आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारी मुलगा अन् प्रेमाने हॉकिंग झाले प्रेरित, आज जगविख्यात शास्त्रज्ञ म्हणून ओळख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारीरिकदृष्ट्या अकार्यक्षम असूनही स्टीफन हॉकिंग हे जगातील सर्वात मोठे भौतिक शास्त्रज्ञ आहेत. एखाद्या सेलिब्रिटी अथवा खेळाडूमाणे त्यांना सन्मान मिळतो. अंदाजे गेल्या चार दशकांपासून विज्ञान जगतात त्यांचे नाव अाहे. ब्रह्मांडाचा आरंभ ते ट्रॅव्हलपर्यंत करण्यात आलेल्या संशोधनासाठी ते ओळखले जातात. मेंदू सोडून त्यांच्या उर्वरित शरीराचा भाग निष्क्रिय आहे. त्यांना  एमयोट्रॉफिक लॅटरल सेलेरोसिस नावाचा विकार आहे. या विकारात माणसाच्या स्नायंूची क्षमता हळूहळू संपते. तसेच शरीराची सक्रियता संपत जाऊन संवाद क्षमता हरवत जाते.
 
वयाच्या आठव्या वर्षी स्टिफन काही वाचूही शकत नव्हते. त्यांना परीक्षेत गुणही  जेमतेमच मिळायचे. सेंट अलबामा स्कूलमध्ये शिकत असतानाच त्यांना विज्ञानाची आवड लागली. काही मित्रांनी त्यांचे टोपणनाव  आइनस्टाइन असे ठेवले होते. कारण त्यांनी मित्रांच्या मदतीने संगणक बनवला होता. अंतराळ आणि वेळ अशा जटील विषयात त्यांची बुद्धी पारंगत होती. ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर या विषयावरून त्यांनी आपल्या एका मित्राशी पैजही लावली होती.
पुन्हा वयाच्या सतराव्या वर्षी  ऑक्सफोर्डच्या भौतिकशास्त्राच्या  प्रवेश परीक्षेसाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ऑक्सफोर्डच्या अंतिम वर्षात एकदा ते पायऱ्यांवरून पडले. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की बियर सोडून द्या. नंतर ते केम्ब्रिजमध्ये  पीएच.डी. करण्यासाठी गेले. पण  ऑक्सफोर्डपासून सुरू झालेली शरीराची कमजोरी वाढत गेली. ही १९६३ मधील गोष्ट आहे. ते केम्ब्रिजमध्ये  पीएच.डी.च्या अंतिम वर्षात शिकत होते.

२१ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर तपासणीसाठी रुग्णालयात गेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, त्यांना  एमयोट्रॉफिक लॅटरल सेलेरोसिस आहे. ते फक्त एक ते दोन वर्षेच जीवंत राहू शकतात. याबाबत स्टिफन हॉकिंग सांगतात की, माझ्या परिस्थितीवर मी फार निराश झालाे होतो.  बहुतेक पीएचडीची पदवीही पूर्ण होते की नाही? असे वाटत होते. त्याच वेळी रुग्णालयात पडून असलेल्या एका मुलाकडे माझी नजर गेली. तो माझ्या शेजारच्या खाटेवर होता.  त्याला ल्यूकेमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग होता. त्याने माझ्यासमोर प्राण सोडला. पण हा मुलगा मला जाताना प्रेरणा देऊन गेला. नंतर हॉकिंग एका मुलीशी प्रेम करू लागले. तिचे नाव  जेनी वाइल्ड. तिच्याशी विवाह करायचा असेल तर नोकरी करावी लागणार होती. त्याअगोदर पीएच.डी. करावी लागणार होती.  यानंतर त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा नियमबद्ध काम करण्यास सुरुवात केली. १९७० मध्ये त्यांनी क्वांटम थिअरी आणि  जनरल रिलेटिव्हिटीच्या माध्यमातून असे सांगितले की, कृष्णविवरातूनही किरणोत्सर्ग होतो. पुढील काळात त्यांचे संशोधन विस्तारत गेले.
बातम्या आणखी आहेत...