जागरण
  {दही, पनीर, लोणचे, जॅम, पापड, पॉलिश केलेला तांदूळ, मासे, खूप अांबट पदार्थ खाणे
  {हा त्वचाविकार हा बहुतांशी रुग्णांना डोक्यात कोंड्याच्या स्वरूपात सुरू होतो व नंतर तो हळूहळू पसरतो.
  सोरायसिसचे चट्टे हे साधरणत: कोपर, गुडघे यांच्या आजूबाजूला तसेच पाठीवर व जांघेत जास्तीत जास्त अाढळतात. हा आजार जीवघेणा नसला तरी खाज व आग ही लक्षणे.
  {खूप असह्य असतात व बहुतांशी रुग्णांना हा विकार मरेपर्यंत सोबत करतो. हा आजार फक्त लक्षणांवरूनच ओळखला जाऊ शकतो. यासाठी कुठलीही तपासणी करण्याची आवश्यकता नसते.

  {अल्कोहोल सेवन करणॆ, स्मोकिंग व मानसिक तणाव ही ३ कारणे या आजाराला अजूनच वाढवतात व यांच्या सेवनाने लक्षणांमध्ये लगेच वृद्धी दिसून येते.
  अपथ्य-
  } मद्यपान करणे, सिगारेट किंवा कुठल्याही प्रकारची स्मोकिंग
  } मासे, तेलकट व तिखट भाज्या
  } लोणचे, पापड इ. सारखे खारट तसेच अांबट पदार्थ
  } दिवसा झोप घेणे, रात्री जागरण
  } तळलेले पदार्थ तसेच हॉटेलचे जंक फूड, फास्ट फूड
  } अंबवून तयार केलेले पदार्थ व बेकरी प्रॉडक्ट्स- इडली, डोसा, ब्रेड, पाव इ.
  } मानसिक तणाव व चिंता करणे तसेच अशा वातावरणात काम करणे
  उपचार-
  {आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार याचे प्लाक, गट्टेट, इन्वर्स, पस्टुलर व एरिथ्रोडर्मिक असे ५ प्रकार आहेत व हा विकार असाध्य समजला जातो. या विकाराच्या उपचारासाठी प्रामुख्याने केरॅटोलायटिक, रेटिनॉइड तसेच स्टेरॉइड या प्रकारच्या औषधांचा वापर होतो, बाह्य उपचारांत इमोलियंट क्रिम वापरल्या जातात.

  {हा आजार उपचारासाठी अतिशय किचकट आहे, परंतु काही रुग्णांमध्ये अगदी साध्या साध्या आयुर्वेदिक औषधांच्या वापरानेे देखील चांगला परिणाम दिसून येतो. आयुर्वेदानुसार चिकित्सा करताना या विकारामध्ये शोधनचिकित्सा करणे अत्यंत आवश्यक असते, यासाठी अशा रुग्णाचे वमन, विरेचन व बस्ती ही पंचकर्म वारंवार करणे गरजेचे असते. तसेच शरीरातून मांस, रस व रक्तदुष्टी कमी करण्यासाठी काही काढे व औषधी वापरल्या जातात.
  {तसेच बाह्य उपचारांमध्ये काही औषधी तेल तसेच तक्रधारासारख्या उपाययोजना केल्या जातात.
  {१ ते २ महिन्यांच्या उपचाराने सोरायसिसची लक्षणे सुसह्य होऊ लागतात, परंतु पुढच्या चिकित्सेसाठी औषधोपचार दीर्घ कालावधीपर्यंत सुरू ठेवणे गरजेचे .
  coryogesh@gmail.com

 • news about Psoriasis is a complex vitiligo

Trending