आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकीऱ्या लोकांपासून यशस्वी लोक दूर राहतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीच्या फ्रेडरिक शिलर विद्यापीठातील एका संशोधनात असे  निष्पन्न झाले की, जेव्हा आपण नकारात्मक लोकांना भेटता तेव्हा आपण तणावात येतो एका संशोधनानुसार हे समजते की, चांगले काम करणारे ९० टक्के लोक तणावाचे योग्य व्यवस्थापन करण्यात निष्णात असतात. येथे सांगत आहोत काही पद्धती ज्या नकारात्मक लोकांपासून दूर राहण्यात मदतीच्या ठरू शकतात. 
 
१.  काही लोकांची सवय नेहमी तक्रार करण्याची असते. बहुधा यातच त्यांना आनंद मिळतो. कामावर त्यांचे लक्ष केंद्रित नसते. अशा लोकांपासून दूर अंतर ठेवणेच चांगले असते. यास असेही आपण समजू शकतो की, जर का आपला कोणी मित्र वारंवार धूम्रपान करत असेल तर आपण नेहमी त्याच्याबरोबर जात नाही, असे केल्यास पॅसिव्ह स्मोकिंगमुळे आपल्यालादेखील नुकसान होईल.
  
२. यशस्वी लोक कामातून मिळालेल्या आनंदासह कोणाकडून मिळालेल्या प्रतिक्रियेवर तपासून पाहत नाहीत. प्रत्येक कामाची प्रतिक्रिया तर असतेच, पण ज्या कामाला घेऊन समाधान होईल त्यावर कोणाच्या तरी तुलनेच्या आधारावर मिळालेल्या प्रतिक्रियेच्या आधारावर त्याचे महत्त्व कमी होऊ देऊ नका. याचे कारण हे आहे की स्वत:ला समजून घेणे गरजेचे आहे. यशस्वी लोक हे जाणतात की ते तितके वाईट नाहीत जितके लोक त्यांना दाखवतात. ते तेवढेही चांगले नाहीत की जेवढे लोक त्यांची स्तुती करतात.  

३. खरे पाहता मर्यादा ठरवणे महत्त्वाचे असते; पण कधी-कधी आम्ही विचार करतो की, दिवसभर साथ देणाऱ्यांबरोबरही सीमा मर्यादा ठरवणे कठीण असते. पण जर यासाठी प्रयत्न केले तर मार्ग निघतोच. उदाहरणार्थ जर आपण कोणाबरोबर एखाद्या प्रकल्पावर काम करत असत तर हे गरजेचे नाहीये की, त्यांच्याशी एकदमच गाढ मैत्रीचे संबंध बनवावेत आणि त्याला काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य असावे.  
बातम्या आणखी आहेत...