आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या उणिवा आपणच ओळखून आनंदी राहणे सोपे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टुडंट Issues
जीवन सदैव सारखे नसते. त्यात चढउतार येतच राहतात. यशाच्या प्रवासात आपण महाविद्यालय, वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात चांगला वाईट काळ जगतो. पण, काहीही झाले तरी आयुष्यात कधी आशा सोडू नये. २०१७ च्या वर्ल्ड हॅप्पीनेस अहवालानुसार, डेन्मार्कला मागे टाकत नॉर्वेने यंदा सर्वात आनंदी देश बनला आहे. आनंदी देशात समृद्धतेचे संतुलन असते. सामाजिक असमानता नसते. समाज व सरकारमध्ये विश्वास असतो. विद्यार्थी व व्यावसायिक आयुष्यात स्वत:ला कसे आनंदी ठेवू शकतात हे जाणून घेऊया...  

स्वजागृती महत्त्वाची  
वैयक्तिक असो की व्यावसायिक जीवन. आनंदी राहण्यासाठी स्वजागृती महत्त्वाची असते. चिंता, भीती, गुन्हे किंवा पश्चात्तापाविषयी आपल्याला माहिती असेल तर त्यावर मात करण्यास आपण सक्षम होऊ शकतो. त्यानुसार योजनाही बनवता येतात. चिंता विद्यार्थ्यांत तणाव निर्माण करते आणि ऑक्सिओसिनचा स्तरही कमी करून टाकते. याचा परिणाम बुद्धीसोबत शरीरावरही होतो. आपल्या प्रवृत्तीबाबत आपण एकदा जागरूक झालो की नंतर स्वत:चे वारंवार परीक्षण करण्याची गरज पडत नाही. स्वत:वर विश्वास ठेवणे आणि प्रगतीसाठी सतत काम करण्याचा प्रयत्न करत राहणे, या आनंदी राहण्याच्या उत्तम पद्धती आहेत. स्वत:ला जसेच्या तसे स्वीकारले की आपल्याला आपल्या अवतीभोवती सकारात्मक ऊर्जेची जाणिव होते.   
 
एकाग्रचित्ताने  काम करा  
मानसिक हालचालीत निरंतर सक्रिय असणे आनंदामागचे रहस्य मानले जाते. या अवस्थेत व्यक्ती स्वत:ला पूर्णपणे झोकून, एकाग्र होऊन प्रक्रियेचा आनंद घेत असतो. यामुळे आपल्र्याला पुढे काय करायची गरज आहे व आतापर्यंत एखादे काम आपण कशाप्रकारे केले? हे कळते. मानसिक सक्रियेतेेमुळे आपणास भाव जाणून घेण्यात मदत होते. चिंतामुक्त होऊन वर्तमानावर लक्ष केंद्रीत होते. या घडामोडीत मिळणारी आंतरिक प्रेरणा हेच आपले पुरस्कार आहे.  
 
तणाव दूर करा  
महाविद्यालय किंवा कामकाजाच्या ठिकाणी सर्वांनाच कठिण काळाचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढणे कठिण असते. ध्यानधारणेच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवता येते. रोज १० मिनिटे ध्यानधारणा केल्याने तणाव, चिंता दूर होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. ध्यानधारणा/योगच्या माध्यमातून आपण तणावाच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सक्षम बनतो. ध्यानधारणेचे विविध प्रकार असून त्यांचा अभ्यास करून विविध समस्यांवर उपाय करता येते. आनंदी राहण्यासाठी आपल्या पात्रतेवर विश्वास ठेवणे ही सर्वात महत्वपूर्ण बाब असते. अडचणींवर उपाय शोधून आपण विजय मिळवल्या अत्यंत महत्वाच्या काळात आपण आनंदी राहू हे मात्र नक्की आहे.
 
श्वेता रैना 
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या पदवीधर
talerang.com च्या सीईओ
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, इंटर्नship आणि कोर्स Review...
बातम्या आणखी आहेत...