आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोन: कोर्टात पुराव्याच्या रूपात सादर हाेणार स्मार्ट गॅजेटचा डेटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत एका  हत्या खटल्यासंदर्भात अॅमेझॉनचे वैयक्तिक सहकारी किंवा गुगल होम किंवा सॅमसंगचे स्मार्ट टीव्हीसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या एखाद्या उपकरणाव्दारे रेकॉर्ड करण्यात आलेली माहिती प्रथमच पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.  खटल्याची सुनावणी जुलै महिन्यात सुरू होणार आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये बेंटोनविलेमध्ये विक्टर कॉलिन्स नामक व्यक्तीने त्यांचे मित्र  जेम्स बेट्स सोबत बाथटबात मृत्यू झालेला पाहिला. पोलिसांना बेट्स यांच्या घरात इंटरनेटशी संबंंधित काही उपकरणाचे पुरावे सापडले. त्या उपकरणाच्या स्मार्ट यूटिलिटी मीटरच्या नोंदीनुसार कोणीतरी रात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास १४० गॅलन पाण्याचा वापर केला होता. बेट्सचा आयफोन ६ एस प्लसवरून माहिती समजली की,  त्याने पोलिसांना आपल्या झोपेची जी वेळ सांगितली होती की, त्यानंतरच फोन कॉल केले गेले. बेट्सच्या आवाजाच्या ऑडिओ फाईलने त्यांच्या लिव्हिंग रूमचे चित्र डोळयासमोर आणले. या घटनेमुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान विश्लेषक आणि खासगी जीवनाच्या हक्काचे आग्रह धरणारे समर्थक चिंतित झाले आहेत. यात मुद्दा हा नाही की, ही नवी उपकरणे केवळ स्मार्ट मायक्रोफोनने सज्ज आहेत किंवा अलेक्सा, सिरीसारख्या  पर्सनल असिस्टंट आवाज रेकॉर्ड करू शकतात. मुद्दा हाही आहे की, हे मायक्रोफोन तुमच्या लिव्हिंग रूम, किचन किंवा शयनकक्षापर्यंतही जाऊन पोहोचले आहेत. फोर्डहॅम युनिव्हर्सिटीमधील कायदा व माहिती केंद्राचे संचालक जोएल रीडेनबर्ग सांगतात की, नेहमी एेकणारे हे गॅजेट्स सध्याच्या कायदा कक्षेच्या बरेच पुढे गेले आहेत. कायद्यांमध्ये अशा उपकरणांबात स्पष्ट अशा सूचना नाहीत. चौथ्या दुरुस्तीत नागरिकांना त्यांच्या घरात खासगी जीवनाबाबत व्यापक अधिकार दिले गेले आहेत. पण त्यात काही पळवाटाही आहेत. उदाहरणार्थ तिसऱ्या पक्षाचा सिद्धांत. १९७० च्या दशकात सुप्रीम कोर्टाच्या दोन निकालात असे सांगितले गेे की, अमेरिकन्स लोकांना घराच्या आत त्यांचे वैयक्तिक जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण ते तिसऱ्या पक्षाची माहिती घेत असतील तर त्यांचा हा अधिकार बदलू शकतो. जर तुम्ही तुमच्या फाेनवरून कोणता नंबर डायल करत असाल किंवा वेबपेजपर्यंत पोहोचत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छेनेच फोन कंपनी किंवा इंटरनेट सेवा देणाऱ्यास तुमची माहिती पुरवत आहात असे गृहित धरले जाते. हे दोन म्हणजे तिसरा पक्ष होय. असे केल्याने तुमच्या खासगी जीवनावर गदा येते. 
 
यावर कोर्टाने लक्ष दिले आहे. २०१२ सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश सोनिया सोतोमेयर यांनी एका निर्णयात लिहिले की, डिजिटल जमान्यात तिसऱ्या पक्षाचा विचार उपयोगी नाही. प्रायव्हसीचे समर्थन करणाऱ्या समर्थकांचा असा तर्क आहे की, इकोसारख्या उपकरणांचे मायक्रोफोन तुमच्या घराच्या भिंतीच्या आतही चालू असतील तर आम्हाला आता प्रायव्हसीबाबत काही नवा विचार करावा लागेल.  काहीही असो,अलेक्सा आणि सिरी या उपकरणासमोर तुमचे अनेक प्रकारचे संवाद होत असतात. आम्ही गुगल सर्चवर काही टाइप करतो, फेसबुकवर काही मेसेज टाइप करतो किंवा मॅपिंग अॅपवरून तुमच्या जीपीएस लोकेशनची माहिती देता,तेव्हा तुम्ही कोणत्या तरी स्क्रीनसमाेर असता. जुलै २०१५ मध्ये  इलेक्ट्रॉनिक प्रायव्हसी इन्फॉर्मेशन सेंटर या संशोधन ग्रुपने ने अमेरिकन न्याय विभाग आणि  फेडरल ट्रेड कमिशनला याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. 
 
लाखो उपकरणांची विक्री
खासगी जीवनात डोकावणाऱ्या उपकरणांची विक्री जोरात सुरु आहे. मोर्गन स्टेनलेनुसार  २०१५ च्या मध्यापासून डिसेंबर २०१६ पर्यंत अॅमेझॉनने १ कोटी १० लाख इको डिव्हाईस विकले. एप्रिल महिन्यात कंपनीने याची पुुढची आवृती काढली.गुगलने मागील वर्षी गु्गल असिस्टंट लाँच केले.यामुळे दोन्ही बाजूने संवाद होतो. अॅपलचे सिरी उपकरण यावर्षी येत आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, हत्तीच्या प्रदर्शनास बंदी: १४६ वर्षांपूर्वीची सर्कस गुंडाळणार...
बातम्या आणखी आहेत...