आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रज्ञांचा दावा: एलियन्स पृथ्वीवर आले तरी, ते हिंसाचार करणार नाहीत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९९६  च्या सायन्स फिक्शन कॉमेडी चित्रपट  -मार्स अॅटॅक्समध्ये जेव्हा मंगळग्रहवासी पृथ्वीवर उतरतात, तेव्हा असे वाटते सर्व काही ठीक आहे. त्यांचा नेता म्हणतो की आम्हाला शांती हवी आहे. काही क्षणानंतर तो लजर गन काढून लोकांच्या गर्दीवर अंदाधंुद गोळीबार सुरू करतो.  हा तर एका हॉलीवूडपटाचा नजारा होता. पण हे दृष्य मानवतेसाठी सर्वात मोठे भय अधारेखित करते की, तुमचा सामना आता परग्रहांवरील प्राण्यांशी होईल आणि ते विनाश घडवतील.
 
ते असे करतील?  आपले नवे पुस्तक- एलियन्स: द वर्ल्डस् लीडिंग सायंटिस्ट्स ऑन द सर्च फॉर एक्सट्रा टेरेस्ट्रियल लाइफ यामध्ये भौतिकशास्त्रज्ञ जिम अल खलीलीने तज्ज्ञांना असे विचारले आहे की, मानव कशा प्रकारे एलियन्सशी संपर्क करेल.  मानव आणि एलियन्स यांच्यातील संपर्क ही आता फार काही लांबची गोष्ट राहिली नाही. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाद्वारा २००९ मध्ये केपलर मोहीम सुरू केल्यानंतर संशोधकांनी हजारो ग्रहांचा शोध लावला.  पुस्तकातील एका निबंधात अॅस्ट्रोबॉयोलॉजिस्ट नथाली केब्रोल लिहितात की, केपलर माेहिमेने अन्य ग्रहांवर जीवन असल्याचे सांगितल्याने आमच्या विचारांना नवी दिशा दिली.  
 
चित्रपटामध्ये एलियन्स आणि मानव यांच्या संघर्षाबाबत काहीही दाखविले तरी विज्ञान एकदम वेगळीच गोष्ट सांगते. दुसऱ्या ग्रहांवर राहणाऱ्यांसदर्भात पाच कपोलकल्पना खोट्या असल्याचे आता सांगितले जात आहे. 
 
मिथक १- एलियन्स आम्हाला खातील
हॉलीवूडची ब्लॉब आणि क्रिटर्स यासारख्या चित्रपटांमध्ये एलियन्स हे भोजनासाठी मानवाची शेती करतात असे दाखविले आहे. अॅस्ट्रो बॉयोलॉजिस्ट लुईस डार्टनेल लिहितात की, अशा प्रकारचे पोषण विज्ञानाशी मेळ खात नाही.   मनुष्यांना खाऊन त्यांचे पचन करण्यासाठी एलियन्सच्या शरीरात आमच्याप्रमाणे अॅमिनो अॅसिड्स, शुगर पचविण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. यासाठी एलियन्सच्या शरीराची जैवरासायनिक रचना मानवाप्रमाणे पाहिजे.
 
 मिथक २- एलियन्स प्रजनन करतील
एलियन्स : कोवेनेंट आणि  गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्युम २ चित्रपटात मानव-एलियन्स  हायब्रीड कल्पना आहे.  डार्टनेलनुसार विकासक्रमात आपण आपले जवळचे नातेवाईक असलेल्या चिम्पाझीबरोबरही प्रजनन करू शकत नाही.  तेव्हा एलियन्स- मानव प्रजनन संबंध येणे शक्य नाही. 
 
मिथक ३ - एलियन्स आमच्याप्रमाणे दिसतात
ही गोष्ट जवळपास अशक्य आहे की, परग्रहांवरील प्राण्यांचे डोळे आणि आकार मानवाप्रमाणे असतील. न्युरो सायंटिस्ट अनिल सेठ लिहितात की, हे शक्य आहे की ते ऑक्टोपसप्रमाणे असतील. आॅक्टोपस आपल्या पृथ्वीवरील एलियन्सच आहेत. ते फार बुद्धिमान असतात आणि त्यांची नर्व्हस सिस्टिम विकेंद्रित आहे.   
 
मिथक ४ - एलियन्स म्हणजे जिवंत प्राणी काही तज्ज्ञांनुसार अरायव्हलसारख्या चित्रपटातही हे चुकीचे सांगितले गेले आहे. अंतराळतज्ज्ञ विज्ञानी मार्टिन रीस म्हणतात की, एलियन्स, रोबोटच्या माध्यमातून संपर्क साधतील. 
 
मिथक ५- एलियन्स आमचे पाणी चोरतील.
एलियन्स हे पृथ्वीवरील पाणी घेऊ शकणार नाहीत. कारण ज्युपिटर युरोपासारख्या बर्फाळ ग्रहावर चिकार पाणी आहे. तेथे पृथ्वीप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचे बळही नाही. 
 
ते अापल्यापासून शिकतील
जर  एलियन्सची आवड आमचे शरीर किंवा पृथ्वीवर नसेल तर ते आपल्याशी संपर्क का करतील? डार्टनेल लिहितात की, जर एलियन्स पृथ्वीवर आले तर ते शोधकर्ता, जैववैज्ञानिक,मानव वंशतज्ज्ञ आणि भाषातज्ञाच्या स्वरूपात येतील. ते पृथ्वीवरील जीवन, कला, संस्कृती,धर्म जाणून घेतील. 
बातम्या आणखी आहेत...