आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरोघरी जाऊन वस्तू विकत होते, आता 3 अब्ज डॉलरचे मालक; यशाचे व्यवस्थापन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन डिजोरिआ, संस्थापक- पॉल मिशेल लाइन - Divya Marathi
जॉन डिजोरिआ, संस्थापक- पॉल मिशेल लाइन
कधी  घरोघरी जाऊन सामान विकणारे जॉन पॉल डिजोरिआ आज ३.१ अब्ज डॉलरचे मालक आहेत. फक्त ७०० डॉलर्समध्ये त्यांनी १९८० मध्ये आपली  जॉन पॉल मिशेल सिस्टम ही हेअर केअर कंपनी सुरू केली होती. या कंपनीची वार्षिक उलाढाल १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. याशिवाय त्यांना ओळखले जाते, टकीला म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली दारू बनविणारे कारखानदार म्हणून. या कंपनीचे नाव आहे-पेट्रॉन स्पिरिट्स कंपनी. याशिवाय ते लाइफ सायन्स, याट आणि  टेलिकॉम इंडस्ट्रीमध्येही गुंतवणूक करत आहेत.  

इटालियन पिता आणि ग्रीक आई यांचे पुत्र असलेले डिजोरिआ वयाच्या नवव्या वर्षी आपल्या मोठ्या भावासमवेत घरोघरी जाऊन ख्रिसमस कार्डे विकू लागले. मोठा भाऊही फक्त दहाच वर्षाचा होता. दोघे पहाटे चार वाजता उठत आणि पेपरही वाटायला जात असत. जॉन जेव्हा दोन वर्षाचे होते तेव्हाच त्यांच्या आई वडिलांचा घटस्फाेट झाला होता. मुले आईजवळ राहिली खरे पण आई त्या मुलांचे पालनपोषण करण्यास सक्षम नव्हती. म्हणून काही वर्षानंतर दोघांना अनाथालयात पाठविण्यात आले. तरुण वयात त्यांना चांगली संगत लागली नाही, तेव्हा डिजोरिआ एका रस्त्यावरच्या गुंडांच्या टोळीत हिंडू फिरू लागले. पुन्हा त्यांच्या शिक्षकांनी समजूत काढली तेव्हा कुठे ते ताळ्यावर आले. हायस्कूल केल्यानंतर अमेरिकेच्या नाविक दलात ते नोकरीसाठी गेले. दोन वर्षांनंतर ते लॉस एंजेलिसला आले. तेव्हा पोटापाण्यासाठी त्यांनी कधी पेट्रोल पंपावर तर कधी इन्शुरन्स सेल्समन म्हणूनही काम केले. एका कंपनीसाठी ते एनसायक्लोपिडीया घरोघरी जाऊन विकू लागले. यातून त्यांना बेस्ट  सेल्समन  म्हणून पुरस्कारही मिळाला. नंतर त्यांना एका हेअर कंपनीत जिल्हा विक्री व्यवस्थापक म्हणून काम मिळाले. 

एका ठिकाणी त्यांची ओळख पॉल मायकेल नावाच्या इसमाशी झाली.  दोघांनी मिळून हेअर केअर प्रॉडक्ट बनविण्याचे ठरविले. यासाठी ण्का गुंतवणूकदाराला राजी केले. तो पाच लाख डॉलर द्यायला तयार होता पण ज्या दिवशी हा व्यवहार व्हायचा होता त्या दिवशी तो आलाच नाही. तेव्हा जॉन आणि पॉल यांनीच काही पैसे जमविले. ३५० डॉलर पॉल मायकेलने आपल्या आईकडून उधार घेतले.  यानंतर त्यांनी काम सुरू केले. ते एनसायक्लोपिडीया विकायचे तसेच ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन शाम्पूही विकत असत. अशीच आश्चर्यकारक सुरुवात पेट्रॉन कंपनीची होती. ही गोष्ट १९८९ ची आहे. जॉन यांचे एक मित्र  मार्टिन क्रोनली आपल्या आर्किटेक्चर व्यवसायात अयशस्वी झाले. त्यांचे दिवस वाईट होते म्हणून ते मेक्सिकोला गेले. तेथे स्टोन पेव्हर्स आणि फर्निचर खरेदी करून अमेरिकेला आणण्याचा  व्यवसाय त्यांनी सुरू केला. जॉन यांनी सांगितले की मेक्सिकोमध्ये जी सर्वात जास्त तीव्र दारू तयार केली जाते  त्या दारूच्या बाटल्या घेऊन ये. तेव्हा त्यांनी त्या आणल्या. ती खरेच सुरेख होती. मार्टिन म्हणाला मी याहीपेक्षा कडक दारू बनवू शकतो. आपण दोघे मिळून व्यवसाय सुरू करू. जॉन तयार झाले. तेव्हा त्यांनी असा विचर केला की,पॉल मायकेल कंपनी चांगली चालत आहे. तेव्हा नव्या बिझनेससाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्यांनी १२ हजार बाटल्या आणल्या. नवीन लेबलिंग केले अाणि ब्रँड बनविला. ते सांगतात की दोन वेळा बेघर होण्याची वेळ आली. वयाच्या बाविसाव्या वर्षी मुलाला घरात सोडून पत्नीने पैसे घेऊन पोबारा केला. त्यावेळी घर सोडावे लागले. कारण भाड्यासाठी पैसेच नव्हते. वयाच्या ३६ व्या वर्षीही त्यांना असेच बेघर व्हावे लागले होते. 
 
७०० डॉलरपासून सुरू झालेली जॉन पॉलची कमाई १ अब्ज डॉलरपर्यंत 
-    मित्राकडून मेक्सिकोहून मागवलेल्या टकिला दारूच्या १२००० बाटल्यांवर  लेबलिंगने सुरू केली कंपनी
-    १९८० मध्ये सुरू झालेल्या पाल मिशेलमध्ये  आज ३०० पेक्षा जास्त कर्मचारी
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कामाचे व्यवस्थापन, संघर्ष व्यवस्थापन, नातेसंबंधातील व्यवस्थापन आणि यशाचे व्यवस्थापन...
बातम्या आणखी आहेत...