आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळ भेदणाऱ्या दुर्बिणीसाठी 550 अब्ज रुपयांची गुंतवणूक, कसे असेल वेब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये जॉन्सन अंतराळ संशोधक केंद्राच्या ४० टन वजनी आणि ४० फूट रुंद दरवाजाच्या मागे, इमारत क्रमांक ३२ मधील ए चेंबर एका महत्त्वाच्या प्रयोगासाठी सज्ज होत आहे. १९६५ मध्ये या चेंबरची निर्मिती झाली होती. याचे डिझाइन अनोखे असून अपोला चांद्रयानाच्या परीक्षणासाठी हे प्रसिद्ध होते. या चेंबरमध्ये आता आणखी एका महत्त्वाकांक्षी अंतराळ मशीनची निर्मिती होत आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपची चाचणी येथे सुरू आहे. अपोलो युगातील अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाचे प्रशासक जेम्स वेब यांच्या नावे ही महाकाय दुर्बीण बनवली आहे. याचा मुख्य आरसा आणि उपकरणांची चाचणी ९३ दिवसांपर्यंत अंतराळासारख्या वातावरणात केली जाईल. जुलैपासून ही चाचणी सुरू होत आहे. आरसा हा टेलिस्कोपचा आत्मा मानला जातो. याचा व्यास २१.३ फूट आहे. 

जुन्या हबल स्पेस टेलिस्कोपच्या तुलनेत या वेबच्या आरशाची प्रकाश केंद्रीकरणाची क्षमता सातपट अधिक असेल. त्यामुळे अंतराळात सखोल निरीक्षण करण्यास हा सक्षम आहे. वेबची निर्मिती गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. ५५० अब्ज रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक या अंतराळ दुर्बिणीवर झाली असून ऑक्टोबर २०१८ मध्ये ही अंतराळात प्रक्षेपित केली जाईल. प्रारंभिक आकाशगंगा, ताऱ्यांच्या आसपास निर्माण होणारी ग्रहांची प्रणाली त्याचा वेधही घेऊ शकते. अंतराळ दुर्बिणींच्या जगात वेब सर्वात मोठी दुर्बीण असेल. 

वेबच्या आरशाचे १८ खंड बेरिलियम धातूपासून निर्मित आहेत. हे काचेसारखे काम करते. याला पॉलिश केले जाऊ शकते. प्रकाश परावर्तनासाठी यावर सोन्याचा पातळ मुलामा दिला आहे. आरशाच्या २६९ चौ. फूट भागावर मुलामा दिला आहे, मात्र हा खूप पातळ असून यात गोल्फच्या चेंडू इतकेच सोने निघेल. २० कोटी वर्षांपूर्वी अंतराळात झालेल्या महास्फोट (बिग बँग) च्या वेळेपासून येणाऱ्या संकेतांना ते पकडू शकेल. मिळणारी छायाचित्रे विश्वनिर्मितीच्या काळातील म्हणजे १३.६ अब्ज वर्षांपूर्वीची असतील.  
 
कसे असेल वेब   
२० वर्षांपासून निर्माणकार्य सुरू आहे  
२१.३ फूट-वेबच्या मुख्य आरशाचा व्यास 
६९.५  फूट-वेबचे आवरण सूर्यप्रकाशापासून बचाव करेल  
१०  लाख मैल पृथ्वीपासून अंतर  
 
पुढील स्लाइडवर वाचा, इसिसची नवी मोहीम आता फिलिपाइन्समध्ये...
बातम्या आणखी आहेत...