आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांमधील ‘अर्थ साक्षरता’ वाढवण्यासाठी दहावीपासून अभ्यासक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडातील टोरंटो शहरात ‘यूथ कॅबिनेट’ असून येथे मोठ्या इयत्तेतील विद्यार्थी असतात. आपल्या करिअरमध्ये फायदा होईल आणि आपलाही जीवनस्तर सुधारेल या दृष्टीने हे विद्यार्थी सरकारला नव्या धोरणांचे प्रस्ताव देतात.
 
या कॅबिनेटच्या प्रस्तावानंतरच आता येथील दहाव्या इयत्तेपासून आर्थिक साक्षरता (प्रॅक्टिकल फायनान्शियल लिटरसी) अभ्यासक्रम सुरू केली जाणार आहे. तरुणांमध्ये आर्थिक बाबींचे ज्ञान अधिक स्पष्ट असणे आणि त्यात त्यांना निष्णात बनवणे हा यामागील उद्देश आहे.
 
हे विद्यार्थी पुढे कॉर्पोरेट क्षेत्र तसेच व्यवसायात उत्तम प्रदर्शन करतील. कॅनडातील शिक्षणतज्ज्ञांच्या मते, १५ ते १६ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना आर्थिक अभ्यासक्रम दिला गेल्यास १९-२० या वर्षांपर्यंत ते या विषयात पारंगत होतील. अधिकाधिक तरुणांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टीने हे टोरंटो शहराचे पहिले पाऊल आहे.
 
बातम्या आणखी आहेत...